त्र्यंबकेश्वर : येथील जुना अखाड्याच्या निलपर्वतावरील निलांबिका मटम्बा मातेच्या दर्शना बरोबरच शम्भु पंच दशनाम जुना तथा भैरव अखाड्याचे अखिल भारतीय संरक्षक महंत तथा अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री श्रीमहंत हरिगिरीजी महाराज यांच्या दर्शनासाठी सुप्रसिध्द सिने चरित्र अभिनेते पुनीत इस्सार यांनी भेट दिली.
गो माता संत महिमा व पालघर हत्याकांडावर आधारीत हिंदी फिल्म संघार (संहार) या चित्रपटातील मुख्य कलाकार पुनीत इस्सार यांनी आज त्र्यंबकेश्वर मध्ये निलपर्वतावर भेट दिली. यावेळी जुना आखाड्याच्या इष्ट देवता गुरु देव दत्तात्रेय मंदिर येथे देव दर्शन घेत साधू महंत यांचे आशीर्वाद घेतले.अखिल भारतीय अखाडा परिषदेचे महामंत्री तथा अ.भा.जुना अखाडा संरक्षक महंत हरिगिरीजी महाराज यांनी अभिनेता पुनीत इस्सार यांनी संघार चित्रपटाच्या पार्श्वभूमीवर येथे दर्शन व साधूंचे आशीर्वाद घेण्यासाठी त्र्यंबकेश्वर येथे भेट दिली. ते जुना अखाड्याचे एक महामंडलेश्वर ब्रम्हलिन प्रकाशानंदगिरीजी महाराज यांच्या षोड श कार्यक्रमाच्या निमित्ताने हरिद्वार येथुन त्र्यंबकेश्वर येथे आले होते. ही माहिती अभिनेता पुनीत इस्सार यांना समजल्या वरुन ते खास त्र्यंबकेश्वर येथे येउन महाराजांची भेट घेतली. असे उपस्थित पत्रकारांना सांगितले. महाभारत या धार्मिक धारावाहिक मधील युधिष्ठिर म्हणून पुनीत इस्सार घराघरात पोहचलेले आहेत. नुकतेच नवी दिल्लीत संघार या चित्रपटाचे पोस्टर विमोचन गत सप्ताहात झाले. या वेळी श्रीपंच दशनाम जुना आखाड्याचे वरिष्ठ पदाधिकारी उपस्थित होते.आज त्र्यंबकेश्वर मध्ये अभिनेता पुनीत इस्सर यांनी पालघर हत्याकांडात मृत पावलेले त्र्यंबकेश्वरचे दोन ब्रम्हलीन महंत कल्पवृक्ष गिरीजी महाराज व सुशील गिरीजी महाराज यांच्या समाधीचे आश्रमात दर्शन घेतले भारतीय संस्कृतीत संतांचा महिमा गो मातेचे स्थान व पालघर घटना अन्याय यांचे वर हा चित्रपट असून दोन महिन्यात हा चित्रपट प्रसिद्ध होणार आहे अशी महिती पुनीत इस्सर यांनी दिली नुकतेच पालघर मध्ये शिटिंग झालेत्र्यंबकेश्वर आखाडा परिषदेचे अध्यक्ष स्वामी सागरानंद सरस्वतीजी महाराज आचार्य सभेचे महामंत्री स्वामी परमानंद सरस्वती जी महाराज महामंडलेश्वर परमानंद गिरीजी महाराज महामंडलेश्वर शिवगिरीजी महाराज महामंडलेश्वर शिवानंद गिरीजी महाराज आनंद आखाड्याचे शंकरानंद सरस्वतीजी गिरीजनन्द महाराजअटल आखाड्याचे महंत उदयगिरीजी महाराज माजी खा महेश गिरी आखाड्याचे पुरोहितत्रिविक्रम शास्त्री जोशी इ उपस्थित होते निल पर्वतावरील व महामंडलेश्वर नगर साधू हजर होतेया शिवाय श्री पंच दशनाम जुना आखाडा सचिव श्रीमहंत वासूदेव यती महंत शिवानंद पुरी महंत सहजानंद गिरी ठाणपती विष्णू गिरी ठाणा पती नीलकंठ गिरी रजनीश पुरी सुखदेव गिरी बालक गिरी चंद्रा नंद सरस्वती राकेश गिरी बीलास गिरी साध्वी शारदा गिरी साध्वी उमा गिरी इ साधू गण उपस्थित होते मोबाइल मधून चित्रपटाच्या टायटल साँगची धून ऐकविण्यात आलीनगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनीही त्यांचे स्वागत केले. तसेच त्र्यंबकेश्वरचे नगराध्यक्ष पुरुषोत्तम लोहगावकर यांनी हरिगिरीजी महाराजांची भेट घेउन त्यांचे स्वागत केले.या वेळी त्यांचे सहकारी हर्षल शिखरे कुणाल तथा सनी उगले आदी नगरसेवक उपस्थित होते. महंत हरिगिरी महाराज यांचे शिष्य रविंद्र गमे निलंबिका मंदिर पुजारी सतीश दशपुत्र आदी उपस्थित होते.