शहरं
Join us  
Trending Stories
1
'मी तुम्हाला विकसित भारत देऊन जाईन, ही माझी गॅरंटी', शिवतीर्थावर नरेंद्र मोदींचं मोठं विधान
2
तुम्ही संपत्तीचे वारसदार तर आम्ही विचारांचे वारसदार, एकनाथ शिंदेंचा उद्धव ठाकरेंवर हल्लाबोल
3
एकाधिकारशाही संपवण्यासाठी भाजपाला हद्दपार करण्याची गरज, शरद पवारांचा घणाघात
4
मराठीला अभिजात भाषेचा दर्जा, संविधान, गडकिल्ले...राज ठाकरेंच्या PM मोदींकडे 'या' मागण्या
5
'उद्धव ठाकरेंनी तमाम हिंदू बांधवांनो म्हणणे सोडून दिले', देवेंद्र फडणवीसांची बोचरी टीका
6
PM मोदींच्या नेतृत्वात महाराष्ट्रासह देशाचा विकास झाला, अजित पवारांचा विरोधकांवर निशाणा
7
"उद्धवजी महाराष्ट्रात चालणार नाहीत तुमचे नखरे, कारण आमच्यासोबत आलेत राज ठाकरे", रामदास आठवलेंची कवितेतून टीका
8
जसप्रीत बुमराहला विश्रांती, अर्जुन तेंडुलकरला संधी; मुंबई इंडियन्सच्या ताफ्यात बरेच बदल
9
रश्मिका मंदानाकडून 'अटल सेतू'चं कौतुक; आदित्य ठाकरेंचा अभिनेत्रीला सल्ला अन् सरकारवर टीकास्त्र
10
गौतम गंभीर टीम इंडियाचा नवा कोच! द्रविडची रिप्लेसमेंट म्हणून BCCI प्रयत्नशील
11
शरीरातील बॅड कोलेस्टेरॉल कमी करण्यासाठी रामबाण आहे हळद आणि तुळस! असा करा वापर
12
मी माझा मुलगा तुमच्याकडे सोपवतेय, तो तुम्हाला निराश करणार नाही; रायबरेलीत सोनिया गांधी भावूक
13
Fact Check: पंतप्रधान मोदींच्या विजयाचा दावा करणारा राहुल गांधींचा 'तो' Video एडिटेड!
14
चांदीचा विक्रम, ₹86271 वर पोहोचली; सोनं घसरलं! पटापट चेक करा लेटेस्ट रेट
15
ममता बॅनर्जी आणि अभिषेक बॅनर्जी यांना जीवे मारण्याची धमकी!
16
दिल्ली मद्य घोटाळा; ED ने अरविंद केजरीवालांसह AAP विरोधात दाखल केली चार्जशीट
17
'नरेंद्र मोदींना आता जिल्हा परिषद, ग्रामपंचायतींच्या वॉर्डनिहाय सभांचं निमंत्रण दिलं पाहिजे', ठाकरे गटाचा टोला
18
भन्साळींच्या 'बाजीराव मस्तानी'साठी अलका कुबल यांनी दिलेलं ऑडिशन; 'या' एका गोष्टीमुळे गमावला सिनेमा
19
...अन् आम्ही काय करू शकतो हे जगाला दाखवून दिलं; जय शाह यांनी सांगितली पॉवर
20
"मी निवृत्त झालो नाही किंवा...", ब्रिजभूषण शरण सिंहांच्या वक्तव्याबाबत लोकांमध्ये चर्चा 

पदाधिकार्‍याची लेखाधिकार्‍याशी खडाखडी

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 22, 2017 11:12 PM

महासभेने मागील दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांबाबत आयुक्तांनीही अनुकूलता दर्शविल्यानंतर सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांनी या कामांच्या निविदा काढण्याची घाई चालविली असून, त्यासाठी मुख्य लेखाधिकाºयासह मुख्य लेखापरीक्षकावर दबाव टाकला जात आहे. त्यातूनच शुक्रवारी (दि. २२) काही पदाधिकाºयांची लेखाधिकाºयासोबत खडाखडी झाल्याची मनपा वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे.

