शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सांगलीच्या ‘करेक्ट’ कार्यक्रमामुळे राष्ट्रवादी काॅंग्रेसची घसरगुंडी !
5
प्रचाराच्या रणधुमाळीदरम्यान मुंबईतील भांडुपमधून तीन कोटींची रोकड जप्त, तपास सुरू
6
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
7
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
8
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
9
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
10
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
11
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
12
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
13
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
14
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
15
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
16
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
17
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
18
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
19
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
20
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया

शहर १२६ : जिल्ह्याचा कोरोनाबाधितांचा आकडा पोहचला ९९९ वर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: May 26, 2020 8:38 PM

नाशिककरांनी आता लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेणे तत्काळ थांबवून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची गरज आहे.

नाशिक : जिल्ह्यात कोरोनाग्रस्तांचा आकडा मंगळवारी (दि.२६) ९९९ वर पोहचला आहे. तसेच नाशिक शहरात कोरोनाबाधितांची संख्या मंगळवारी संध्याकाळी १२६ इतकी झाली. पाच दिवसांपुर्वी शहरात ४८ कोरोनाबाधित रूग्ण होते, यावरून शहरात कोरोना विषाणूच्या फैलावाचा वेगाचा अंदाज सहज लावता येऊ शकतो. नाशिककरांनी आता लॉकडाउन शिथिलतेचा गैरफायदा घेणे तत्काळ थांबवून काटेकोरपणे नियमांचे पालन करण्याची गरज आहे.शहरातील उच्चभ्रू वसाहतीत राहणाऱ्या ग्रामीण पोलीस मुख्यालयातील पोलीस हवालदाराचा कोरोनाने मंगळवारी मृत्यू झाला. तसेच ठाणे येथील रहिवासी असलेला वाहनचालक हा कोरोनाग्रस्त रुग्ण शहरात उपचारासाठी दाखल होता, त्याचाही मंगळवारी जिल्हा रुग्णालयात मृत्यू झाला. वडाळागावात कोरोनाग्रस्त रूग्ण आढळून येण्याचा सिलसिला अद्यापही सुरूच आहे. मंगळवारी पुन्हा एक नवा रूग्ण वडाळागावात मिळून आला. वडाळागावाचा कोरोनाग्रस्तांचा आकडा आता १० झाला आहे. मंगळवारी संध्याकाळी आलेल्या अहवालानुसार १० रुग्णांची भर पडली. दिंडोरी रोड-२, सिडको-१, पखालरोड-१, वडाळा-१, अमृतधाम परिसर-१, टाकळीरोड-१, क्रांतीनगर-१, हनुमाननगर-१, नाशिकरोड पाट रस्ता-१ याप्रमाणे दहा रुग्ण आढळून आाले आहे.शहरातदेखील कोरोना आजाराचा फैलाव आता वेग धरू लागला आहे. यामध्ये गावठाण भागात आता कोरोनाचा शिरकाव अधिक चिंताजनक ठरणारा आहे. जुने नाशिक, शिवाजीवाडी झोपडपट्टी, क्रांतीनगर, रामनगर-पेठरोड, वडाळागाव या भागात होणारा फैलाव धोक्याची घंटा आहे. वडाळागावातील सादिकनगर, मुमताजनगर, आलिशान सोसा. हा परिसरर कन्टेंन्मेट झोन आहे.शहरातील झोपडपट्टया अद्याप कोरोनाच्या संक्रमणापासून सुरक्षित होत्या; मात्र गुरूवारपासून काही झोपडपट्टयांमध्येही कोरोनाबाधित रूग्ण आढळून येऊ लागल्याने आता भीती वाढली आहे. मनपा आरोग्यप्रशासनापुढे कोरोनाचे संक्रमण झोपडपट्टयांमध्ये तसेच गावठाण भागात रोखण्याचे मोठे आव्हान उभे ठाकले आहे. यासाठी प्रशासनाला नागरिकांच्या सहकार्याची मोठी गरज आहे. सुजाण नागरिक म्हणून प्रत्येकाने आपले कर्तव्य पार पाडावे.नागरिकांनी लॉकडाउनचे सर्व नियम पाळणे बंधनकारक आहे. नागरिकांनी घराबाहेर पडू नये, अत्यावश्यक गरज असल्यास तोंडाला मास्क लावून परस्परांमधील अंतर राखून घराबाहेर पडावे, तत्काळ काम आटोपून पुन्हा घरात जावे, लहान मुले, वृध्द व्यक्तींची अधिकाधिक काळजी घ्यावी, घरातदेखील वारंवार आपले हात साबणाने स्वच्छ धुवावीत अशा विविध सुचना ध्वनीक्षेपकावरून संपुर्ण परिसरात दिल्या जात होत्या. 

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस