शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांनी युद्धविराम वाढवला, पण इराणला नाही विश्वास, अमेरिकेसमोर ठेवली 'अशी' अट!
2
solar energy: सौरऊर्जा ग्राहकांना आणखी एक ‘झटका’, आता वीज शुल्क करही द्यावा लागणार
3
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
4
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
5
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
6
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
7
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
8
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
9
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
10
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
11
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
12
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
13
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
14
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
15
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
16
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
17
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
18
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
19
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
20
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
Daily Top 2Weekly Top 5

सेनेच्या गाडेकरांसह कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: April 2, 2016 00:02 IST

सेनेच्या गाडेकरांसह कार्यकर्त्यांना सशर्त जामीन

नाशिक : राज्य महिला आयोगाच्या अध्यक्ष विजया राहाटकर यांच्या उपस्थितीत श्रीकृष्ण मंगल कार्यालयात मंगळवारी (दि़२२ मार्च) सुरू असलेल्या भाजपा महिला सन्मान सोहळ्यात स्वतंत्र मराठवाड्याच्या प्रश्नावर घोषणाबाजी करीत गोंधळ घालून महिलांना मारहाण करणाऱ्या शिवसेनेच्या पदाधिकारी सत्यभामा गाडेकरांसह नऊ जणांना जिल्हा व सत्र न्यायाधीश एऩ बी़ भोस यांनी शुक्रवारी (दि़१) सशर्त जामीन मंजूर केला़ यामुळे गत दहा दिवसांपासून मध्यवर्ती कारागृहातून सुटकेच्या प्रतीक्षेत असलेले शिवसेनेचे पदाधिकारी व कार्यकर्त्यांचा मार्ग मोकळा झाला आहे़भारतीय जनता पक्षाच्या महिला सन्मान सोहळ्यात खुर्च्यांची मोडतोड व महिलांना मारहाण केल्याप्रकरणी मुंबई नाका पोलीस ठाण्यात सेनेच्या पदाधिकारी सत्यभामा गाडेकर, मंगला भास्करे, प्रशांत शिंदे, रोशन साळवे, राजू शेटे, योगेश शेवरे, योगेश गाडेकर, अर्जुन काळे, प्रशांत काळे, आशिष साबळे यांच्यासह सुमारे शंभर ते दीडशे कार्यकर्त्यांवर गुन्हा दाखल केला होता़ यात अटक करण्यात आलेल्या संशयितांच्या जामिनाच्या कागदपत्रांसाठी वेळ लागल्याने या सर्वांची न्यायालयीन कोठडीत रवानगी केली होती़ न्यायालयास असलेल्या सलग सुट्या व जामीन सुरू असलेले कोर्ट रजेवर असल्याने या सर्व संशयितांच्या वकिलांनी शुक्र वारी (दि़१) न्यायाधीश भोस यांच्या न्यायालयात जामीन अर्ज सादर केला़ त्यामध्ये प्रत्येकी २० हजार रुपयांच्या वैयक्तिक जातमुचलका व दर रविवारी १ ते ४ या वेळेत हजेरी या अटींवर संशयितांना जामीन मंजूर करण्यात आला़ तसेच या मारहाण प्रकरणात फरार असलेले युवा सेनेचे जिल्हाप्रमुख दीपक दातीर यांच्यासह इतर तिघा संशयितांचा अटकपूर्व जामीन अर्ज न्यायालयाने मंजूर केला आहे़ (प्रतिनिधी)