शहरं
Join us  
Trending Stories
1
पेट्रोल-डिझेलचे दर वाढणार? ३०००० कोटीवर पोहोचला तेल कंपन्यांचा तोटा; रोज ७०० कोटींचा फटका
2
निदा खानला लपवण्यात AIMIM नगरसेवक सामील?; CM देवेंद्र फडणवीसांचे मोठे विधान, म्हणाले...
3
"आमच्या पक्षात कुणीही 'एकनाथ शिंदे' नाही!"; असं का म्हणाले मुख्यमंत्री उमर अब्दुल्ला? भाजपवर थेट हल्ला
4
"आता बंगालमध्ये..."; मुख्यमंत्रीपदी निवड होताच शुभेंदू अधिकारी यांची पहिली प्रतिक्रिया, काय म्हणाले...?
5
टाटा समुहाचा 'दिग्गज' शेअर बनला रॉकेट; रेखा झुनझुनवालांच्या संपत्तीत एका दिवसात १३०० कोटींची वाढ! खास गिफ्ट देण्याच्या तयारीत कंपनी
6
अमित शाह यांनी पश्चिम बंगालच्या जनतेला दिले ५ मोठे शब्द; म्हणाले, “भाजपा वचने पूर्ण करणारच”
7
लैंगिक अत्याचाराच्या प्रकरणात महेश आहेरची पोलीस कोठडीत रवानगी, भाेदू अशाेक खरातशीही कनेक्शन
8
कोण आहेत पश्चिम बंगालचे भावी मुख्यमंत्री शुभेंदू अधिकारी? शिक्षण काय? जाणून घ्या, कॉलेज ते डिग्रीपर्यंत सविस्तर
9
“घुसखोरांना शोधून देशाबाहेर काढणार, ३२१ जणांचे बलिदान व्यर्थ नाही जाणार”: अमित शाह
10
नाशिक TCS प्रकरण: निदा खानला ११ मे पर्यंत पोलीस कोठडी; AIMIM नगरसेवक मतीन पटेलवरही गुन्हा
11
“AIMIM पक्षावरच बंदी घाला”; ठाकरे गटाची मोठी मागणी, निदा खानला अटक होताच नेते आक्रमक
12
मुहूर्त ठरला! उद्या सकाळी ११ वाजता विजय होणार तामिळनाडूचा CM; राज्यपालांचे सरकार स्थापनेचे निमंत्रण
13
वर्ल्डकप विजेता श्रीलंकन क्रिकेटर अरविंदा डी सिल्वाच्या घरी सापडला बड्या CEOचा मृतदेह
14
Latest Marathi News LIVE: संदेशखाली प्रकरणाची सखोल चौकशी करून दोषींवर कठोर कारवाई करण्यात येईल - शुभेंदू अधिकारी
15
"देशभर दंगली घडवण्याचं भाजपचं षडयंत्र, प. बंगाल ही त्याची सुरुवात"; काँग्रेसचा गंभीर आरोप
16
Video - “तू स्वप्न पूर्ण कर, मी घर सांभाळते”; सुनेच्या पंखांना सासूचं बळ; खाकी वर्दीसाठी धडपड
17
“डिअर प्रेसिडेंट डोनाल्ड ट्रम्प...”; राऊतांचे थेट अमेरिकन राष्ट्राध्यक्षांना पत्र, कारण काय?
18
बाई... काय प्रकार? रात्री मृत घोषित केलेली महिला सकाळी उठून बसली; नातेवाईक-गावकरी चक्रावले!
19
४ नंबर लकी, राहु महादशा-शनि दृष्टी, राजकारणात प्रचंड गती; तामिळनाडूचा CM बनणार विजय थलपती...
20
“धर्मवीर आनंद दिघे यांच्या नावे राज्यात उभारले जाणार ६० ‘ट्रॅफिक गार्डन्स’”: प्रताप सरनाईक
Daily Top 2Weekly Top 5

