शहरं
Join us  
Trending Stories
1
"झालमुडी मी खाल्ली अन् मिरची... ४ मे रोजी मिठाई वाटणार!"; पश्चिम बंगालमध्ये मोदींचा मोठा दावा, ममतांवर निशाणा
2
पाकिस्तानची झोप उडाली! भारत-रशियामध्ये ३,००० सैनिकांचा मोठा करार, शेजारी देश तणावात
3
स्कोडाची ८-स्पीड गिअर बॉक्सवाली कुशाक...! तोच घाट, मायलेजवर काय फरक पडला? धक्का दिला की...
4
Video: सशस्त्र जवान, मॉस्किटो फ्लीट; 'होर्मुझ'मध्ये थरार, भारताचे जहाज इराणच्या लष्कराने कसे घेतले ताब्यात, पहा व्हिडीओ 
5
Top Marathi News LIVE Updates: शरद पवारांच्या प्रकृतीत सुधारणा, रुग्णालयातून सुट्टी मिळाली
6
"ज्या राज्याचे उपमुख्यमंत्री विमान अपघातात जातात, त्याचा..."; सुप्रिया सुळेंचे सूचक विधान
7
Ganga Saptami 2026: पितरांना सद्गती मिळावी म्हणून आजच्या तिथीला आठवणीने म्हणा 'हा' श्लोक!
8
जगावर इतिहासातील सर्वात मोठे ऊर्जा संकट! दररोज १३ दशलक्ष बॅरल तेलाचा पुरवठा ठप्प; IEA प्रमुखांचा इशारा
9
अमराठी वाहनचालकांना मराठी भाषा शिकण्यासाठी साहित्यिकांचा पुढाकार- मंत्री प्रताप सरनाईक
10
Gen Z कडून 'जशास तसं' उत्तर; कामाच्या ठिकाणी 'सिनियर्स'वर विश्वासच नाही, वाटतात अकार्यक्षम
11
पत्नीचे फिट राहणे पतीला आवडले नाही; जिमला जाण्यावरून झाला वाद, चिडलेल्या नवऱ्याने बायकोला संपवले अन्.. 
12
लग्नाच्या १३ वर्षांनी मोडणार टीव्ही अभिनेत्रीचा संसार? पदरात १० वर्षांचा मुलगा, म्हणाली- "मला ड्रामा नकोय..."
13
IPL 2026: ऋषभ पंतसोबत भरमैदानात गैरवर्तन; राजस्थान रॉयल्सच्या खेळाडूला BCCIने दिला दणका
14
सीझफायर कसा वाढवला...! इराणी दूतावासाकडून 'AI' फिरकी; Video केला व्हायरल
15
भारत बनला जगातील ६ वा सर्वात श्रीमंत देश; १९,८७७ जण अल्ट्रा रिच लिस्टमध्ये, 'या' शहरात सर्वाधिक श्रीमंत
16
अयान अहमदचा 'स्वॅग', पण झटका राजेश प्रजापतीला! रीलमधील महागड्या कार अन् दोन पिस्तूल जप्त
17
बंगालमध्ये मतदानादरम्यान भाजपा उमेदवार अग्निमित्रा पॉल यांच्या कारवर हल्ला, जमावाने फोडल्या काचा
18
तैवान राष्ट्रपतींच्या विमानाला 'या' देशांच्या एअरस्पेसमध्ये नो एन्ट्री; अमेरिका चीनवर भडकला
19
"ममता बॅनर्जी यांनी स्वच्छ सरकार चालवलं असतं तर..."; खुद्द राहुल गांधींनीच  करून टाकली भाजपच्या विजयाची भविष्यवाणी!
20
“भारताला ‘नरक’ म्हणणे १४० कोटी भारतीयांचा अपमान, पण PM मोदी गप्प आहेत”; काँग्रेसची टीका
Daily Top 2Weekly Top 5

संगणक शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड?

