शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांचा मेसेज घेऊन मुनीर पुन्हा इराणमध्ये गेले, अमेरिकेशी शांतता चर्चा कधी सुरू होणार?
2
पत्नीच्या नावे Post Office मध्ये २ लाख गुंतवा, २ वर्षानंतर व्हाल मालामाल; किती मिळेल रिटर्न, पाहा कॅलक्युलेशन
3
‘होर्मुझ’वर इराण-अमेरिकेत चर्चा, तेल जहाजांसाठी नव्या मार्गाचा शोध; प्रस्ताव मान्य होईल?
4
8th Pay Commission: ₹६९,००० बेसिक सॅलरी, ६% वार्षिक इनक्रिमेंट आणि ५ प्रमोशन! ८ व्या वेतन आयोगात मोठे प्रस्ताव
5
नाशिक धर्मांतरण प्रकरणाचे 'टेरर' कनेक्शन? निदा खानचा बॉम्बस्फोटातील मास्टरमाइंडशी संबंध असल्याचा संशय
6
विधान परिषदेच्या १७ जागांची लवकरच निवडणूक होणार!, जिल्हा परिषद निवडणुकीचा येणार नाही अडसर
7
"माझे महत्वाचे सीन्स कापण्यात आले...", मृणाल ठाकूरने 'सन ऑफ सरदार'बाबत केला खुलासा
8
'महिला आरक्षण' तरणार, तर मतदारसंघ पुनर्रचनेला विराेध हाेणार, लोकसभेत भाजपपुढे आव्हान
9
Accident: देवदर्शनासाठी जाताना भाविकांच्या वाहनाला भीषण अपघात; ८ जण ठार, १२ जखमी!
10
कार्याध्यक्ष होणार असल्याच्या चर्चेवर आदित्य ठाकरे यांनी दिली अशी प्रतिक्रिया, म्हणाले...
11
‘टाइम’च्या यादीत सुंदर पिचाई, विकास खन्नांसह रणबीर कपूर, डोनाल्ड ट्रम्प, पोप लिओ, जिनपिंग यांचा समावेश
12
चैत्रातच वैशाख वणवा, महाराष्ट्रासह मुंबईची होरपळ; अंगाची लाहीलाही, अकोल्याचा पारा ४४.२ वर तर मुंबईचे तापमान ३४ वर
13
मुंबई महापालिकेची तिजोरीच असुरक्षित! स्थायी समिती सभागृहात नगरसेविकेच्या पर्समधून २० हजार लंपास
14
उद्योगांना झटका; वीज झाली महाग, १ डिसेंबरपासून प्रतियुनिट ९.९० पैशांची झाली वाढ
15
आजचे राशीभविष्य, १६ एप्रिल २०२६: लाभ होतील, सुख-समृद्धी लाभेल; पण आजचा दिवस सावध राहण्याचा!
16
अमरावतीतील परतवाडा येथील व्हिडीओ कांड: मित्राच्या रूमवर केले दाेन मुलींचे लैंगिक शोषण
17
कायदा माहीत नव्हता, या सबबीवर आयटीआर न भरण्याच्या विलंबला माफी मिळणार नाही !
18
लेबनाॅन, इस्रायलदरम्यान ४० वर्षांनंतर शांतता चर्चा, दोन्ही देशांमध्ये अद्याप करार झाला नसल्याचे अमेरिकेने केले स्पष्ट
19
‘एनसीए’मध्ये जायला खेळाडू घाबरतात, मुनाफ पटेलचे खळबळजनक विधान
20
आरोग्य, निसर्ग संवर्धनासह ९ सामूहिक प्रतिज्ञा करा, नरेंद्र माेदींचं आवाहन
Daily Top 2Weekly Top 5

विकासकामांना आचारसंहिता शिथिल

By admin | Updated: October 20, 2016 02:53 IST

नगरपालिकांना मात्र लागू : घोषणा, आमिषांना मज्जाव

नाशिक : ज्या सहा नगरपालिकांमध्ये नोव्हेंबरमध्ये निवडणुका होणार आहेत, त्या वगळून अन्य नगरपालिका, महापालिका व जिल्हा परिषदेच्या विकासकामांसाठी आचारसंहितेत शिथिलता आणण्याचे संकेत राज्य निवडणूक आयोगाने दिले असून, नवीन कामांच्या निविदा तसेच कार्यारंभ आदेश देण्यास कोणतीही हरकत नसल्याची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी दिली. मात्र मतदारांवर थेट प्रभाव टाकणाऱ्या घोषणा, आमिषे, राजकीय भाषणबाजीसाठी आचारसंहिता कायम राहील, असेही ते म्हणाले. अशी घोषणा राज्य निवडणूक आयोगाने करताच, अवघ्या चोवीस तासात त्याविरोधात तीव्र प्रतिक्रिया उमटल्या. आगामी स्थानिक स्वराज्य संस्थेच्या निवडणुका लक्षात घेता साधारणत: चार ते पाच महिने आचारसंहिता लागू राहिल्यास त्याचा विकासकामांवर परिणाम होऊन कामकाज ठप्प होण्याची भीती व्यक्त करण्यात आली. विरोधकांसह सत्ताधारी पक्षाच्या लोकप्रतिनिधींनीही यासंदर्भात आचारसंहिता मागे घेण्याची मागणी केली. या पार्श्वभूमीवर बुधवारी राज्याच्या मुख्य निवडणूक आयुक्तांनी व्हिडीओ कॉन्फरसिंगद्वारे सर्व जिल्हाधिकाऱ्यांशी संवाद साधून नगरपालिका निवडणुकीचा आढावा घेतला. त्यावेळी प्रामुख्याने लोकप्रतिनिधींच्या संपूर्ण जिल्ह्णात लागू करण्यात आलेल्या आचारसंहितेविषयीची नाराजी आयोगाच्या निदर्शनास आणून देण्यात आल्यावर आयोगाने त्याबाबत स्पष्टीकरण करताना विकासकामांच्या आड आचारसंहिता येणार नसल्याचे स्पष्ट केले. ज्या नगरपालिकांमध्ये निवडणुका आहेत, तेथे आचारसंहिता कायम असेल मात्र अन्य नगरपालिका, महापालिका, जिल्हा परिषदेला विकासकामांसाठी आचारसंहितेचा बाऊ करण्याचे काम नसल्याचे सांगितले, मात्र ज्या नगरपालिकांच्या निवडणुका होत आहेत, तेथील मतदारांवर थेट प्रभाव टाकणारे कोणतेही निर्णय घेता येणार नसल्याचे ते म्हणाले. निवडणूक आचारसंहितेच्या शिथिलतेबाबत आयोगाकडून लवकरच मार्गदर्शक तत्त्वे जाहीर केली जातील, परंतु आचारसंहितेत बसणारी अन्य मार्गदर्शक तत्त्वे कायम असून, उमेदवारांचा प्रचार, राजकीय घोषणाबाजी, मतदारांना आकर्षित करण्याचे वा दबाव टाकण्याचे प्रकार, शासकीय विश्रामगृहे, धार्मिकस्थळांचा वापर करण्यावर बंधने कायम असल्याचे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले. निवडणूक होणाऱ्या प्रत्येक नगरपालिकेत आचारसंहिता कक्ष असणार असून, जिल्हास्तरावर सनियंत्रण समितीदेखील त्यावर देखरेख ठेवेल, असेही ते म्हणाले.