शहरं
Join us  
Trending Stories
1
दोन तेल जहाजांना इराणने पाठवले परत, होर्मुझ सामुद्रधुनीत आयआरजीसीकडून पुन्हा नाकेबंदी
2
काहीतरी मोठे घडणार! अमेरिकेची लढाऊ विमाने पाकिस्तानात उतरली; इराण संघर्षात कसली तयारी सुरू?
3
माजी रेल्वे मंत्री दिनेश त्रिवेदी यांची बांगलादेशात भारताचे उच्चायुक्त म्हणून नियुक्ती, बंगाल निवडणुकीपूर्वीच भाजपची मोठी खेळी!
4
Varun Chakravarthy Record : वैभव सूर्यवंशीची शिकार आणि मिस्ट्री स्पिनर चक्रवर्तीनं साधला 'द्विशतकी' डाव
5
सत्तरीच्या उंबरठ्यावर रोमान्सचा शौक चढला! तरुण गर्लफ्रेंडही मिळाली; पण भेटल्यावर झालं असं काही... 
6
२०२७च्या वर्ल्ड कपपर्यंत अजित आगरकरच राहणार टीम इंडियाचा मुख्य निवडकर्ता; BCCIचा मोठा निर्णय
7
हर्षा रिछारियाने घेतला संन्यास, स्वतःचं पिंडदान करत बनली साध्वी, नवीन नाव काय?
8
"महिला आरक्षणाला आमचा विरोध नाही, पण...!" पंतप्रधान मोदींच्या संबोधनावर ममता बॅनर्जी यांची पहिली प्रतिक्रिया
9
"अच्छा क्युट से याद आया..." फ्लाइटमध्ये फ्लर्टिंगची गोष्ट; अर्शदीपनं घेतली चहलची फिरकी (VIDEO)
10
प्रेमविवाह अन् संशयाचा खेळ; आईने केला थरकाप उडवणारा खुलासा, म्हणाली "सीसीटीव्हीतूनच जुळ्या मुलींना पाहायची..."
11
श्रेयस अय्यर ते रजत पाटीदार: T20 वर्ल्ड कपच्या संघात नसलेले 'हे' ७ धुरंधर गाजवतायत IPL 2026!
12
“परवानगी दिली, तरी गोळीबार का?” भारतीय टँकरचा धक्कादायक ऑडिओ; होर्मुझ सामुद्रधुनीत तणाव वाढला
13
गौतम अदानींची मोठी घोषणा, मुंबईतील 'या' परिसरात करणार तब्बल ₹१ लाख कोटींची गुंतवणूक
14
क्षणात खेळ खल्लास! एकाच मोटारसायकलवर तिघे, हातात रिव्हॉल्व्हर; रीलसाठी जीव गमावून बसले
15
वैशाख विनायक चतुर्थी २०२६: गणेश पूजन कसे करावे? ‘या’ गोष्टी आवश्यकच; पाहा, सोपा विधी-मान्यता
16
पश्चिम बंगालमधील वृद्ध मुस्लीम व्यक्तीचा 'जय श्री राम' घोषणा देतानाचा व्हिडिओ खरा की खोटा? लोक का म्हणताहेत 'अल-तकिया'?
17
Mumbai Pune Expressway Missing Linkवर लवकरच चाचण्या सुरू करणार, ३० एप्रिलपर्यंत पूर्ण होणार?
18
Video: कढई हेल्मेट..!! बाईकवरून जाताना पोलिसांना चकवण्यासाठी तरूणाने केला भन्नाट जुगाड
19
Two Indian men shot dead: दोन भारतीयांची इटलीमध्ये हत्या, गुरुद्वाराबाहेरच हल्लेखोरांनी गोळ्या घालून संपवले
20
इस्रायलच्या एका निर्णयाने नव्या वादाला तोंड फुटले, १६ मुस्लिम देश एकवटले; संतापून दिला मोठा इशारा!
Daily Top 2Weekly Top 5

जमीनमालक गोत्यात : निबंधक, तलाठी, सर्कल अधिकारी यांच्या विरुद्ध तक्रार

By admin | Updated: August 22, 2014 00:29 IST

सातबारा कोरा करून जमिनीची विक्री

नाशिक : एकदा जमिनीचे साठेखत व नोंदणीकृत खरेदीखत होऊन सातबारा उताऱ्यावर त्याची नोंद झालेली असताना सातबारा कोरा करून तलाठी व मंडळ अधिकाऱ्यांनी जमीन मालकाशी संगनमत करून परस्पर तिची विक्री केल्याचे उघडकीस आले आहे. विशेष म्हणजे ज्या जमिनीच्या खरेदीखताचा व्यवहार दुय्यम निबंधक कार्यालयात यापूर्वीच नोंदविला गेला त्या कार्यालयाने पुन्हा एकवार त्याच जमिनीच्या विक्रीची नोंद करून आपल्या गलथानपणाचे प्रदर्शन घडवून दुष्कृत्यात सहभागी झाले आहे. यासंदर्भात संबंधितांविरुद्ध गुन्हा दाखल करण्याबरोबरच, जमिनीची पुनर्खरेदी करणाऱ्यांविरुद्धही तक्रार दाखल करण्यात आली आहे. त्र्यंबकेश्वर तालुक्यातील झारवड येथील गट नंबर ७ मधील हा प्रकार दोन दिवसांपूर्वीच उघडकीस आला आहे. सोमा रामा हळकुंडे या नावसाध्यर्म्याचा फायदा घेत लहानू सोमा हळकुंडे यांनी सदरची जागा चुकीच्या पद्धतीने आपल्या नावावर करून घेतल्यानंतर विष्णू फाळके यांना परस्पर विक्री केल्याची बाब सोमा रामा हळकुंडे यांना समजताच त्यांनी उपविभागीय अधिकाऱ्यांकडे धाव घेतली होती. त्यावर सुनावणी होऊन सदरची जागा सोमा रामा हळकुंडे यांची असल्याचा निकाल देण्यात आला. त्यानंतर सोमा हळकुंडे यांनी सदरची जागा ६० लाख रुपयांना सुरेश पांडुरंग नागरे यांना साठेखत व नोंदणीकृत खरेदीखताने विक्री केली. दरम्यान, या जागेचा वाद इगतपुरी न्यायालयात व अपर आयुक्तांपर्यंत पोहोचल्याने जमिनीच्या खरेदी-विक्रीबाबत जैसे थे ठेवण्याचा आदेश दोन्ही न्यायाधिकरणाने दिला होता. त्यानुसार सुरेश नागरे यांचे नाव सातबारा उताऱ्यावर इतर हक्कात लागून तशी नोंदही नमुना ६ ड मध्येही तत्कालीन तलाठी व मंडळ अधिकाऱ्याने घेतली. परंतु वर्ष उलटत नाही तोच, तलाठी, मंडळ अधिकाऱ्यांनी जमीन मालकाशी संगनमत करून, सातबारा उताऱ्यावरील सर्व नोंदी रद्द करून एकदा विक्री झालेल्या जमिनीची पुन्हा विक्री केली. विशेष म्हणजे सोमा हळकुंडे व सुरेश नागरे यांच्यात झालेल्या नोंदणीकृत खरेदी व्यवहारात या पुढे जैसे थे ठेवण्याचा आदेश न्यायालयाने दिलेला असताना, तो झुगारून सोमा हळकुंडे यांनी गणेश आडके, लोकेश नागरे, जगदीश राठी व तुकाराम पेखळे यांना विक्री केली.