शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

ढगाळ हवामान : शहरात पावसाची रिमझिम सुरूच

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 17:08 IST

जूनच्या सुरूवातीपासून अद्याप ४०६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तसेच गंगापूर धरण समुहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली.

नाशिक : शहर व परिसरात मंगळवारी (दि.७) पहाटे पावसाने काही प्रमाणात विश्रांती जरी घेतली असली तरी दुपारपासून पुन्हा शहरासह विविध उपनगरांमध्ये सरींचा रिमझिम वर्षाव सुरू झाला. सकाळी अकरावाजेनंतर शहरातून सुर्यप्रकाश गायब झाला अन् ढगाळ हवामान तयार झाले.मागील दोन ते तीन दिवसांपासून सतत हलक्या सरींचा वर्षाव शहर व परिसरात होत आहे. यामुळे बळीराजाही सुखावला आहे. पावसाने आठवडाभराच्या विश्रांतीनंतर का होईना हजेरी लावल्याने समाधानाचे वातावरण आहे. शहराच्या आजुबाजुला डोळ्यांना हिरवाई नजरेस पडू लागली आहे. डोंगरमाथ्यांवर विविधप्रकारच्या वनस्पतींनाही बहर येण्यास सुरूवात झाली आहे. प्रामुख्याने त्र्यंबकेश्वर, इगतपुरी या तालुक्यांमध्ये पावसाची दमदार हजेरी सुरू असल्याने भात लावणीलाही वेग आला आहे. बहुतांश आदिवसी शेतक्यांची भात लावणी पुर्णत्वासदेखील आली आहे.शहरात मागील २४ तासांत २५.२ मिमी पाऊस पडला आहे. जूनच्या सुरूवातीपासून अद्याप ४०६ मिमी इतका पाऊस झाला आहे. तसेच गंगापूर धरण समुहातदेखील पावसाने मध्यरात्रीपासून जोरदार हजेरी लावली. तसेच मंगळवारी दिवसभरही पावसाच्या कधी हलक्या तर कधी मध्यम सरींचा वर्षाव या भागात सुरूच होता. गंगापूर-४०मिमी, अंबोली-४५ मिमी, काश्यपी-१५ मिमी, गौतमी-२९ मिमी इतका पाऊस पाणलोट क्षेत्रात मोजण्यात आला. यामुळे गंगापूर धरणात नव्याने ५१ दलघफू इतक्या पाऊसपाण्याची आवक झाली. सध्या धरणसाठा ४५.९१ टक्के इतका झाला आहे. 

टॅग्स :NashikनाशिकRainपाऊस