शहरं
Join us  
Trending Stories
1
"चारित्र्यशील लोक निवडून द्या, तरच हे थांबेल"; आपमधील फुटीवर अण्णा हजारे संतापले, नव्या कायद्याची मागणी
2
Paytm वॉलेट आणि UPI सुरक्षित आहे का, तुमचे पैसे तर अडकणार नाहीत ना? लायसन्स रद्द झाल्यावर कंपनीनं काय म्हटलं?
3
IPL 2026: शतकवीर साई सुदर्शनचा धमाका! केला विराट, रोहित, धोनीलाही न जमलेला धडाकेबाज विक्रम
4
Bank of Baroda मध्ये ५ वर्षांच्या FD मध्ये ₹२,२५,००० डिपॉझिट कराल तर किती मिळेल रिटर्न? जाणून घ्या संपूर्ण गणित
5
२.५ लाखांना विकला बाभळीचा पाला! मनोहर मामाकडे अमावास्या-पौर्णिमेला भक्तांची गर्दी, अखेर अटकेत
6
Tulja Bhavani Temple: तुळजाभवानीच्या पुजाऱ्याला ५ वर्षे मंदिरात प्रवेशबंदी
7
लेख: ट्रम्प यांनी युद्ध केले, की आपल्यांचेच खिसे भरले?
8
Beed: जेलमध्ये चाललंय काय? तिसऱ्या दिवशीही कुख्यात गुन्हेगारांचे कॉल रेकॉर्डिंग व्हायरल!
9
आजचा अग्रलेख: शिवभक्त? नव्हे, शिव्याभक्त!
10
Bike Loan साठी किमान CIBIL स्कोअर किती असला पाहिजे? जाणून घ्या महत्त्वाची माहिती
11
२०३८ आशियाई क्रीडा स्पर्धेसाठी भारताचा दावा; अहमदाबाद शहर बनू शकते प्रमुख दावेदार
12
आजचे राशीभविष्य, २५ एप्रिल २०२६: धनप्राप्ती होईल, प्रवास आनंददायी होईल; पण वाहन चालवताना काळजी घ्या!
13
Mumbai Local: तिन्ही मार्गांवर ‘मेगाब्लॉक’जाचामुळे आजपासून दोन दिवस प्रवासखोळंबा  
14
'किंग कोहली'ने दाखवला दर्जा! साई सुदर्शनचे दमदार शतक व्यर्थ; RCB गुजरातवर पडली भारी
15
Manohar Bhosale: काळी जादू करणाऱ्या भोंदूबाबा मनोहर भोसलेसह दोघांना अटक
16
नायक नहीं, खलनायक हूं मैं! संजय दत्तने पुन्हा पेटवली आग, 'खलनायक रिटर्न्स'ची घोषणा
17
"भाऊ म्हणाले तुझ्या सिनेमात तर मी असणारच...", 'राजा शिवाजी'मध्ये सलमानची एन्ट्री कशी झाली? रितेशने सगळं सांगितलं
18
पालिकेचे १३ अधिकारी आता चौकशीच्या फेऱ्यात, गायकवाड प्रकरणानंतर ‘एसीबी’ नवी मुंबईत सक्रिय
19
कसोटीसाठी चांगल्या खेळपट्ट्या पाहिजेत, जर हे असेच सुरू राहिले तर...; भज्जीने व्यक्त केली भीती
20
मुंबई घामाघूम, तर विदर्भात सूर्याचा प्रकोप; अकोल्याचा पारा ४५ अंशांवर, आज पावसाची शक्यता!
Daily Top 2Weekly Top 5

संविधान, कायद्याचे पालन व्हावे

By admin | Updated: September 9, 2016 22:58 IST

येवला : शांती आणि मानवता अभियान कार्यक्र मातील सूर

 येवला : देशात शांती आणि सलोखा कायम राहण्यासाठी प्रत्येक जाती धर्माच्या लोकांनी देशाच्या संविधानाचे व कायद्याचे पालन करायला पाहिजे, असा सूर शांती आणि मानवता अभियान कार्यक्रमात मान्यवरंकडून व्यक्त करण्यात आला. जमाते इस्लामी हिंद शाखा येवलाच्या वतीने मसजीद अलुरखान येथे या कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले होते. कायद्याचे पालन होत नसल्याने देशात भ्रष्टाचार, अत्याचार, बलात्कार, दरोडे अशा घटना वाढत आहे. माणसापासून माणूस दुरावत चालला आहे. इस्लाम धर्म कोणत्याही जाती, धर्मबद्दल द्वेष करायला शिकवत नाही. प्रत्येक मानवाबद्दल प्रेम आणि सद्भावनेने वागण्याची शिकवण इस्लामी धर्म देतो. धर्म कोणताही असो, माणसाला न्याय मिळावा व त्याच्या मुलभुत गरजा पुर्ण करण्यासाठी शासनाने प्रयत्न केले तर भारताचा विकास म्झाल्या शिवाय राहणार नाही असे डॉ. उमर कहाळे यावेळी म्हणाले. याप्रसंगी येवला शहर पोलीस ठाण्याचे पोलीस निरीक्षक संजय पाटील, प्रा. शिवाजी भालेराव, भगवान चित्ते, मौलाना समी आदी मान्यवर उपस्थित होते.आपल्या भारतीय संविधानाने प्रत्येक धर्माच्या लोकांना आपल्या धर्माच्या नियमानुसार आचरण करण्याचा तसेच प्रचार व प्रसार करण्याचा अधिकार दिलेला आहे. त्याचमुळे भारतामध्ये वेगवेगळ्या जाती धर्माचे लोक गुण्या गोविंदाने राहत आहे. जो पर्यंत जातीयवाद नष्ट होत नाही तोपर्यंत भारतामध्ये सुख, शांती वाढणार नाही, एकोपा वाढणार नाही, असे कॉ. भगवान चित्ते यांनी सांगीतले.हा देश संपुर्ण मानव जातीचा आहे. प्रत्येक मानव जातीला न्याय आणि सुख समृद्धी व जगण्याचा अधिकार आहे. जातीय व्यवस्थेची विभागणी करु नका, देश तोडु नका, गोर गरीबांवर अत्याचार करु नका असे आवाहन केले. कार्यक्र मास हिंदु, मुस्लिम, दलीत व इतर समाजाचे लोक मोठ्या संख्येने उपस्थित होते. कार्यक्र माचे सुत्रसंचालन जमाअते इस्लामीचे जिल्हा अध्यक्ष शफीक यांनी केले. आभार मौलाना इसमाईल यांनी मानले. कार्यक्र म यशस्वीततेसाठी डॉ. मुसरत शहा, शकीलभाई शेख, दानिश अन्सारी, नाविद शाह, मुश्ताक अन्सारी, जमील अन्सारी, सज्जू शाह, समीर शाह, अयाज अन्सारी, किरण साताळकर, विकास वाहुळ आदींनी केले. या संघटनेमार्फत संपूर्ण भारतात २१ आँगष्ट ते ४ सप्टेंबर दरम्यान शांती आणि सद्भावना मोहिमेचे आयोजन करण्यात आले होते. (वार्ताहर)