शहरं
Join us  
Trending Stories
1
Nepal Plane Fire: नेपाळमध्ये काळ आला होता, पण वेळ आली नव्हती! लँडिंग दरम्यान विमानाच्या टायरला आग; २८९ प्रवाशांचे प्राण थोडक्यात वाचले
2
'असदुद्दीन ओवेसी हे ओसामा बिन लादेनसारखेच, त्यांच्यात काही फरक नाही', मंत्री नितेश राणेंचे विधान
3
मोदींचं आवाहन, पेट्रोलियम मंत्र्यांनी मांडलं गणित, देशात पेट्रोल, डिझेलचे दर भडकणार, किमती एवढ्या रुपयांनी वाढणार
4
भारतीय रणरागिणींचा सुवर्णवेध! शांघाय तिरंदाजी विश्वचषकात जिंकलं गोल्ड, यजमान चीनचा उडवला धुव्वा
5
Keralam CM: केरळचे मुख्यमंत्रिपद कोणाला मिळणार, महाराष्ट्राचे प्रभारी चेन्निथलांसह तीन नेत्यांच्या नावांची चर्चा
6
हंटाव्हायरसच्या विळख्यात सापडलेले जहाज अखेर स्पेनमध्ये पोहोचले, युद्धपातळीवर मोहीम
7
'वंदे मातरम्' : मुख्यमंत्री विजय यांच्या चालीने भाजप बॅकफूटवर; बंगालमध्ये भाजपकडून उच्चार नाही
8
SBI च्या गुंतवणूकदारांना ₹४४,७२२ कोटींचं नुकसान, 'या' कंपन्यांमध्ये पैसा गुंतवणारे झाले मालामाल
9
शेतकऱ्याच्या कांद्याला मिळतात ५० पैसे, ग्राहक मोजतो २५ रुपये; उत्पादन खर्चही निघेना, शेतकऱ्यांचा आक्रोश
10
छत्रपती संभाजीनगर: विहीर ढासळून बापासह दोन मुलांचा मृत्यू, पत्नीने फोडला टाहो; सहा तासांनंतर मृतदेह काढले बाहेर
11
आजचे राशीभविष्य - ११ मे २०२६, कार्यसिद्धीचा दिवस, सामाजिक मान-सन्मान होतील
12
तीन वेळा कार बदलून रुपाली चाकणकर चौकशीला हजर, अशोक खरातप्रकरणी एसआयटीने केली प्रश्नांची सरबत्ती
13
"जगात कोणत्याही देशात कॅश करता येणार प्रॉपर्टी कार्ड; सरकारचा विचार; महाराष्ट्रात लवकरच 'लँड टायटलिंग अ‍ॅक्ट" 
14
'तामिळनाडूत नव्या युगाचा आरंभ'; विजय यांच्याकडून धडाकेबाज निर्णय; तरुण कीर्तनांनी वेधले लक्ष
15
अग्रलेख: मराठीचा अभिमान की आभास? मातृभाषेवरील हे सावट दूर करता येईल
16
Iran US War Update: युद्धविराम मोठ्या संकटात ! मालवाहू जहाजाला आग, कुवेतवर ड्रोन हल्ला
17
विशेष लेख: अमित शाह यांच्या खेळीने ममता बॅनर्जी चारीमुंड्या चीत
18
तामिळनाडू 'विजय'पथावर! मुख्यमंत्रिपदाची शपथ घेताच जनतेला दिले मोफत विजेचे गिफ्ट
19
सोनेखरेदी टाळा, पेट्रोल-डिझेलचा वापर कमी करा, 'वर्क फ्रॉम होम' सुरू करा; पंतप्रधान मोदींचे भारतीयांना आवाहन
20
"इराणचं हसणं आता कायमचं बंद होईल"; ट्रम्प यांचा थेट इशारा; ओबामांनी विमानाने पैसे दिल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

पायाला चटके नि अंगाला फटके

By admin | Updated: January 7, 2017 00:35 IST

पायाला चटके नि अंगाला फटके

पेठ : तळपते ऊन.. तापलेले रस्ते.. पेठ शहराचा भरलेला बाजार या सर्व गोष्टींना छेद करीत ढोलकीच्या तालावर अपंगत्वावर मात करत स्वत:च्या अंगावर चाबकाचे फटके मारून एकेक रु पया जमा करणाऱ्या पोतराजाची जगण्याची परवड कधी दूर होईल, असा सवाल उभा ठाकतो.
आपल्या नशिबी आलेल्या दारिद्र्य, अपंगत्व अथवा
आर्थिक परिस्थितीशी झगडत असताना अनेकजण खचलेले आपणास दिसून येतात. मात्र अशोक तेलगू हा साधारण ३५ वर्षांचा दिव्यांग युवक दारिद्र्यात खितपत पडलेल्या आपल्या फाटक्या संसाराला ठिगळ लावून, टिचभर पोटाची खळगी भरण्यासाठी त्याने चाबूक हाती घेतला. रंगीबेरंगी चिंध्या, कंबरेला व पायात घुंगरू, मळवट भरून एका पायाने अपंग असतानाही गावोगावी भर उन्हात पत्नी वाजवत असलेल्या ढोलच्या तालावर गिरक्या घेत स्वत:ला चाबकाचे फटके मारून एक-दोन रु पये जमा करतात.
अतिशय खडतर परिस्थितीत अपंगत्वावर मात करून संसाराचा गाडा ओढणाऱ्या अशोकने शासनाने आमच्याकडे लक्ष देऊन किमान निवासापुरते घर व लेकरा-बाळांना शिक्षणाची सुविधा उपलब्ध करून द्यावी, अशी माफक अपेक्षा व्यक्त करताना सरकारने आम्हाला आजवर काय दिले, असा प्रश्न विचारून अशोकने
सर्वच बघ्यांना निरुत्तर केले. (वार्ताहर)