नाशिक : महासभेने मागील दाराने मंजूर केलेल्या २५७ कोटींच्या रस्ते विकासाच्या कामांबाबत आयुक्तांनीही अनुकूलता दर्शविल्यानंतर सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांनी या कामांच्या निविदा काढण्याची घाई चालविली असून, त्यासाठी मुख्य लेखाधिकाºयासह मुख्य लेखापरीक्षकावर दबाव टाकला जात आहे. त्यातूनच शुक्रवारी (दि. २२) काही पदाधिकाºयांची लेखाधिकाºयासोबत खडाखडी झाल्याची मनपा वर्तुळात जोरदार चर्चा सुरू आहे. लेखाधिकाºयाने सदर कामांसाठी निधीची तरतूद करायची कोठून, असा प्रश्न उपस्थित केल्याचे समजते.  महासभेला अंधारात ठेवत सत्ताधारी भाजपाने जादा विषयांच्या माध्यमातून २५७ कोटी रुपयांच्या रस्ते विकासाच्या कामांचा प्रस्ताव मंजूर केला. बेकायदेशीरपणे मंजूर करण्यात आलेल्या या प्रस्तावाला माजी विरोधी पक्षनेता सुधाकर बडगुजर, माजी उपमहापौर गुरुमित बग्गा यांनी लेखीपत्र देऊन आक्षेप नोंदविला, तर शिवसेना, कॉँग्रेस, राष्टÑवादीनेही नंतर त्याला विरोधाची भूमिका दर्शविली. दरम्यान, एकीकडे आयुक्तांकडून सदर कामांसाठी चालू अंदाजपत्रकात तरतूदच नसल्याने पुढील वर्षाच्या अंदाजपत्रकातच कामे प्रस्तावित केली जाणार असल्याचे सांगितले जात होते. परंतु, चार दिवसांपूर्वीच महासभेने ठराव प्रशासनाला पाठविल्यानंतर आयुक्तांनीही या कामांसाठी अनुकूलता दर्शवित आवश्यकतेनुसार प्राधान्यक्रमाने कामे हाती घेण्यात येणार असल्याचे स्पष्ट केले. मात्र, अगोदरपासूनच सदर कामांसाठी निधीची तरतूदच नसल्याचे सांगत लेखा विभागाकडून असमर्थता दर्शविली जात असताना आयुक्तांच्या अनुकूलतेमुळे  सत्ताधारी भाजपातील काही पदाधिकाºयांना उभारी  मिळाली आणि त्यांनी आता कामांच्या निविदा तातडीने काढण्याची घाई चालविली आहे. त्यानुसार, शुक्रवारी मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखा परीक्षकाबरोबर पदाधिकाºयांची खडाखडी झाल्याचे वृत्त आहे. यावेळी सदर पदाधिकाºयाने अन्य कामांबरोबरच डस्टबिन घोटाळ्याबाबतही लेखाधिकाºयाला धारेवर धरल्याचे समजते. खोडा घालू नका एका पदाधिकार्‍याने मुख्य लेखाधिकारी व मुख्य लेखापरीक्षकांना अतिरिक्त आयुक्तांकडे बोलावून घेत त्यांना झापायला सुरुवात केली परंतु, या दोन्हीही अधिकाºयांनी संबंधित पदाधिकाºयाला भीक घातली नाही व नियमानुसारच कामे होतील, असे स्पष्ट केले. यावेळी संबंधित पदाधिकाºयाने कामांमध्ये कोणताही खोडा घालू नका, फाइलीबाबत पॉझिटिव्ह भूमिका घ्या, असा सल्ला देत धमकीवजा इशाराही दिल्याने दिवसभर याच गोष्टीची महापालिकेत चर्चा सुरू होती. पदाधिकाºयांचा प्रशासकीय कामकाजात हस्तक्षेप वाढत चालल्याने अधिकारीवर्ग मेटाकुटीला आला आहे.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाNashikनाशिक