चासच्या उपसरपंचपदी वसंत आव्हाड बिनविरोध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: December 3, 2019 10:13 PM2019-12-03T22:13:10+5:302019-12-03T22:17:06+5:30

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत माधव आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.

Chavan's Vice-Chancellor unopposed | चासच्या उपसरपंचपदी वसंत आव्हाड बिनविरोध

चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत आव्हाड यांची बिनविरोध निवड झाल्याबद्दल सत्कार करताना सरपंच बबनराव खैरनार. समवेत नंदा भाबड, बंडुनाना भाबड, अशोक खैरनार, संजय खैरनार, सचिन बिडगर, सुनील भाबड, विश्वास भाबड, हरिदास भालेराव, प्रमिला संजय खैरनार, संगीता भाबड, संगीता भालेराव, चंदुबाई मेंगाळ, चंद्रशेखर खैरनार, बळवंता उघडे आदी.

Next
ठळक मुद्देसहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला

नांदूरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील भोजापूर खोरे परिसरातील चास ग्रामपंचायतीच्या उपसरपंचपदी वसंत माधव आव्हाड यांची बिनविरोध निवड करण्यात आली.
उपसरपंच किसनाबाई खैरनार यांनी सहकारी सदस्यांना संधी मिळावी म्हणून पदाचा राजीनामा दिला होता. रिक्त जागेसाठी निवडणूक कार्यक्रम जाहीर झाला होता
सरपंच नंदा भाबड यांच्या अध्यक्षतेखाली ग्रामपंचायत कार्यालयात मंगळवारी (दि. ३) सकाळी ११ वाजता निवडणूक प्रक्रि या पार पडली. ग्रामविस्तार अधिकारी एस. जी. ढालपे यांच्या उपस्थित झालेल्या बैठकीत नामनिर्देशनपत्र दाखल करण्याच्या वेळेत आव्हाड यांचा एकमेव अर्ज दाखल झाल्याने उपसरपंचपदासाठी त्यांच्या नावाची घोषणा करण्यात आली. भाबड यांच्या उमेदवारी अर्जावर सूचक म्हणून बळवंता उघडे यांनी स्वाक्षरी केली होती.
बैठकीस ग्रामपंचायत सदस्य किसनाबाई खैरनार, प्रमिला खैरनार, संगिता भाबड, संगीता भालेराव, चंदुबाई मेंगाळ, चंद्रशेखर खैरनार, बळवंता उघडे आदी सदस्य उपस्थित होते. नवनिर्वाचित उपसरपंच आव्हाड यांचा तंटामुक्तीचे अध्यक्ष बबन खैरनार यांच्या हस्ते सत्कार करण्यात आला.
यावेळी माजी सरपंच बंडुनाना भाबड, बाजार समितीचे माजी सभापती अशोक खैरनार, संचालक संजय खैरनार, सचिन बिडगर, सुनिल भाबड, विश्वास भाबड, हरिदास भालेराव, दिपक भाबड, दशरथ खैरनार, भारत भाबड, एकनाथ भाबड, रामदास भाबड, बाळासाहेब बिडगर, हसन सय्यद, सदाशिव बिडगर, रमेश भाबड आदींसह ग्रामस्थ उपस्थित होते.

Web Title: Chavan's Vice-Chancellor unopposed

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.