दिंडोरीत स्वच्छता मोहीम

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:47 IST2021-02-05T05:47:36+5:302021-02-05T05:47:36+5:30

सफाई मोहिमेच्या प्रारंभी हरित कायदा पालनाची शपथ उपस्थित नागरिकांना देण्यात आली. शहरातील पालखेड रोड, जि.प शाळा व सार्वजनिक वाचनालय ...

Cleaning campaign in Dindori | दिंडोरीत स्वच्छता मोहीम

दिंडोरीत स्वच्छता मोहीम

सफाई मोहिमेच्या प्रारंभी हरित कायदा पालनाची शपथ उपस्थित नागरिकांना देण्यात आली. शहरातील पालखेड रोड, जि.प शाळा व सार्वजनिक वाचनालय येथे सफाई करण्यात आली. या मोहिमेस दिंडोरी नगरांचायतीच्या अध्यक्षा सौ. रचना जाधव, उपाध्यक्ष कैलास मवाळ, मुख्याधिकारी नागेश येवले, माजी नगराध्यक्ष भाऊसाहेब बोरस्ते सर्व नगरसेवक उपस्थित होते. मोहिमेस पालखेड रोड येथील जि.प. शाळेच्या शिक्षकांचे सहकार्य लाभले. या सफाई मोहिमेचे नियोजन हर्षल बोरस्ते यांनी केले होते. यावेळी नगरपंचयातचे कार्यालय अधीक्षक प्रशांत पोतदार तसेच इतर अधिकारी कर्मचारी उपस्थित होते. सदर मोहिमेत नागरिकांनी मोठ्या प्रमाणात भाग घेतला होता. यावेळी मुख्याधिकाऱ्यांनी नागरिकांनी पर्यावरण रक्षणासाठी स्वतःहून पुढाकार घ्यावा याबाबत मार्गदर्शन केले. तसेच नगरपंचायतच्या वतीने दि २८ जानेवारी रोजी आयोजित केलेल्या सायकल रॅलीतही मोठ्या संख्येने भाग घ्यावा, असे आवाहन केले.

Web Title: Cleaning campaign in Dindori