शहरं
Join us  
Trending Stories
1
"'केम छो वरली' म्हणणाऱ्या आदित्य ठाकरेंना आता मराठी मतांसाठी..."; मनसेचा पलटवार
2
...तर नरेंद्र मोदी आणि अमित शहा महाराष्ट्र चालवणार? संजय राऊतांचा ठाण्यातून हल्लाबोल
3
Smriti Irani : "पाकिस्तान आणि राहुल गांधींचा नेमका काय संबंध आहे?"; स्मृती इराणींचा खोचक सवाल
4
Sanju Samson Controversy : हे वागणं बरं नव्हं! सॅमसनचा पारा चढला पण झाली मोठी कारवाई
5
एअर इंडियाच्या पायलट, क्रू मेंबर्सच्या नोकऱ्या धोक्यात? अचानक ७८ फ्लाईट रद्द, प्रवासी खोळंबले
6
पाकिस्ताननं बांगड्या भरल्या नाहीत, इंडिया आघाडीचे नेते फारुख अब्दुल्ला यांचं विधान
7
पावसाचे थैमान! हैदराबादमध्ये घराची भिंत कोसळून 4 वर्षांच्या मुलासह 7 जणांचा मृत्यू
8
'महाराष्ट्राची हास्यजत्रा'मधून गौरव मोरेची Exit! म्हणाला - "मला खूप वाईट वाटतंय की..."
9
AstraZeneca जगभरातून कोरोनाची लस घेत आहे मागे; नव्या खुलासानंतर कंपनीचे मोठे पाऊल
10
२ शत्रू ग्रह अस्तंगत: ३ राशींना लाभच लाभ, ३ राशींना काहीसा संमिश्र काळ; कसा असेल प्रभाव?
11
Family Savings : भारतीय कुटुंबांचं 'सेव्हिंग' ५ वर्षांच्या नीचांकी पातळीवर, आता कर्ज घेऊन चालवतायत काम
12
Aadhar Housing Finance IPO: आजपासून खुला झाला Blackstone च्या कंपनीचा आयपीओ, पाहा डिटेल्स 
13
शरद पवारांचा पक्ष काँग्रेसमध्ये विलीन होणार?; एक मुलाखत अन् राजकीय चर्चांना उधाण
14
...अन् विलासराव देशमुखांमुळे रितेशची झाली मराठी सिनेमात एन्ट्री, अभिनेत्याने केला खुलासा
15
भाग्यवान! मतदाराचं अचानक फळफळलं नशीब; लकी ड्रॉमध्ये जिंकला हिऱ्याची अंगठी
16
‘१३ तारखेला मोदी सरकारचे तीन तेरा वाजवायचेत, तर ४ जूनला विसर्जन’, उद्धव ठाकरेंचा हल्लाबोल
17
आदित्य ठाकरेंचा भाजपा-मनसेवर हल्लाबोल; "ज्यांनी परप्रांतीयांना मारलं अशा मनसेचा..."
18
'या' चुकांमुळे बुडालं Anil Ambani यांचं साम्राज्य, पाहा टीना अंबानी आता काय करतात? किती आहे संपत्ती
19
बसपा प्रमुख मायावतींनी केली मोठी कारवाई, आनंद मोहन यांना राष्ट्रीय समन्वयक पदावरून हटवले
20
Opening Bell: सेन्सेक्स-निफ्टीच्या कामकाजाची घसरणीसह सुरुवात; कोल इंडियात तेजी, HDFC Bank घसरला

नाशिककरांना ‘चटका’ : तापमानात सातत्याने वाढ; पारा पोहचला ४२.८ अंशावर

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 28, 2019 6:07 PM

नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे.

