सिडकोत जुगार अड्ड्यावर छापा : ३७ जुगारी ताब्यात

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: November 17, 2018 22:47 IST2018-11-17T22:46:56+5:302018-11-17T22:47:18+5:30

सिडको : सिडकोतील दत्तचौक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास छापा टाकून ३७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४४ हजार रुपयांची रोकड व १२ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

Cidcoat gambling raid: 37 gambar possession | सिडकोत जुगार अड्ड्यावर छापा : ३७ जुगारी ताब्यात

सिडकोत जुगार अड्ड्यावर छापा : ३७ जुगारी ताब्यात

ठळक मुद्दे ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त

सिडको : सिडकोतील दत्तचौक परिसरातील जुगार अड्ड्यावर पोलिसांनी शुक्रवारी (दि़१६) रात्रीच्या सुमारास छापा टाकून ३७ जुगाऱ्यांना ताब्यात घेतले असून त्यांच्याकडून ४४ हजार रुपयांची रोकड व १२ हजार रुपयांचे जुगाराचे साहित्य असा एकूण ५७ हजार रुपयांचा ऐवज जप्त केला.

शहर पोलीस आयुक्तालयातील परिमंडळ दोनचे पोलीस उपायुक्त श्रीकृष्ण कोकाटे यांना दत्त चौकात जुगार सुरू असल्याची माहिती मिळाली होती़ या माहितीवरून अंबडचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक सोमनाथ तांबे, सहायक पोलीस निरीक्षक खडके, पोलीस नाईक गवारे, जोपळे, संजीव जाधव, दोबाडे, बर्डे, देवरे, फूलमाळी, देवरे यांनी मटण मार्केटमागे सुरू असलेल्या जुगार अड्ड्यावर छापा टाकला़ याठिकाणी संशयित सचिन शेख,आकाश झाडे, गोकुळ कुमावत, शमीम शेख, सागर कांबळे, अहमद हुसेन, राजू चितळे यांच्यासह ३७ जण पैशांवर जुगार खेळत होते़ त्यामध्ये भारतनगर , सिडको, लोकमान्यनगर, शिवाजी चौक, राजरत्ननगर, गणेशचौक, गजानन चौक, पेठरोड, इंदिरा गांधी वसाहत क्रमांक १ व २, भारतनगर, शिवपुरी चौक, मोरवाडी, राणेनगर, कालभैरव चौक, महाराणा प्रताप चौक या भागातील जुगाºयांचा समावेश होता़

पोलिसांनी या संशयितांकडून ४४ हजार ७० रुपये रोख व १२ हजार ८२० रुपयांचे जुगाराचे साहित्य जप्त केले. याप्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात मुंबई जुगार प्रतिबंधक कायद्यान्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे़

Web Title: Cidcoat gambling raid: 37 gambar possession