By admin | Updated: January 25, 2016 22:51 IST

शासनाचे दुर्लक्ष : शासकीय सेवेत सामावून घेण्याची मागणी

विंचूर : शालेय विद्यार्थ्यांना शाळेतच संगणकाचे धडे मिळावे यासाठी २००८ साली मोठा गाजावाजा करून केंद्र शासन पुरस्कृत आयसीटी योजनेचा शुभारंभ करण्यात आला. मात्र सद्यस्थितीत माहिती तंत्रज्ञानासारखा अत्यंत महत्त्वाचा विषय असणाऱ्या या योजनेला घरघर लागली आहे. गेल्या वर्षात ५०० शाळांमधील संगणक लॅब बंद झाल्या आहेत. शासनाच्या वतीने अद्याप कुठलीही ठोस पावले उचलली गेली नसल्याने राज्यातील २५०० शाळांमघील संगणक कक्षांचा करार संपुष्टात येत असून, अडीच हजार संगणक शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे.माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालयातील विद्यार्थ्यांना संगणकाचे धडे देण्यासाठी माहिती संप्रेषण व तंत्रज्ञान विषयाची आयसीटी योजना कार्यान्वित करण्यात आली. केंद्र शासनाकडून ७५, तर राज्य शासनाकडून २५ टक्के निधी योजनेसाठी उपलब्ध करून दिला जातो. शहरासह ग्रामीण भागातील शाळांमध्ये योजनेंतर्गत आयसीटी लॅब तयार करण्यात आल्या आहेत. त्यात कम्प्युटर्स, इंटरनेट अशा अद्ययावत सुविधांसह नववी, दहावीच्या विद्यार्थ्यांना संगणक प्रशिक्षण दिले जाते. महाराष्ट्र शासनाच्या वतीने दहावीच्या बोर्ड परीक्षेतही आयसीटी विषयाचा समावेश करण्यात आला आहे.बोर्डाकडून या विषयाचा स्वतंत्र पेपर घेतला जातो. सदर योजना प्रत्यक्ष केंद्र शासनाकडून न चालविता खासगी कंपन्यांकडून चालविण्यात येत आहे. आयसीटी योजनेंतर्गत पहिला टप्पा, दुसरा टप्पा याप्रमाणे नियुक्त्या करून साधारण आठ हजार शिक्षकांची भरती खासगी कंपन्यांमार्फत केली गेली. संगणकाबाबतचा विषय माध्यमिक शालांत परीक्षेत समाविष्ट करून या विषयाला चालना दिली. मात्र सुरु वातीपासूनच वेतन वेळेवर न होणे, वेतन कमी मिळणे यामुळे संगणक शिक्षक मेटाकुटीस आले आहेत. योजनेत संगणक शिक्षकांपेक्षा जास्त फायदा कंपन्याच उकळत असून, संगणक शिक्षक आर्थिकदृष्ट्या नागवला जात आहे. केंद्र व राज्य शासनाकडून या शिक्षकांच्या वेतनासाठी किमान १३ हजार रु पये मिळतात; प्रत्यक्षात मात्र आयसीटी शिक्षकांना कंपन्यामार्फत २५०० ते ४००० पर्यंत मानधन दिले जात आहे. म्हणजे शेतमजुरांच्या वेतनापेक्षाही कमी वेतनात संगणक शिक्षकांना राबवून घेतले जात असल्याने, आमची ही वेठबिगारी कधी संपणार, असा सवाल या शिक्षकांकडून विचारला जात आहे.२००८ साली नियुक्त्या दिलेल्या संगणक शिक्षकांचा पाच वर्षांचा करार संपल्याने गेल्या वर्षी ५०० शिक्षकांवर बेरोजगारीची कुऱ्हाड कोसळली. दुसऱ्या टप्प्यातील योजनेचा कालावधी येत्या एप्रिल महिन्यात संपुष्टात येत असल्याने सुमारे २५ शाळांमधील आयसीटी विषय शिकविणाऱ्या संगणक शिक्षकांचे भवितव्य टांगणीला लागले आहे. गोवा, हरियाणा, आंध्र प्रदेश यांसह अकरा राज्यांनी या योजनेतील शिक्षकांना शासकीय सेवेत सामावून घेतले; मात्र महाराष्ट्र शासनाने याबाबत कुठलाही ठोस निर्णय घेतलेला नाही. संगणक शिक्षकांच्या संघटनेच्या वतीने आजपावेतो पाच ते सहा वेळा आंदोलने करण्यात आली. नागपूर येथे विधानसभेवर मोर्चा काढण्यात आला. मोर्चाला सामोरे जाताना शिक्षणमंत्री विनोद तावडे यांनी आश्वासन दिले, मात्र अद्यापपर्यंत त्यावर तोडगा काढण्यात आलेला नाही. आता मात्र करारच संपत येत असल्याने मागील टप्प्यातील शिक्षकांसारखे बेरोजगार होण्याची वेळ या शिक्षकांवर येणार आहे. शासनाकडून समर्पकउत्तरे दिली जात नसल्याचा आरोप करीत संघटनेच्या वतीने फेब्रुवारी महिन्यात मुंबई येथे तीव्र स्वरूपाची आंदोलने करण्यात येणार असल्याचे सांगण्यात आले. (वार्ताहर)