शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

बांधकाम परवानग्यांची अद्यापही प्रतीक्षा

By admin | Updated: August 26, 2016 00:30 IST

एनजीटीकडे लक्ष : नगररचनाच्या कामकाजावर परिणाम

नाशिक : गेल्या दहा महिन्यांपासून राष्ट्रीय हरित लवादाच्या (एनजीटी) निर्णयामुळे शहरातील बांधकाम परवानग्यांचा गुंता अद्यापही सुटू शकलेला नाही. एनजीटीने काही अटी-शर्तींवर परवानग्या देण्यास संमती दिली असली तरी भविष्यात पूर्णत्वाचा दाखला प्राप्त करण्यात अडचणी उद्भवणार असल्याने आतापावेतो सुमारे ६०० विकसकांनीच बांधकाम परवानग्यांसाठी अर्ज केले आहेत. परवानग्यांसाठी अर्जच प्राप्त होत नसल्याने महापालिकेच्या नगररचना विभागाच्या कामकाजावर परिणाम जाणवत असून महसुलातही घट झालेली आहे.पाथर्डी फाटा येथील खतप्रकल्प सुरळीत होईपर्यंत राष्ट्रीय हरित लवादाने शहरातील इमारतींसाठी बांधकाम परवानग्या काही अटी-शर्तींवर देण्यास संमती दिलेली आहे. नोव्हेंबर २०१५ मध्ये एनजीटीने दिलेल्या निर्णयानंतर गेल्या दहा महिन्यांत महापालिकेच्या नगररचना विभागाकडे परवानग्यांसाठी येणाऱ्या अर्जांचा ओघ थांबला आहे. त्यापूर्वी ‘कपाट’ प्रकरणामुळेही नगररचनाच्या कामकाजावर परिणाम झालेला आहे. ‘कपाट’प्रकरणी माजी आयुक्त डॉ. प्रवीण गेडाम आणि बांधकाम व्यावसायिक यांच्यातील संघर्ष टोकाला जाऊन पोहोचला होता. त्यामुळे नगररचना विभागातील वर्दळही कमी झाली होती. गेडाम यांनी नंतर शासनाच्या आदेशानुसार शहरातील सुमारे २६०० प्रकरणांची यादी नगरविकास विभागाला पाठविली होती. परंतु त्याबाबत अद्यापही निर्णय झालेला नाही. त्यामुळे ‘कपाट’चा गुंता कायम आहे. त्यात एनजीटीच्या निर्णयामुळे बांधकाम परवानग्यांना रोख बसला आहे. गेडाम यांच्या बदलीनंतर अभिषेक कृष्ण यांनी आयुक्तपदाचा कार्यभार स्वीकारला त्यावेळी कृष्ण यांनी ‘कपाट’सह एनजीटीच्या निर्णयाबाबत पर्यायांची चर्चा करत दिलासा देण्याचा प्रयत्न केला होता. परंतु आता कृष्ण यांनी पदभार स्वीकारून पावणे दोन महिने उलटले तरी बांधकाम परवानग्यांचा विषय मार्गी लागू शकलेला नाही. मार्च २०१७ मध्ये महापालिकेची पंचवार्षिक निवडणूक होणार असून त्यानंतरच ‘कपाट’चा निर्णय मार्गी लागण्याची शक्यता बांधकाम व्यावसायिकांमधून व्यक्त केली जात आहे. बांधकाम परवानग्यांना प्रतिसाद मिळत नसल्याने नगररचना विभागाच्या महसुलावरही परिणाम झाला आहे. नगररचना विभागाला बांधकाम परवानग्यांद्वारे सन २०११-१२ मध्ये ६४ कोटी ६७ लाख रुपये, २०१२-१३ मध्ये ७३ कोटी २२ लाख, २०१३-१४ मध्ये ७२ कोटी ३८ लाख, २०१४-१५ मध्ये ४५ कोटी आणि २०१५-१६ मध्ये ३९ कोटी रुपये उत्पन्न प्राप्त झाले. सुमारे ३० कोटी रुपयांनी उत्पन्न घटले आहे.