शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
MI vs PBKS : वर्ल्ड चॅम्पियन कॅप्टन सूर्याला बाकावर बसवणार? सलग चौथ्या पराभवानंतर काय म्हणाला पांड्या?
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
MI vs PBKS : विकेट मिळेना; त्यात सोपा झेल सोडला! जिथं प्रभसिमरन चमकला, तिथं बुमराह ‘खलनायक' ठरला
5
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
6
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
7
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
8
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
9
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
10
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
11
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
12
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
13
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
14
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
15
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
16
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
17
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
18
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
19
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
20
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
Daily Top 2Weekly Top 5

स्वस्तात भोजन, प्रवास आणि फुकटात गॅस लायटर !

By admin | Updated: February 21, 2017 00:57 IST

हटके फंडे : मतदानाची टक्केवारी वाढविण्यासाठी योजना

नाशिक : महापालिका निवडणुकीसाठी मतदानाचा टक्का वाढावा यासाठी प्रशासनानाचे प्रयत्न सुरू असतानाच अनेक खासगी संस्था, व्यावसायिक आस्थापनाही पुढे सरसावल्या आहेत. त्यातून स्वस्तात भोजन आणि प्रवास करण्याबरोबरच फुकटात लायटर मिळण्याची व्यवस्था आहे. या शिवाय एका वैद्यकीय संस्थेने एमआरआय आणि सीटी स्कॅन यावर दहा टक्के सवलत देण्याची घोषणा केली आहे.  मतदाना हे राष्ट्रीय कर्तव्य असले तरी साधारणत: मतदानापेक्षा त्यादिवशी मिळालेली सुट्टी आनंदात घालविण्यावर कल असतो. मतदान नाही केले तर काय होते? असा प्रश्न करून सहलीवर जाणाऱ्या कुटुंबांची संख्या अधिक असते. त्यामुळे मतदानाचे पवित्र कर्तव्य पार पाडावे यासाठी निवडणूक आयोग आणि नाशिक महापालिका यांच्या वतीने प्रयत्न केले जात आहेत. त्यानुसार जनजागृती फेऱ्याही काढण्यात आल्या. त्यानंतर आता अनेक सेवाभावी संस्था आणि खासगी व्यावसायिकही मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी उतरले आहेत. नाशिक जिल्हा हॉटेल असोसिएशनने मतदान करणाऱ्यांना प्रोत्साहन म्हणून भोजनाच्या बिलात दहा टक्के सवलत देण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, त्यासाठी मतदान केल्याबद्दल बोटावरील शाई दाखवावी लागणार आहे. नाशिकमध्ये टॅक्सी सेवा देणाऱ्या कंपनीने मतदारांना मतदानासाठी जायचे असल्यास प्रवासी भाड्यात काही प्रमाणात सवलत देणार असल्याचे जाहीर केले आहे, तर पंचवटीतील अमृतधाम येथील बाफणा बाजारच्या संचालकांनी व्होट करा, बोट दाखवा आणि कुटुंबासाठी एक गॅस लायटर फुकटात मिळवा, अशी योजना जाहीर केली आहे. पदवीधर मतदारसंघासाठी शिक्षित मतदारांनीही कमी मतदान केल्याने त्यांनी ही योजना सकाळी नऊ ते रात्री नऊ या वेळात जाहीर केली आहे. नाशिकच्या एका एकपडदा चित्रपट गृहात तर मतदान केल्यानंतर मतदाराने पुरावा सादर केल्यास चित्रपटाच्या तिकिटदरात २० टक्के सवलत देण्याचे संबंधितांनी जाहीर केले आहे. (प्रतिनिधी)