ठळक मुद्देसोमवारपर्यंत (दि.२९) उष्णतेची लाट कायम राहणार नाशिककरांना ‘मे’ची धास्ती

नाशिक : मागील दहा वर्षांमध्ये नोंदविल्या गेलेल्या कमाल तापमानाचा विक्रम शनिवारी (दि.२७) मागे पडला. मागील आठवडाभरापासून सूर्य आग ओकू लागल्याने नाशिककर अक्षरक्ष: भाजून निघाले आहेत. रविवारीसायंकाळी साडेपाच वाजता हवामान केंद्राकडून ४२.८ अंश इतके उच्चांकी तापमान नोंदविले गेले. आठवडाभरापासून शहरवासीयांना उन्हाच्या कडाक्याने हैराण केले आहे. प्रशांत महासागरामध्ये निर्माण झालेल्या कमी दाबाच्या पट्ट्याने तापमानात वाढ झाली आहे. समुद्रकिनाऱ्यावर चार ते पाच अंशांनी तापमान वाढल्याने उष्णतेची लाट मध्य-उत्तर महाराष्टÑासह विदर्भात मोठ्या प्रमाणात जाणवत आहे.मुंबईच्या कुलाबा वेधशाळेने सोमवारपर्यंत (दि.२९) उष्णतेची लाट कायम राहणार असल्याचा इशारा दिला आहे. त्यामुळे नाशिककरांना उन्हाचा दाह सोसवेनासा झाला आहे. नाशिक, अहमदनगर, जळगाव, सोलापूर, सांगली या जिल्ह्यांमध्ये या चार दिवसांपासून उष्णतेची लाट अधिक तीव्र स्वरूपात जाणवत आहे. त्यामुळे उष्माघाताचा धोका वाढला आहे. उन्हाच्या तीव्रतेपासून बचाव करण्यासाठी घरगुती उपाययोजनांवर भर द्यावा, असे आवाहन जिल्हा प्रशासनाकडून करण्यात आले आहे.बुधवारपासून नाशिककर कडक्याच्या उन्हाचा सामना करत आहेत. ३८ अंशांवरून तापमानाचा पारा थेट चाळिशीपार पोहोचला. ४०.९ अंश इतके तापमान बुधवारी नोंदविले गेले तर गुरुवारी काहीअंशी घट होऊन पारा ४०.५ अंशांवर स्थिरावला; मात्र शुक्रवारपासून अचानकपणे वातावरणात कमालीचा उष्मा वाढल्याने मागील दहा वर्षांपेक्षा अधिक तापमान शनिवार व रविवारी नोंदविले गेले.---नाशिककरांना ‘मे’ची धास्तीअवघ्या चार दिवसांनंतर मे महिना उजाडणार असून, या महिन्यातील उन्हाच्या तीव्रतेची नाशिककरांनी धास्ती घेतली आहे. कारण एप्रिलअखेर पारा ४१.७ अंशांपर्यंत अर्थात ४२ अंशांच्या जवळपास पोहचल्याची नोंद झाली. मे महिन्यात ऊन अधिक वाढते, त्यामुळे तापमान ४४ ते ४५अंशांपर्यंत पोहचण्याची भीती नागकिरांमधून व्यक्त होऊ लागली आहे. मागील चार वर्षांच्या तुलनेत यावर्षी नाशिककरांना उन्हाचा अधिक तीव्र तडाखा बसू लागला आहे.--अशी घ्या खबरदारीउन्हात बाहेर पडताना काळ्या रंगाचे कपडे परिधान करणे टाळावे.नखशिखांत पांढरे शुभ्र कपड्यांचा वापर व हॅटसारखी पसरट टोपी डोक्यावर परिधान करावी.बाजारपेठेत फिरताना किंवा दुचाकीवरून मार्केटिंगसारखी कामे करताना थंडपेय पिणे टाळावे.सूर्य मध्यावर आला असता कष्टाची कामे थांबवावी.शेतीची कामे दुपारी बारा वाजेपर्यंत आटोपून विश्रांती घ्यावी.तेलकट व बाहेरचे खाद्यपदार्थ खाणे टाळावे.शरीरात पाण्याची मात्रा कमी होणार नाही, याबाबत काळजी घ्यावी.ताप, डोकेदुखी, उलट्या यांसारख्या शारीरिक तक्रारींकडे दुर्लक्ष करू नये. 

 

टॅग्स :NashikनाशिकSummer Specialसमर स्पेशलHeat Strokeउष्माघातweatherहवामानTemperatureतापमान