माफक वीजदरासाठी धोरण निश्चित करणार : मुख्यमंत्री

By admin | Updated: December 27, 2014 01:40 IST

महाराष्ट्र वीज कामगार महासंघ सुवर्ण महोत्सवी कार्यक्रमात प्रतिपादन

नाशिक : इतर राज्यांच्या तुलनेत महाराष्ट्रात विजेचे दर जास्त आहेत; राज्यातील उद्योगाला चालना देण्यासाठी तसेच ग्राहकांनाही माफक दरात वीज मिळावी यासाठी धोरण निश्चित करण्याचा प्रयत्न केला जाईल, असे प्रतिपादन मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी केले. विजेचे वाढते दर हे महाराष्ट्रासमोर मोठे आव्हान असल्याचा पुनरुच्चार त्यांनी यावेळी केला.
म्हसरूळरोडवरील देवधर महाविद्यालयाच्या प्रांगणात आयोजित भारतीय मजदूर संघ संलग्न महाराष्ट्र वीज कामगार महासंघाच्या सुवर्ण महोत्सवी अधिवेशनप्रसंगी ते बोलत होते. व्यासपीठावर खासदार हरिश्चंद्र चव्हाण, आमदार देवयानी फरांदे, बाळासाहेब सानप, सीमा हिरे, भारतीय मजदूर महासंघाचे उपाध्यक्ष के. लक्ष्मा रेड्डी, महाराष्ट्र वीज कामगार महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई, प्रभाकर बाणासुरे, महावितरणचे व्यवस्थापकीय संचालक अजय मेहता, के. के. हरदास, एस. एन. देशपांडे, अख्तर हुसेन उपस्थित होते. अधिवेशनाचे उद्घाटन मुख्यमंत्र्यांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून करण्यात आले.
यावेळी मुख्यमंत्री म्हणाले, उद्योजक, व्यापारी आणि ग्राहकांना स्वत दरात वीज मिळाली पाहिजे अशी आपली भूमिका आहे. त्यामुळे वीजदर कसे कमी करता येतील यासाठी
केवळ शासनावरच अवलंबून चालणार नाही तर वीज कंपनी आणि कर्मचाऱ्यांचे सहकार्यदेखील महत्त्वाचे ठरणार आहे.
महाराष्ट्रातील विजेचे दर हे इतर राज्यांच्या तुलनेत अधिक आहेत. त्यामुळेच उद्योजक महाराष्ट्रामध्ये गुंतवणूक करीत नाहीत, ही परिस्थिती बदलण्यासाठी भूमिका घेतली जाईल. महाराष्ट्रात उद्योजकांची गुंतवणूक वाढली पाहिजे यासाठी वीज दर कमी करणे महत्त्वाचे आहे. शेतकऱ्यांना देण्यात येणाऱ्या कृषी सबसिडीमुळे सुमारे आठ हजार कोंटींचा भार उद्योजकांवर पडतो. ही विसंगती दूर होणे अपेक्षित असल्याचेही मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस म्हणाले.
विजेची गळती ही सर्वांत मोठी अडचण कंपनीसमोर आहे. आज विजेच्या क्षेत्रात मोठे आव्हान निर्माण होत आहेत. जोपर्यंत आपण विजेची गळती कमी करीत नाही तोपर्यंत आपण स्पर्धा करू शकणार नाही असेही ते म्हणाले.
वीज क्षेत्रात आपल्या तीन कंपन्या असल्या तरी त्या एकच आहेत, केवळ कंपनीकडे बोटे दाखवून चालणार नाही तर कर्मचाऱ्यांनीदेखील आपली कार्यकुशलता आणि क्षमतेतून या कंपन्यांना हातभार लावला पाहिजे. शासन, कंपनी आणि कर्मचारी म्हणून आपणा सर्वांची ही जबाबदारी आहे. तसे झाले तरच आपण ग्राहकांना माफक दरात वीज उपलब्ध करून देऊ शकू, असेही फडणवीस म्हणाले.
प्रारंभी महासंघाच्या वतीने मुख्यमंत्र्यांसह आलेल्या पाहुण्यांचा सत्कार करण्यात आला. महासंघाचे अध्यक्ष अण्णा देसाई यांनी प्रास्ताविक केले. त्यांनी कर्मचाऱ्यांसमोर असलेली आव्हाने आणि कंपन्यांचा कारभार याविषयी भूमिका मांडली. (प्रतिनिधी)