शहरं
Join us  
Trending Stories
1
SRH चा 'ई'शानदार विजय! आपल्यासोबत GT लाही मिळवून दिलं प्लेऑफ्सचं तिकीट; CSK चं काय?
2
उद्योगपती गौतम अदानी यांना मोठा दिलासा! अमेरिकेच्या न्याय विभागाने सर्व फौजदारी खटले केले बंद
3
आफ्रिकेत इबोला व्हायरसचा धोका वाढला, भारत सरकार 'अलर्ट मोड'वर, तपासणी अधिक तीव्र
4
पंतप्रधान नरेंद्र मोदी यांना मिळाला नॉर्वेचा सर्वोच्च सन्मान; जगातील ३२वा मानाचा पुरस्कार प्रदान
5
चेन्नई सुपर किंग्सचा डाव संपल्यावर MS धोनी मैदानात उतरला; फोटो सेशनसह त्याचा IPL प्रवास थांबला? (VIDEO)
6
हिंदू बांधव रस्त्यावर पूजा करतात, एअरपोर्टवर गरबा खेळतात, आम्ही काही बोलतो का?- वारिस पठाण
7
संतापजनक! कार-टमटम अपघातात ५ जण गंभीर जखमी; अर्धा तास उलटूनही रुग्णवाहिकेचा पत्ताच नाही...
8
संजूचा आणखी एक पराक्रम! पठ्ठ्यानं MS धोनीचा १३ वर्षांपासून अबाधित असलेला सर्वकालीन विक्रम मोडला
9
मध्यपूर्वेत काही तरी मोठं घडणार? 'या' देशानं सौदी अरेबियामध्ये तैनात केले तब्बल ८००० सैनिक अन् लढाऊ विमानं
10
"तर विनाश अटळ..!" पाकिस्तानची मोठी भविष्यवाणी, जारी केलं निवेदन; PAKला नेमकी कसली भीती?
11
"सूट असो वा नसो..."; अमेरिकन निर्बंधांना भारताचा ठेंगा, छातीठोकपणे रशियाकडून तेल खरेदी करत राहणार!  
12
चालत्या रस्त्यावर किंवा जाममध्ये मागून येणाऱ्या वाहनाने धडक दिली तर चूक नक्की कुणाची? वाचा काय सांगतो ट्रॅफिक नियम
13
गजकेसरी योगात अंगारक विनायक चतुर्थी: ८ राशींची भरभराट, अडकलेला पैसा मिळेल; मेहनतीचे फळ-यश!
14
जिहादपेक्षा डोक्यावरच्या केसांची काळजी! काश्मीरमध्ये घुसलेल्या दहशतवाद्याने करून घेतले 'हेअर ट्रान्सप्लांट'
15
CSK vs SRH : कमांडो म्हणाले; MS धोनी एकदम फिट! चेपॉकवर ऋतुराजनं सांगितली खरी गोष्ट, "तो आमच्यासोबत असला तरी..."
16
१७ राज्यात अलर्ट, १६ तासात वादळी वारे पाऊस; उष्णतेची लाटही राहणार, महाराष्ट्रात अपडेट काय?
17
सनातन धर्मावर विधान, उदयनिधींविरोधात सुप्रीम कोर्टात याचिका; CM विजय यांच्या भूमिकेकडे लक्ष
18
उन्हाळ्यात उसाचा रस आवडीने पिताय? १ ग्लासात ९ चमचे साखर; हेल्दी समजून पिणाऱ्यांनो जर थांबा!
19
Top Marathi News LIVE: CM योगींची दादागिरी, धमक्यांचा काहीही उपयोग होणार नाही- वारिस पठाण
20
नवरीच्या घराजवळच वऱ्हाडाचा भीषण अपघात; पालघरमध्ये १२ जणांचा मृत्यू, ट्रकमध्ये होते १०० वऱ्हाडी
Daily Top 2Weekly Top 5

