शहरं
Join us  
Trending Stories
1
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
2
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
3
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य
4
'मुंबईकरांचे योद्धे' संसदेत जाणार, उज्ज्वल निकमांचा विक्रमी मतांनी विजय होणार - शेलार
5
मुंबई इंडियन्स प्ले ऑफच्या शर्यतीतून बाद? दिल्ली कॅपिटल्सच्या विजयाने Point Table बदलले
6
साताऱ्यात वातावरण तापणार; शनिवार-रविवारची सुटी हेरून गुन्हा दाखल केल्याची एपीएमसीत चर्चा
7
“आईचे निधन पण मोदी तातडीने देशसेवेत, आईच्या पदराखाली राहून राजकारण करणारा नको”: CM शिंदे
8
७० वर्षांत काहीच झाले नाही, मग १० वर्षे तुम्ही काय केले; प्रियंका गांधींचा PM मोदींना सवाल
9
चार दिवसांपासून उत्तराखंडचे जंगल धुमसतेय; सैन्याच्या छावणीपर्यंत पोहोचला वणवा, हेलिकॉप्टर उडाली
10
ट्रोलिंग केल्यास, दोन महिने थेट तुरूंगात टाका! महेश मांजरेकरांचा सरकारला सल्ला
11
शरद पवारांचे साताऱ्याचे उमेदवार अडचणीत; शशिकांत शिंदेंवर आणखी एका घोटाळ्यात एफआयआर
12
शशिकांत शिंदेंना अटक झाली तर महाराष्ट्रात संघर्ष करू; शरद पवार यांचा इशारा
13
माझा 'भाव' विचारला, महिलांचा अपमान केला, मी श्वास घेते हेही काँग्रेसला त्रासदायक; कंगना भावूक
14
राहुल गांधी रामललाचे दर्शन घेणार? “लोकसभा निवडणुकांमुळे राम मंदिर आठवले”; भाजपाची टीका
15
“महाराष्ट्र काँग्रेस ठाकरे गटात विलीन झाल्यास आश्चर्य वाटायला नको”; संजय निरुपम यांची टीका
16
Ohh Shit! रोहित शर्माने धाव पूर्ण होताच रिषभ पंतला मारला जोरात धक्का अन्... 
17
रिषभ पंतवर मुंबईचा कर्णधार हार्दिक पांड्या खवळला, अम्पायरकडे तक्रार करताना दिसला
18
“PM मोदींनी शेतकऱ्यांसाठी मोठे निर्णय घेतले, काँग्रेसने फक्त चॉकलेट दाखवले”; फडणवीसांची टीका
19
"हमासच्या दहशतवाद्याने अंगठी देऊन मला प्रपोज केलं अन् म्हणाला..."; तरूणीने सांगितला भयानक किस्सा
20
शिरूरमध्ये अटीतटीची लढाई, वळसे पाटील लवकरच मैदानात; आढळरावांबद्दल म्हणाले...

Child Kidnapping Rumours :धुळ्याच्या घटनेची मालेगावात पुनरावृत्ती, मुलं पळवल्याच्या संशयावरुन 5 जणांना मारहाण

By ऑनलाइन लोकमत | Published: July 02, 2018 7:55 AM

मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांची हत्या केल्याची घटना ताजी असतानाच मालेगावमध्येही असाच काहीसा प्रकार घडला आहे.

नाशिक (मालेगाव) - मुले पळवणाऱ्या टोळीच्या संशयातून धुळ्यात जमावाने पाच जणांना बेदम मारहाण केल्याच्या घटनेची पुनरावृत्ती नाशिकमधील मालेगावातही झाली आहे.  मुले पळवणारी टोळी असल्याच्या संशयातून मालेगावात संतप्त जमावाने चार जणांना मारहाण केल्याची घटना समोर आली आहे. आझाद नगर परिसरात ही घटना घडली आहे. मुले पळवणारी टोळी समजून परभणी जिल्ह्यातील दोघांना जमावाकडून जबर मारहाण करण्यात आले. या दोघांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. गजानन साहेबराव गिरे आणि सिंधूबाई साहेबराव गिरे अशी ताब्यात घेण्यात आलेल्या दोघांची नावं आहेत. 

दरम्यान, आणखी तीन जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे.  एकूण पाच जणांना पोलिसांनी ताब्यात घेतले आहे. तत्पूर्वी शहरात मुले पळविणारी टोळी आल्याची अफवा रात्री पसरताच जमाव अधिक आक्रमक झाला होता. जमावाने पोलिसांच्या वाहनांचीही तोडफोड केली. याममुळे मालेगावात नाशिकहून अधिक पोलिसांची कुमक मागवण्यात आली. यावेळी  जमावावर सौम्य लाठीचार्जही करण्यात आला.

 

दरम्यान, धुळ्यात मुले पळवणारी टोळी समजून संतप्त जमावानं 5 जणांना बेदम मारहाण केली, या घटनेत त्या पाचही जणांचा मृत्यू झाला. याप्रकरणी आतापर्यंत 23 जणांना अटक करण्यात आली आहे. 

 

(धुळ्यात मुले पळवणारे समजून 5 जणांची हत्या)दरम्यान, किडनी काढण्यासाठी लहान मुले पळविणारी टोळी गावात आल्याच्या अफवेचे भूत डोक्यात संचारलेल्या ग्रामस्थांनी रविवारी (1 जुलै) साक्री तालुक्यातील राईनपाडा येथील आठवडा बाजारात 5 जणांना जबर मारहाण करून ठार केले. हे सर्व जण ज्योतिष सांगून उपजीविका करणारे भटक्या समाजातील होते. ते सोलापूर जिल्ह्यातील मंगळवेढ्याहून आले होते. मारहाण करत या संशयितांना ग्रामपंचायत कार्यालयात कोंडण्यात आले. तेथेच जमावाने दगडाने ठेचून, लाठ्या-काठ्यांनी जबर मारहाण करीत त्यांना ठार मारले. दादाराव शंकर भोसले (४५), भारत शंकर भोसले (४५), राजू भोसले (४५), भारत माळवे (४७, सर्व रा. खवे ता. मंगळवेढा, जि. सोलापूर) आणि आगनू भोसले (२२, रा. मानेवाडी ता. मंगळवेढा) यांना दगड व काठ्यांनी ठेचून क्रूरपणे मारले.

क्रौर्याची परिसीमा गाठलेल्या या घटनेत पोलिसांनी हस्तक्षेप करण्याआधीच पाचही जणांची जबर मारहाणीने ओळखूही येणार नाही, अशी रक्तबंबाळ अवस्था झाली होती. पोलीस येताच जमावाने त्यांच्याकडेही मोर्चा वळविला. मारहाणीत दोन पोलीस जखमी झाले. जमावातील काही जणांनी या घटनाक्रमाचा काढलेला व्हिडीओ व्हायरल झाला. त्यात गावकऱ्यांच्या अंगात अक्षरश: राक्षस संचारल्याचे स्पष्ट दिसत होते. त्या व्हिडीओमधून ओळख पटवून संध्याकाळपर्यंत पोलिसांनी २० जणांना अटक केली.

टॅग्स :Child Kidnapping Rumoursबालकांचे अपहरण अफवाCrimeगुन्हाNashikनाशिकDhuleधुळेPoliceपोलिस