नाशकात दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: January 25, 2020 19:54 IST2020-01-25T19:51:01+5:302020-01-25T19:54:22+5:30
भागातील भागातील जेलरोड सिंधी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलमधून खाली पडून एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.

नाशकात दुसऱ्या मजल्यावरून पडल्याने चिमुरडीचा मृत्यू
नाशिक : नाशिकरोडच्या जेलरोड भागातील सिंधी कॉलनीमध्ये दुसऱ्या मजल्यावरील गॅलरीच्या ग्रीलमधून खाली पडून एका तेरा महिन्याच्या चिमुकलीचा दुर्देवी अंत झाल्याने परिसरात हळहळ व्यक्त होत आहे.
जेलरोड सिंधी कॉलनी येथे दुसऱ्या मजल्यावर राहणारे व्यापारी कल्पेश तारवाणी व त्याचे सर्व कुटुंब शुक्रवारी (दि.२४) सकाळी साडेअकराच्या सुमारास घरात होते. यावेळी त्यांची तेरा वर्षांची चिमुकली अशिका कल्पेश तारवाणी ही रेंगाळत गॅलरीमध्ये आली. गॅलरीत एकटीच खेळत असताना अचानक आशिका ही अचानक गॅलरीला लावलेल्या लोखंडी ग्रीलच्या फटीतून तोल जाऊन खाली कोसळली. ही घटाना इमारतीत काम करण्यास आलेल्या मोलकरणींच्या लक्षात येताच तिने कटुंबियांना या घटनेची महिती दिल्यानंतर अशिकाला तातडीने जखमी अवस्थेत उपचारासाठी खाजगी रुग्णालयात दाखल करण्यात आले. तिच्यावर उपचार सुरू असताना सायंकाळी तिचे निधन झाले. अशिकाचा अशाप्रकारे दुदैर्वी मृत्यू झाल्याने तारवाणी कुटुंबियांवर दुखाचा डोंगर कोसळला असून या घटनेमुळे परिसरात सर्वत्र हळहळ व्यक्त होत आहे. कल्पेश तारवाणी त्यांच्या विवाहानंतर आठ ते नऊ वर्षांनी त्यांना पहिले कन्या रत्न आशिकाच्या रुपाने प्राप्त झाले होते. याप्रकरणी उपनगर पोलीस ठाण्यात अकस्मात मृत्यूची नोंद करण्यात आली आहे.