Child dies after drowning in river basin | नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू

नदीपात्रात बुडून मुलाचा मृत्यू

नांदूरवैद्य : इगतपुरी तालुक्यातील घोटी शहरातील तेली गल्ली येथील १५ वर्षीय मुलाचा नदीपात्रात बुडून मृत्यू झाल्याची घटना रविवार (दि.२४) घडली. गोकुळ (शंकर) रतन आव्हाड असे या मुलाचे नाव आहे. गोकुळ त्याच्या मित्रांसोबत कांचनगाव येथील दारणा नदीपात्रात अंघोळ करण्यासाठी उतरला होता. खोलीचा अंदाज न आल्याने बुडून त्यांचा मृत्यू झाला. सहायक पोलीस निरीक्षक जालिंदर पळे यांनी स्थानिक पट्टीचे पोहणारे बोलावले. काही तासात गोकुळचा मृतदेह शोधण्यात यश आले. घोटी ग्रामीण रु ग्णालयात शवविच्छेदन करून मृतदेह कुटुंबीयांच्या ताब्यात देण्यात आला.

Web Title: Child dies after drowning in river basin

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.