शहरं
Join us  
Trending Stories
1
युद्ध की शांतता? मतभेद! संसदेचे सभापती आणि IRGC प्रमुखांमध्ये जुंपली; इराणचे नवे 'पॉवर सेंटर' अहमद वाहिदी कोण? 
2
“IPLप्रमाणे राजकारणात बोली लागतात, जिकडे जास्त बोली, तिकडे लोक अधिक”; ठाकरेंचा रोख कुणाकडे?
3
"चर्चा नाही तर मोठा धमाका करू!" डोनाल्ड ट्रम्प यांचा इराणला निर्वाणीचा इशारा; शांतता चर्चा धोक्यात?
4
मोदींचा 'झाल मुरी'चा व्हिडीओ, ममता बॅनर्जी म्हणाल्या, "कोणाचा विश्वास बसेल का की, पंतप्रधानांच्या पाकिटामध्ये..."
5
"भारत विसरत नाही, मर्यादा ओलांडल्यास..."; पहलगाम हल्ल्याला वर्ष होण्याआधी PAK ला सूचक संदेश
6
Monalisa : महाकुंभची 'व्हायरल गर्ल' मोनालिसा प्रेग्नेंट; नवरा फरमान खानचा मोठा दावा, पोलीस पोहोचले पण...
7
Latest Marathi News LIVE Updates: भाजपाने मतदारसंघ पुनर्रचना केलेल्या अधिकाऱ्यांनाच नोकरीवर घेतले, रोहित पवारांचा आरोप
8
Narasimha Navratri 2026: २२ एप्रिलपासून 'नृसिंह नवरात्र' प्रारंभ! जाणून घ्या महत्त्व, अचूक पूजा विधी आणि लाभ 
9
IPL 2026: विराट कोहली-अनुष्का शर्मा वृंदावनमध्ये, प्रेमानंद महाराजांचे आशीर्वाद घेतले!
10
“राहुल गांधींना शक्य नाही, प्रियंका गांधी INDIA आघाडी चांगल्या प्रकारे पुढे नेऊ शकतात”; कुणाचा दावा?
11
"भाजपाचा २०२७ मध्येच निवडणुका घेण्याचा प्रयत्न, त्यासाठी घाईघाईत...", आमदार रोहित पवारांचा दावा
12
अभ्यासक्रम प्रशिक्षण, जनगणना, मतदारयादी पडताळणी; राज्यातील प्राथमिक शिक्षकांवर कामाचा डोंगर
13
सोलापूर-पुण्याहूनही सुटणार पहिली स्लीपर वंदे भारत ट्रेन? जाणून घ्या, कुठे जाणार अन् थांबणार!
14
चीनने इराणला पाठवले मिसाईल्ससाठीचे केमिकल्स, अमेरिकेने पकडलेल्या जहाजात सापडला साठा; निक्की हेलींचा दावा
15
माजी क्रिकेटपटू, तृणमूल खासदार युसूफ पठाणचे सासरे आणि मेहुण्याला अटक, मुंबई पोलिसांनी केली कारवाई
16
अरे बापरे! मोमोज खाणं ठरलं जीवघेणं; १० वर्षांच्या मुलीचं लिव्हर फेल, आठवेना, चालताही येईना
17
Ashok Kharat : भोंदू अशोक खरातच्या कोट्यवधीच्या प्रॉपर्टीवर येणार तात्पुरती टाच; 'अशी' होणार कुटुंबियांची अडचण
18
MHADA Lottery: गिरणी कामगारांच्या २,५२१ घरांच्या लॉटरीला विलंब लागण्याची चिन्हे 
19
जिनिलियाचं रितेशवरील प्रेम पाहून भारावली भाग्यश्री, 'राजा शिवाजी' सेटवरचा किस्सा सांगत म्हणाली...
20
उरणमधील नियोजित ८५० मेगावॅटचा प्रकल्प रखडला, केंद्राकडे गॅस पुरवठ्याचा प्रस्ताव धूळखात पडून
Daily Top 2Weekly Top 5

कुंभमेळ्यात भारत-चीन संस्कृतीचा मिलाप

By admin | Updated: September 25, 2015 23:42 IST

फडणवीस : मानसरोवरातील जल गोदेत प्रवाहित

नाशिक : मानसरोवरातील पवित्र जल त्र्यंबकेश्वरच्या कुशावर्तात प्रवाहित केल्याने यंदाचा कुंभमेळ्यात भारत चीन संस्कृतीचा मिलाफ झाल्याचे आणि त्यातून या कुंभाला आंतरराष्ट्रीय स्वरूप प्राप्त झाल्याचे मत राज्याचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी व्यक्त केले. आॅब्जर्व्हर रिसर्च फाउण्डेशन, महाराष्ट्र सरकार आणि चीन दूतावास यांच्या संयुक्त विद्यमाने ‘होली वॉटर डिप्लोमसी’ अर्थात पवित्र जल राजकीय संस्कृती मिलाफाच्या दृष्टीने मानसरोवरातील पवित्र जल त्र्यंबकेश्वर येथील कुशावर्तात तर कुशावर्तातील पवित्र जल अर्थात अमृतकुंभ मानसरोवरात नेण्याचा उपक्रम तिसऱ्या शाही पर्वणीच्या काही तास अगोदर गुरुवारी (दि. २४) रात्री साडेबारा वाजता झाला.. यावेळी सुधींद्र कुलकर्णी, अंजली भागवत, डॉ.विजय भटकर, पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे, आमदार बाळासाहेब सानप यांच्यासह शिष्टमंडळात चिनी दूतावासातील वरिष्ठ अधिकारी उपस्थित होते. त्यानंतर पत्रकारांशी बोलताना देवेंद्र फडणवीस यांनी सांगितले, पहिल्या पर्वणीदरम्यान येथे आलो असता संपूर्ण राज्यावर दुष्काळाचे सावट होते. शुक्रवारी तिसऱ्या पर्वणीच्या वेळी मात्र गोदावरी मातेने आणि वरुणराजाने कृपा केल्याने राज्यावरील दुष्काळाचे सावट काहीसे कमी झाले आहे. सिंहस्थ कुंभमेळा हा खऱ्या अर्थाने आंतरराष्ट्रीय पातळीवर पोहोचला आहे. या पवित्र जल प्रत्यार्पणाच्या उपक्रमातून भारत आणि चीन यांच्यातील संस्कृतीचा मिलाफ होणार आहे. सिंहस्थ कुंभमेळ्याचे प्रशासनाने यशस्वी नियोजन केले आणि त्याला नागरिकांनी पुरेशी साथ दिल्यानेच कुंभमेळा निर्विघ्नपणे पार पडत असल्याचे त्यांनी सांगितले. यावेळी पालकमंत्री गिरीश महाजन, सहकार राज्यमंत्री दादा भुसे आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)