केबीएच विद्यालयाच्या वर्गमित्रांची २६ वर्षांनी झाली भेट

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: February 5, 2021 05:48 IST2021-02-05T05:48:42+5:302021-02-05T05:48:42+5:30

तीन वर्षांपासून सातत्याने मित्र एकत्र येत आहेत. केबीएच व्हाॅट्सअप ग्रुपच्या १८५ मित्रांमधील आपल्या नोकरी व व्यवसायाला एक दिवसाचा विराम ...

Classmates of KBH Vidyalaya met after 26 years | केबीएच विद्यालयाच्या वर्गमित्रांची २६ वर्षांनी झाली भेट

केबीएच विद्यालयाच्या वर्गमित्रांची २६ वर्षांनी झाली भेट

तीन वर्षांपासून सातत्याने मित्र एकत्र येत आहेत. केबीएच व्हाॅट्सअप ग्रुपच्या १८५ मित्रांमधील आपल्या नोकरी व व्यवसायाला एक दिवसाचा विराम देत जमलेल्या ३५ मित्रांनी आपला परिचय करुन दिला. यावेळी सांस्कृतिक कार्यक्रम व एकमेकांशी मनसोक्त गप्पा-गोष्टी करताना जुन्या आठवणींना उजाळा मिळाला. १९९३ ते २०२१ पर्यंतच्या नोकरी-व्यवसाय व कौटुंबिक सुख-दु:ख प्रसंग कथन करण्यात आले.

नुकताच मृत्यू झालेल्या अजित गायकवाड या मित्राला श्रद्धांजली वाहण्यात आली. तसेच या मित्राच्या परिवाराला सर्व मित्रांनी मिळून एक लाखाची मदत केली. नियोजन ललित पवार, सचिन गांगुर्डे, चंद्रजीत निकम, सचिन निकम यांनी केले. सूत्रसंचलन राहुल येवला यांनी तर आभार निलेश कोठावदे व दिनेश केलार यांनी मानले.

याप्रसंगी राहुल येवला, ललित पवार, सचिन गांगुर्डे, स्वप्नील कासार, सचिन निकम, नितीन भुसे, नीलेश कोठावदे, दिनेश केलार, चंद्रजीत निकम, कैलास दरेकर, सचिन तरवटे, किरण सोनवणे, गिरीश येवले, विजय मिस्तरी, जगदीश पाटील, सचिन घोडके, योगेश वाघ, सुधाकर भामरे, ललित रोहिदास, महेश ठाकरे, जगन्नाथ आहेर, अनिल पटाईत, बाबा पाटील, उमेश पाटील, अमोल शिंदे, विजय जाधव, नरेंद्र ठोके, पंढरीनाथ गांगुर्डे, किशोर मिस्तरी, विशाल शेवाळे आदी मित्र उपस्थित होते.

Web Title: Classmates of KBH Vidyalaya met after 26 years