शहरं
Join us  
Trending Stories
1
US-Iran Ceasefire: इराण-अमेरिका संघर्षात मोठी घडामोड, ट्रम्प यांच्याकडून युद्धविरामाच्या मुदतीत वाढ, नाकेबंदी मात्र कायम
2
आजचे राशीभविष्य - २२ एप्रिल २०२६, दांपत्य जीवनात उत्तम सुख मिळेल, सार्वजनिक सन्मान व प्रसिद्धी मिळेल
3
Bombay High Court: अग्निवीराच्या कुटुंबीयांच्या याचिकेला उत्तर द्या, अन्यथा दंड ठोठावण्याचा उच्च न्यायालयाचा इशारा
4
Uddhav Thackeray: देश तोडण्याचा डाव विरोधी पक्षांनी उधळला, महाराष्ट्र धर्मच देशाला वाचवू शकतो: उद्धव ठाकरे
5
Mumbai Drug Party: गोळ्यांवर मर्सिडीज, ऑडी, ॲपलचा लोगो; तरुणांना ड्रग्जच्या विळख्यात ओढण्यासाठी मोठं षडयंत्र!
6
Devendra Fadnavis: ३३ टक्के महिला निवडून देईपर्यंत लढाई थांबणार नाही: देवेंद्र फडणवीस
7
...म्हणून अश्विनी बनायची रुकसाना, पोलिसांच्या सीक्रेट मिशनमुळे अनेक धक्कादायक गोष्टी समोर!
8
चर्चा की ढोंग? इराणच्या कार्गो शिपवर अमेरिकेचा ताबा; डोनाल्ड ट्रम्प यांची थेट युद्धभूमीवर नजर!
9
Video: "गेट आउट"! भाजपाच्या मोर्च्यासाठी वाहतूक रोखली; महिला भडकली, थेट गिरीश महाजनांवर ओरडली...
10
दिंडोरीत काळाचा क्रूर घाला! बिबट्याने उचलून नेलेल्या ३ वर्षीय चिमुरडीचा दुर्दैवी अंत; परिसरात शोककळा
11
SRH vs DC : आधी अभिषेक शर्मानं धुतलं; मग मलिंगा-हर्षचा जलवा! 'ऑरेंज आर्मी'समोर दिल्लीकर ठरले हतबल
12
पेट्रोलची कटकट मिटणार? आता गाड्या अल्कोहोलवर धावणार! इंधन टंचाईवर असा आहे सरकारचा 'E85' मास्टर प्लॅन
13
विशेष लेख: चिनी महिलांना हवाय नवऱ्यापासून घटस्फोट!
14
लेख: तुमचा पिझ्झा पोहोचविणारा उन्हात होरपळतो आहे, सावधान!
15
लेख: विधेयक पडले, पन्नास हजार कोटी रुपये वाचले!
16
आजचा अग्रलेख: हे नुकसान कसे मोजणार?
17
२०० पारच्या लढाईत KL Rahul पुन्हा अपयशी! अभिषेक शर्मानं फिल्डिंगमध्येही दाखवला क्लास
18
इस्लामाबाद चर्चा २.० पूर्वी डोनाल्ड ट्रम्प यांच्याकडून इराणच्या जनतेचं कौतुक, पण...! युएस-इराण युद्ध पुन्हा भडकणार?
19
अभिषेक शर्मा ठरला जगात भारी! टी-२० क्रिकेटमध्ये अशी कामगिरी करणारा तो पहिलाच
20
केरळमध्ये फटाका कारखान्यात मोठा स्फोट; १३ जणांचा मृत्यू, अनेक गंभीर जखमी
Daily Top 2Weekly Top 5

एलईडींसह सिलिंडर जप्त

By admin | Updated: August 25, 2016 00:03 IST

गुन्हे शाखा : तिघा सराईत चोरट्यांना अटक

 नाशिक : गुन्हे शाखेच्या युनिट दोनला मिळालेल्या गुप्त माहितीच्या आधारे गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून पोलिसांनी तिघा सराईत गुन्हेगारांच्या मुसक्या आवळल्या. त्यांच्याकडून ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला आहे.प्रदीप जगन्नाथ तुपे (२१, रा.चुंचाळे), सतीश सदाशिव भांगरे (रा. शिवाजीनगर), महेश बळीराम शिरसाठ (२०, रा. गोवर्धन गाव) या तिघा सराईत गुन्हेगारांना पोलिसांनी गंगापूर पोलीस ठाण्याच्या हद्दीत सापळा रचून अटक केली. त्यांची कसून चौकशी केली असता चोरी केलेल्या ऐंशी हजार रुपये किमतीच्या २१ ते ३२ इंच सॅमसंग कंपनीचे चार एलईडी टीव्ही, सहा हजार रुपये किमतीचे भारत गॅस कंपनीचे चार रिकामे सिलिंडर, पाच हजार रुपये किमतीचे दहा ग्रॅमचे चांदीचे जोडव्यांचे चार नग असा एकूण ९१ हजारांचा मुद्देमाल जप्त केला आहे. तिघे सराईत गुन्हेगार आनंदवल्ली परिसरात येणार असल्याची कुणकुण गुन्हे शाखेच्या पोलिसांना लागली होती. त्यानुसार पो.हवालदार रवींद्र पिंगळे यांनी वरिष्ठ अधिकाऱ्यांना याबाबत माहिती दिली. गुन्हे शाखेचे सहायक आयुक्त सचिन गोरे यांच्या मार्गदर्शनाखाली तत्काळ सापळा रचण्यात आला. पोलीस निरीक्षक आनंद वाघ, रवींद्र साळुंखे, संजय तांदूळवाकर, उपनिरीक्षक राजेंद्र जाधव आदिंनी ही कारवाई केली.