शहरं
Join us  
Trending Stories
1
पाकिस्तानात 'अज्ञाता'चा पुन्हा थरार; लष्करचा टॉप कमांडर शेख युसूफ अफ्रिदीचा 'खातमा'! नेटवर्कला मोठा धक्का
2
DCM शिंदेंनी केली ‘मिसिंग लिंक’च्या कामाची पाहणी; कोणत्या वाहनांना परवानगी अन् टोल किती?
3
"महिलांना वर्षाला ३६०००, प्रत्येक घुसखोराला हाकलून लावणार अन् TMC..."; पंतप्रधान मोदींची मोठी घोषणा
4
भूषण गवई-धीरेंद्र शास्त्री भेटीवरून टीका, CM फडणवीसांनी सुनावले; म्हणाले, “श्याम मानव कोण?”
5
साई सुदर्शनचा जलवा; ऋतुराजची जिगरबाज खेळी व्यर्थ! चेपॉकच्या मैदानात गुजरातनं उडवला चेन्नईचा धुव्वा
6
जय श्रीराम! आता मुंबईतून अयोध्या गाठणे सुलभ, अमृत भारत ट्रेन सुरू होणार; पाहा, थांबे-वेळा
7
जयपूरच्या राजघराण्यातील 'सुपरकॉम्प्युटर'चा लंडनमध्ये लिलाव; १७व्या शतकातील यंत्र आजही कार्यरत...
8
आता ‘वंदे भारत बुलेट ट्रेन’ येणार, बंगळुरूत बांधणी; ICF-BEMLवर जबाबदारी, रेल्वेची मेगा योजना!
9
महाराष्ट्र बोर्ड १२ वीचा निकाल कोणत्याही क्षणी! डिजीलॉकरवर 'Coming Soon' चे संकेत; निकाल पाहण्यासाठी 'हे' डिटेल्स ठेवा तयार
10
हरभजन सिंगविरोधात रोष, भाजपत प्रवेश केला म्हणून घरावर लिहिलं 'गद्दार'; बघा VIDEO
11
‘आप’ने दणके द्यायला सुरुवात केली; हरभजन सिंगची सुरक्षा काढली, पंजाब मान सरकारची नाराजी उघड
12
“छत्रपती शिवाजी महाराज कधी थकले नाहीत, झुकले नाहीत”; राऊतांचा धीरेंद्र शास्त्रींवर पलटवार
13
आपली बस, आपली सेवा…! ST प्रवाशांसाठी मोठे पाऊल; १ मे पासून ‘लालपरी’चे नवे अभियान होणार सुरू
14
“लोकशाहीत हिंसाचाराला थारा नाही”; वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरणी PM मोदींची प्रतिक्रिया
15
“ST ग्रामीण भागाची जीवनवाहिनी, विलिनीकरणाबाबात महायुती सरकार गप्प का?”: विजय वडेट्टीवार
16
वॉशिंग्टन हॉटेल गोळीबार प्रकरण, ट्रम्प यांची मोठी प्रतिक्रिया; इराण युद्धाशी संबंध जोडत म्हणाले…
17
Ruturaj Gaikwad चा संघर्ष संपला! CSK संकटात असताना पुणेकराचा ‘वन मॅन आर्मी’ शो
18
एकनिष्ठ राहिलेले...! मायक्रोसॉफ्ट जुन्या-जाणत्यांना नोकरीवरून काढणार; नोकरी सोडा नाहीतर स्वेच्छानिवृत्ती घ्या... 
19
बँकेतून काढलेले १५ लाख घरी ठेवले आणि नंतर जमा केले; आयकर विभागाने कर लावला, महिलेने दाद मागितली...
20
Vaibhav Suryavanshi Injury : विक्रमी सेंच्युरीनंतर वैभव सूर्यवंशी दुखापतग्रस्त; तो पुढील सामन्यात खेळणार का?
Daily Top 2Weekly Top 5

