शहरं
Join us  
Trending Stories
1
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
2
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
3
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
4
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
5
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
6
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
7
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
8
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
9
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
10
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
11
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
12
RCB साठी जीव तोडून खेळला; मग MI च्या जखमेवर फुंकर घालत क्रुणाल म्हणाला, "तो काळ माझ्यासाठी…"
13
"आपल्याकडे परिस्थिती नियंत्रणात पण..."; मुख्यमंत्री फडणवीसांनी केलं इंधन आणि गॅस बचतीचं आवाहन
14
IPL 2026 : ट्विस्टवर ट्विस्ट! शेवटच्या चेंडूवर RCB नं जिंकली मॅच; MI प्लेऑफ्सच्या शर्यतीतून OUT
15
"...त्यामुळे, माझ्यासोबत येणंच उत्तम!"; पंतप्रधान मोदींची तेलंगणाचे मुख्यमंत्री रेवंत रेड्डी यांना खास ऑफर; बघा नेमकं काय घडलं?
16
पुणे-नाशिक महामार्ग सलग दुसऱ्या दिवशी 'जाम'; लग्नसराई आणि विकेंडमुळे प्रवाशांचे प्रचंड हाल
17
"चर्चा म्हणजे शरणागती नाही!" इराणच्या राष्ट्राध्यक्षांचा अमेरिकेला थेट इशारा; मोज्तबा खामेनीही अ‍ॅक्शन मोडमध्ये!
18
कुटुंबासाठी धोकादायक ठरू शकतात 'या' ५ लोकप्रिय कार! क्रॅश टेस्टमध्ये केवळ ० ते १ रेटिंग; तुमची कार सुरक्षित आहे का?
19
"...तर ममता बॅनर्जी यांना जेलमध्ये जावे लागेल!" बंगाल पराभवानंतर का भडकले TMC चे निलंबित नेते रिजू दत्ता? साधला थेट निशाणा
20
उर्विल पटेलची विक्रमी खेळी! अशक्यप्राय लक्ष्याचा पाठलाग करत CSK नं LSG ला स्पर्धेबाहेर काढलं
Daily Top 2Weekly Top 5

मुलाविरूध्द बलात्काराच्या खोट्या गुन्ह्याची धमकी; पित्याची आत्महत्या

By admin | Updated: January 7, 2017 18:54 IST

दोघा महिलांनी पंचवटी परिसरातील एका इसमास वारंवार फोनवरुन धमकावत मुलाविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याने सदर इसमाने आत्महत्या केली.

ऑनलाइन लोकमत
नाशिक, दि. ७ -  पुणे व धुळे शहरात राहणा-या दोघा महिलांनी पंचवटी परिसरातील एका इसमास वारंवार फोनवरुन धमकावत मुलाविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करण्याची धमकी देत मानसिक छळ केल्याने सदर इसमाने आत्महत्या केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे.
 
याबाबत पोलिसांनी दिलेली माहिती अशी, म्हसरूळ परिसरातील पुष्पकनगरमधील  विश्वेश्वर अपार्टमेंटमध्ये रेखा अनिल खैरनार या कुटुंबासमवेत राहता. त्यांचे पती अनिल शांताराम खैरनार (५४) यांना पुणे व धुळे मध्ये राहणाºया दोघा महिलांनी वारंवार फोन करुन मानसिक त्रास दिला . तसेच ‘तुझा मुलाविरुध्द बलात्काराचा खोटा गुन्हा दाखल करु व आम्ही आत्महत्त्या करु’ अशी धमकी दिली. मुलाच्या बदनामीच्या भीतीपोटी अनिल खैरनार यांनी २२ नोव्हेंबर रोजी यांनी आत्महत्त्या केली. पतीच्या निधनानंतर सर्व धार्मिक विधी पूर्ण झाल्यानंतर रेखा यांनी म्हसरूळ पोलीस ठाणे गाठून पूण्याची संशयित महिला पुनम रविंद्र बुवा तर धुळे येथील साळुंके (पूर्ण नाव माहित नाही) या दोघींविरुध्द मानसिक छळ करत आत्महत्त्येस प्रवृत्त केल्याचा गुन्हा शुक्रवारी (दि.६) रात्री साडे दहा वाजता दाखल केला.
 
संशयित दोन्ही महिलांकडून वारंवार अनिल यांना फोनवरुन धमकाविले जात होते. त्यांच्याकडून होत असलेल्या मानसिक त्रासाला कंटाळून माझे पती अनिल खैरनार यांनी आत्महत्त्या केल्याचे रेखा यांनी फिर्यादीत म्हटले आहे. याप्रकरणी अधिक तपास म्हसरूळ पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरिक्षक बेडवाल करीत आहेत.