आरक्षण बदलल्याने समीकरणेही बदलणार

By admin | Updated: October 8, 2016 01:13 IST

मातब्बरांना धक्का : आमने-सामने रंगणार लढती

गोकुळ सोनवणे  सातपूर
आगामी महापालिका निवडणुकीसाठी घोषित करण्यात आलेल्या प्रभागरचनेत प्रभागांची रचना बदलल्याने सातपूरच्या राजकारणाचे समीकरण बदलणार आहे. नवीन प्रभाग रचना आणि आरक्षणामुळे विद्यमान मातब्बर नगरसेवकांमध्ये ‘कही खुशी जादा गम’ अशी स्थिती निर्माण झाली आहे. काहींना प्रभाग रचनेचा तर काहींना आरक्षणाचा फटका बसला आहे. इच्छुकांमध्येदेखील संभ्रमाचे वातावरण पसरले आहे. या निवडणुकीत सातपूरच्या राजकारणातील समीकरणे नक्कीच बदलणार आहेत.
फेब्रुवारी महिन्यात होणाऱ्या महानगरपालिकेच्या सहाव्या पंचवार्षिक निवडणुकीसाठी शुक्र वारी नवीन प्रभागरचना आणि आरक्षण घोषित करण्यात आले. सद्यस्थितीत सात प्रभाग (१४ नगरसेवक) होते. आता चार प्रभाग (१६ नगरसेवक) होणार आहेत. नवीन प्रभागरचनेत काही जुने प्रभाग शाबूत ठेवण्यात आले आहेत. तर काही प्रभागांची मोडतोड करण्यात आली आहे. त्यामुळे काही विद्यमान नगरसेवकांना नेमके कोणत्या प्रभागातून उमेदवारी करावी, असा प्रश्न पडणार आहे. तर काही नगरसेवकांना ही प्रभागरचना पथ्यावर पडली आहे. नवख्या उमेदवारांनादेखील ही प्रभागरचना बुचकळ्यात टाकणारी ठरणार आहे. शिवाय जे काही आरक्षण घोषित करण्यात आले आहे त्याचाही फटका मातब्बर नगरसेवकांना बसला आहे, तर इच्छुक उमेदवारांच्या अपेक्षांवर देखील पाणी फिरणार आहे.
कही खुशी ज्यादा गम ....
या प्रभागरचनेचा सर्वाधिक फायदा विद्यमान नगरसेवक दिनकर पाटील व लता पाटील यांना होणार आहे. तर विलास शिंदे, रेखा बेंडकुळे, विक्र ांत मते, उषा अहिरे यांचे जुने दोन्ही प्रभाग मिळून एक प्रभाग (प्रभाग क्र . ८) तयार करण्यात आला आहे. या नगरसेवकांना एकमेकांच्या विरोधात लढावे लागेल. विद्यमान नगरसेवक शशिकांत जाधव यांचा जुना प्रभाग शाबूत ठेवून नवीन भाग जोडण्यात आला आहे. विद्यमान स्थायी सभापती सलिम शेख यांच्याा प्रभागाची दोन प्रभागात विभागणी करण्यात आली आहे. त्यामुळे शेख यांची डोकेदुखी वाढणार आहे. गेल्या वीस वर्षांपासून नगरसेवक पद भूषविणारे प्रकाश लोंढे यांना आरक्षणाचा फटका बसला आहे. त्यांना अन्य प्रभागातून निवडणूक लढवावी लागेल. विद्यमान नगरसेवक सचिन भोर यांच्या प्रभागाचे विभाजन करण्यात आले आहे. शिवाय त्यांचा बालेकिल्ला सातपूर विभागातून अंबड विभागात जोडण्यात आला आहे.
नूतन प्रभागरचना
प्रभाग क्र मांक ८ (अनुसूचित जाती महिला,अनुसूचित जमाती महिला, ओबीसी, सर्वसाधारण). नरस्ािंहनगर, शंकरनगर, सद्गुरुनगर, खांदवेनगर, सोमेश्वर कॉलनी, संत कबीरनगर, काळेमळा, सावरकरनगर, आनंदवली गावठाण, गंगापूर गावठाण.
प्रभाग क्र मांक ९ (अनुसूचित जाती, ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण). शिवाजीनगर, ध्रुवनगर, श्रमिकनगर, धर्माजी कॉलनी, मोतीवाला कॉलेज.
प्रभाग क्र मांक १० (ओबीसी महिला, सर्वसाधारण महिला, सर्वसाधारण, सर्वसाधारण). पिंपळगाव बहुला, जाधव संकुल, संभाजीनगर, सावरकरनगर, विश्वासनगर, वास्तुनगर, श्रीकृष्णनगर, समतानगर, अशोकनगर, विवेकानंदनगर, राज्य कर्मचारी वसाहत.
प्रभाग क्र मांक ११ (अनुसूचित जाती महिला, अनुसूचित जमाती,ओबीसी, सर्वसाधारण महिला). प्रबुद्धनगर, एमआयडीसी, महाराष्ट्र हौसिंग कॉलनी, संतोषी मातानगर, स्वारबाबानगर, सातपूर गावठाण, राजवाडा, महादेववाडी, कामगारनगर.