त्रिशंकू जिल्हा परिषदेत सेनेचा सत्तेसाठी दावा

By admin | Updated: February 24, 2017 02:56 IST

निवडणुकीनंतर : भाजपा, कॉँग्रेस, राष्ट्रवादीवर आत्मपरीक्षणाची वेळ

 श्याम बागुल नाशिकनाशिक : दीड दशक सत्तेवर असलेल्या राष्ट्रवादीच्या जशा जागा घटल्या, तसेच कॉँग्रेसलाही मतदारांनी चौथ्या क्रमांकावर फेकत जिल्हा परिषदेत सेनेला सर्वाधिक जागा दिल्या खऱ्या; पण सत्ता स्थापनेसाठी भाजपाची मदत घेण्याची वेळ सेनेवर आणून ठेवल्याने आगामी पाच वर्षे जिल्हा परिषदेत सत्तेचा खेळ खेळण्यास सर्वपक्षीयांना मुभा मिळणार आहे. गेल्या निवडणुकीत शिवसेनेच्या अधिकृत १८ व एक अपक्ष पुरस्कृत मिळून १९ जागा होत्या. त्या जागांमध्ये सहाने वाढ होऊन यंदा २५ जागा झाल्या आहे. ‘मिशन- ४१’ प्लसचा नारा दिलेल्या भाजपाला मात्र अवघ्या १५ जागांवरच समाधान मानावे लागले आहे. विशेष म्हणजे ग्रामीण भागात तीन मंत्री व एक खासदार मैदानात उतरूनही भाजपाला ‘मिशन- ४१’ प्लस गाठता आले नाही. संघनात्मक पातळीवरील नादारीमुळे हे अपयश आले. शिवसेनेने तिकीट वाटपात नाशिक, निफाड व नांदगावला गडबड केल्याने शिवसेनेच्या जागा वाढू न शकल्याची जबाबदारी तिन्ही जिल्हाप्रमुखांवर येते. अर्थातच शिवसेना आपल्याशिवाय आहेच कोण याच अविर्भावात होती,त्याचाही फटका बसला. पित्याच्या पावलावर पाऊल ठेवत राजकारणात पाऊल ठेवू पाहणारे अजिंक्य हेमंत गोडसे व समीर हरिश्चंद्र चव्हाण या दोघा खासदारपुत्रांची पावले पदार्पणातच अडखळली आहेत. पाच वर्षे सत्तेत असलेल्या राष्ट्रवादीची अवस्था त्यामानाने एकटेपणाची होती. भुजबळ तुरुंगात असल्यामुळे त्यांच्याशिवाय निवडणुकीला सामोरे गेलेल्या राष्ट्रवादीने जागा घटणार नाही याची काळजी घेत, निवडून येण्याची क्षमता ठेवणाऱ्यांनाच उमेदवारी दिली होती.जिल्ह्यात सर्व प्रथम याच पक्षाने गटवार मेळावे घेतले होते. त्यामुळे पक्षाच्या गेल्या निवडणुकीच्या तुलनेत आठ जागा कमी होऊन १९ जागांवर समाधान मानावे लागले. चारवरून अकरापर्यंत पोहोचलेल्या भारतीय जनता पक्षाला मिनी मंत्रालयात ‘अच्छे दिन’ येणे अवघडच आहे. सेनेशी साथसंगत झाली तरच आणि तरच त्यांना सत्तेत सहभागी होता येईल, नाही तर मुंबईचा निकाल पाहता ‘मातोश्री’चा कल स्वबळावर लहान- मोठ्या पक्षांची जोडतोड करून आणि निवडून आलेल्या चार-दोन अपक्षांची मोट बांधून जिल्हा परिषदेवर भगवा फडकविण्याकडे राहील, यात शंका नाही. या निवडणुकीत पहिल्यांदाच माकपाच्या सुरगाणा बाले किल्ल्याला राष्ट्रवादी, शिवसेना व भाजपाच्या अनोख्या रणनीतीने हट्टी गटात दणका बसला. सातत्याने सुरगाण्यावर वर्चस्व असलेल्या माकपाला त्यांच्या हक्काचा एक गट घालवावा लागला आहे. कॉँग्रेसने त्यांच्या अस्तित्वासाठी जिल्हा परिषद निवडणूक लढविली, त्यांच्या पदरात सात जागा मिळाल्या, त्या पक्षाच्या नव्हे तर त्या त्या उमेदवारांच्या प्रयत्नांची पराकाष्ठा म्हणावी लागेल.