शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
MI vs CSK: मॅचदरम्यान भर मैदानात वाद; तिलक वर्मा-जेमी ओवर्टन भिडले, नेमकं काय घडलं? (VIDEO)
4
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
5
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
6
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
7
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
8
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
9
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
10
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
11
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
12
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
13
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
14
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
15
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
16
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
17
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
18
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
19
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
20
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
Daily Top 2Weekly Top 5

वीज वितरणचा गोंधळ; नागरिकांना भुर्दंड!

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 6, 2020 15:58 IST

वैतरणानगर : वेळीच बिल भरण्यासाठी सक्ती करणारे विज वितरण विभागाने लॉकडाऊन काळात मीटरचे रिडींग न घेताअव्वाच्या सव्वा बिले नागरिकांच्या माथी मारुन कोणाचा गोंधळ आणि कोणाला भूर्दंड याची प्रचिती दिली आहे. दरम्यान, संभाव्य धोके लक्षात घेऊन पावसाळ्यापूर्वी करावयाच्या कामांकडे दुर्लक्ष केल्याने नागरिकांत संताप व्यक्त होत आहे.

इगतपुरी तालुक्यात कोरोनाच्या पार्श्वभूमीवर सर्वच कामे व व्यवहार ठप्प होते. अशावेळी नागरिकांना दिलासा देण्याची गरज असताना वाढीव वीजबिलाच्या माध्यमातून भुर्दंड दिला आहे. लॉकडाऊन मधून कसेबसे सावरलेल्या सर्वसामान्य जनतेला पहिला झटका बसला तो, विज वितरण विभागाचा वाढीव बिलांमुळे आणि सर्व बिलांची वसुली मात्र अनलॉकमध्ये केली जात असताना दुसरा झटका दिला आहे. यातच बिलांमध्ये केलेल्या चुकांचा आर्थिक भुर्दंडही सर्वसामान्य नागरिकांना बसत असून बिलांच्या दुरूस्तीसाठी ग्रामीण भागातील जनतेला घोटी येथे जावे लागते. मात्र शंकाचे निरासन करण्यासाठी तेथुनही इगतपुरी येथे जाण्याचे सल्ले दिले जात आहेत. एक वेळेस गेल्यानंतर अधिकारी नसल्यास पुन्हा आर्थिक भुर्दंड सोसत दुसऱ्यांदा जावे लागत आहे.ग्रामीण भागातील बहुतांशी नागरिकांना आॅनलाईन भरणा कसा करावा याची माहीती नाही. मात्र विज वितरणचे अधिकारी आॅनलाईन भरणासाठी आग्रही आहेत. यातच बिलामध्ये तफावत असल्याने भरणा करायचा कसा असा प्रश्न वीज ग्राहकांपुढे आहेत. तालुक्यातील काही पतसंस्थेमध्ये वीज बिल भरणा केला जातो मात्र कोरोना असल्यामुळे नागरिक येथे जाण्यास घाबरत आहे. तालुक्यातील विज वितरण विभागाने फिडर प्रमाणे वीज बिल भरणा केंद्र सुरू करावे अशी मागणी केली जात आहे.

टॅग्स :Nashikनाशिकelectricityवीज