शहरं
Join us  
Trending Stories
1
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
2
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
3
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
4
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
5
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
6
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
7
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
8
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
9
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
10
Abhishek Sharma Century : अभिषेक शर्माचा शतकी धमाका! किंग कोहलीसह 'या' दिग्गजांच्या विक्रमाची बरोबरी
11
वसई तहसीलला पुन्हा लाचेचे 'ग्रहण'; ७ लाखांची लाच स्वीकारताना खासगी इसम ताब्यात
12
‘अजितदादांच्या अपघाताबाबत इतरांप्रमाणे माझ्याही मनात शंका’, प्रचाराच्या सांगतेवेळी सुनेत्रा पवार यांचं मोठं विधान
13
कौटुंबिक वादातून दुहेरी हत्याकांड : कर्जाचे २० हजार आणि अपत्य नसण्याचा टोमणा; सख्ख्या भावाने संपवले आयुष्य
14
उपजिल्हाधिकारी पदाच्या नाेकरीचे आमिष दाखवून दोन कोटींचा गंडा; पोलिसांनी केली अटक
15
'लादेनला जी म्हणतात आणि मोदींना दहशतवादी संबोधतात', खर्गेंच्या वक्तव्याविरोत भाजपा आक्रमक
16
SRH vs DC : नागपूरकरामुळे ईशान किशन गोंधळला! अक्षर पटेलनंही व्यक्त केली मनातील खंत; नेमकं काय घडलं?
17
केडीएमसीच्या महासभेकडे शिंदे सेनेच्या बहुतांश नगरेसवकांची पाठ; महत्वाच्या विषयावरील चर्चे दरम्यान अनुपस्थिती
18
LIC मध्ये नोकरीची सुवर्णसंधी! ज्युनिअर असिस्टंट पदांसाठी भरती जाहीर; पदवीधरांना मिळणार वार्षिक ५ लाखांपर्यंत पॅकेज
19
मोठा घोटाळा! वैष्णो देवीच्या कोट्यवधी भक्तांची घोर फसवणूक, ₹५५० कोटींच्या चांदीची किंमत केवळ ३० कोटी; समोर आला विचित्र प्रकार
20
शरद पवार पुन्हा रुग्णालयात दाखल; बारामती पोटनिवडणूक दरम्यान पोस्ट लिहून केलं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळा निधीसाठी गडकरींना साकडे

By admin | Updated: July 26, 2014 00:49 IST

महापौरांनी दिले निवेदन : लवकरच निर्णय होणार

नाशिक : पुढील वर्षी होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी केंद्र शासनाने अलाहाबाद आणि नांदेड शहराला केलेल्या आर्थिक मदतीनुसार नाशिकसाठीही भरघोस निधी द्यावा, यासाठी महापौर अ‍ॅड. यतिन वाघ यांच्यासह अन्य पदाधिकाऱ्यांनी केंद्रीय वाहतूकमंत्री नितीन गडकरी यांना साकडे घातले. दिल्लीत या विषयावर चर्चा करून लवकरच कळवू, असे आश्वासन गडकरी यांनी यावेळी दिले.नाशिक आणि त्र्यंबकेश्वर येथे होणाऱ्या कुंभमेळ्यासाठी २३७८ कोटी रुपयांचा आराखडा तयार केला असून, त्यास राज्य शासनाने मान्यता दिली आहे. यात नाशिक महापालिकेचा आराखडा १०५२ कोटी रुपयांचा आहे. कुंभमेळ्याकरिता २४०० कोटी रुपयांचा निधी मिळावा यासाठी राज्य शासनाने केंद्र शासनाकडे प्रस्ताव पाठविला आहे. तथापि, अद्याप निधी मिळालेला नाही. त्या पार्श्वभूमीवर महापौर अ‍ॅड. यतिन वाघ, उपमहापौर सतीश कुलकर्णी यांनी गडकरी यांना निवेदन दिले. २००३-०४ यावर्षी झालेल्या कुंभमेळ्यास दीड लाख साधू-महंत, तर २५ ते ३० लाख भाविक नाशिकमध्ये आले होते. आता तीन लाख साधू-महंत आणि एक कोटीहून अधिक भाविक पर्वणीच्या दिवशी येण्याची शक्यता आहे. केंद्र शासनाने अलाहाबाद येथे कुंभमेळ्यासाठी ११०० कोटी रुपयांचा निधी दिला होता, तर नांदेड येथे गुरू दा गद्दी सोहळ्यासाठी ९०० कोटी रुपयांचा निधी दिला होता. त्याच धर्तीवर नाशिक महापालिकेला कुंभमेळ्याकरिता जास्तीत जास्त निधी द्यावा, अशी मागणी निवेदनाद्वारे करण्यात आली. यावेळी खासदार हरिश्चंद्र चव्हाण, बाळासाहेब सानप, सभागृह नेता शशिकांत जाधव, गटनेता अशोक सातभाई, भाजपा शहराध्यक्ष लक्ष्मण सावजी यांच्यासह अन्य पदाधिकारी उपस्थित होते. (प्रतिनिधी)