शहरं
Join us  
Trending Stories
1
Vaibhav Suryavanshi : फक्त १६ चेंडू खेळला अन् हवा करून गेला! वर्ल्ड रेकॉर्ड थोडक्यात हुकला, पण...
2
मोठी बातमी : भाजपचं धक्कातंत्र! विधान परिषद निवडणुकीसाठी ५ जणांची यादी जाहीर, कुणाला मिळाली संधी?
3
पोलीस आयुक्तांचा धडाकेबाज निर्णय, एकाच दिवसात ४० शस्त्र परवाने रद्द 
4
मंत्री उदय सामंत अंतरवाली सराटीत मनोज जरांगे यांच्या भेटीला, एक तास चर्चा; कारण काय?
5
निवडणूक संपताच पेट्रोल-डिझेल महागणार? केंद्र सरकारनं दिलं मोठं स्पष्टीकरण! काय होणार?
6
नागपूर भाजप शहराध्यक्ष तिवारींचा मोबाईल हॅक, आरोपींकडून लोकांना पैशांची मागणी
7
PBKS vs RR : वैभव-यशस्वीचा धमाका; फरेरा-दुबेचा फिनिशिंग टच! राजस्थानने रोखला पंजाबचा विजयरथ
8
भाजपचे धक्कातंत्र, विदर्भातून प्रस्थापितांऐवजी सहकारतज्ज्ञ संजय भेंडेंना संधी; ‘मायक्रो प्लॅनर’ म्हणून आहे ओळख
9
१ मे पासून खिशाला कात्री! बँकिंगसह 'हे' मोठे नियम बदलणार; गॅस सिलिंडर स्वस्त होणार की महागणार?
10
PBKS vs RR : 'वंडर बॉय' वैभव सूर्यवंशीनं धु धु धुतलं! मग अर्शदीपनं लो फुलटॉसवर हिशोब केला चुकता
11
‘मुंबई-पुणे एक्स्प्रेस वे’ मिसिंग लिंकवर किती स्पीडने जाता येणार?; वेगमर्यादेची नियमावली आली!
12
विदर्भात १ मे पर्यंत पावसाळी ढग; पारा खाली येणार, पण उष्णतेची तीव्रता कायम राहणार
13
गुजरातमध्ये BJPचा डंका! १५ महानगरपालिकांवर कमळ फुलले; आप-काँग्रेस आपटले, कुणाला किती जागा?
14
PBKS vs RR: परफेक्ट सेटअप! १५० kmph वेगवान चेंडूसह पुन्हा प्रियांश आर्यवर भारी पडला जोफ्रा (VIDEO)
15
"हे 'सेल्फ रेडिकलायझेशन'चं प्रकरण, जिहाद करायचा म्हणजे..."; मिरा रोड हल्ल्यासंदर्भात मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस स्पष्टच बोलले
16
इराण-अमेरिका युद्धात UAE चा मोठा निर्णय; OPEC आणि OPEC+ गटातून बाहेर पडणार
17
म्हाडाच्या २६४० घरांच्या लॉटरीला मुदतवाढ; १४ मे पर्यंत अर्ज सादर करण्याची मुदत
18
१३६३५७ घन मीटर क्षमता, गायब होते LNG टँकर जहाज; अचानक भारताजवळ दिसले, महिनाभर कुठे होते?
19
इंडियन एअरलाईन बंद पडण्याची शक्यता! इंधनाच्या दरवाढीमुळे सरकारकडे मदतीची याचना; संघटनेकडे साकडे
20
Fastest Chase In IPL History : जे मुंबई इंडियन्सनं करून दाखवलं ते १८ वर्षांत कुणालाच नाही जमलं
Daily Top 2Weekly Top 5

पंचवीस लाखांच्या बक्षिसाच्या आमिषाने फसवणूक

By admin | Updated: February 26, 2017 22:51 IST

नाशिक : पंचवीस लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडकोतील एका महिलेच्या विविध बँक खात्यातून सुमारे साडेचार लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक परिसरात उघडकीस आला आहे़

नाशिक : पंचवीस लाखांचे बक्षीस लागल्याचे आमिष दाखवून सिडकोतील एका महिलेच्या विविध बँक खात्यातून सुमारे साडेचार लाख रुपये काढून घेत फसवणूक केल्याचा प्रकार स्टेट बँक परिसरात उघडकीस आला आहे़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे़  अंबड पोलीस ठाण्यात मोहिनी विजय टकले (रा. प्रेमनगर सोसायटी, स्टेट बँक चौक, सिडको) यांनी दिलेल्या फिर्यादीनुसार ५ ते १६ फेब्रुवारी २०१७ या कालावधीत संशयित रविकुमार व आरती शर्मा (पूर्ण नाव व पत्ता माहिती नाही) यांनी दोन वेगवेगळ्या मोबाइलवरून टकले यांच्या मोबाइलवर संपर्क साधला़ या दोघांनीही टकले यांना २५ लाखांचे बक्षीस लागल्याचे सांगून ही रक्कम परदेशी चलनात असल्याचे सांगितले़ तसेच बक्षिसाची रक्कम प्राप्त करण्यासाठी प्रक्रिया पूर्ण करावी लागणार असल्याचे सांगून स्टेट बँक आॅफ इंडिया, बँक आॅफ महाराष्ट्र व राणेनगर येथील अ‍ॅक्सिस बँकेच्या खात्यांची माहिती घेऊन त्यावर ४ लाख ३७ हजार रुपयांची रक्कम भरण्यास सांगितली़  मोहिनी टकले यांनी संशयित रविकुमार व आरती शर्मा यांनी सांगितलेल्या बँकामध्ये तब्बल चार लाख ३७ हजार रुपयांचा भरणा केला़ मात्र आपली फसवणूक झाल्याचे लक्षात येताच टकले यांनी शनिवारी (दि़२५) अंबड पोलीस ठाणे गाठून फसवणुकीची फिर्याद दिली़ (प्रतिनिधी)