शहरं
Join us  
Trending Stories
1
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
2
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
3
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
4
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
5
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
6
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
7
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
8
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
9
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
10
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
11
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
12
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
13
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
14
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
15
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
16
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
17
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
18
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
19
राजकीय फायद्यासाठी महिला आरक्षण विधेयक आणले; प्रियांका गांधींची केंद्र सरकारवर टीका
20
महिलांना लग्नासाठी सोनं, दरमहा २५००, तरुणांसाठीही बरंच काही! बघा, अभिनेता विजय यांच्या जाहीरनाम्यात काय काय खास
Daily Top 2Weekly Top 5

नाशिक-सिन्नर चौपदरीकरण कामात बदल

By admin | Updated: August 19, 2016 00:16 IST

हेमंत गोडसे : विविध कामांसाठी आणखी ३५ कोटींचा निधी मंजूर

 सिन्नर : नाशिक- सिन्नर चौपदरीकरणाच्या कामात जनतेच्या सोयीसाठी बदल सुचविण्यात आले होते. यासाठी केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ३४ कोटी ६२ लाख रुपयांचा निधी मंजूर केला असून व्याप्तीत बदल झाल्याने या रस्त्याच्या बांधकामाची नवीन किंमत सुमारे ३५० कोटी रुपयांची झाली असल्याची माहिती खासदार हेमंत गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. नाशिक-पुणे या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ५० चे चौपदरीकरणाचे काम नाशिक-सिन्नर टोलवेज लि. या उद्योजकाद्वारे केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाच्या अधिपत्याखाली सुरु आहे. सदर कामाच्या व्याप्तीत सिन्नर वळण रस्त्यावर व माळेगाव एमआयडीसी ते नाशिकरोड या रस्त्यावर मंजूर तरतुदींमध्ये जनतेने त्यांच्या सोयीसाठी काही बदल करण्याची मागणी खासदार गोडसे यांच्याकडे केली होती. बदलासाठी प्रस्ताव तयार करुन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाकडे पाठविला होता. चौपदरीकरणाच्या कामासाठी ३१२ कोटी ९६ लाख रुपयांची मंजूरी होती. जनतेने सुचविलेल्या कामाची किंमत ३४ कोटी ६२ लाख रुपये येत होती. त्यामुळे संबंधित खात्याने त्यास असमर्थता दर्शविली होती. सदर कामाच्या व्याप्तीत बदल करण्यात आले आहे़ करुन केंद्रीय रस्ते परिवहन व महामार्ग मंत्रालयाने ३४ कोटी ६२ लाख रुपयांच्या प्रस्तावाला मंजूरी दिल्याची माहिती गोडसे यांनी पत्रकार परिषदेत दिली. (वार्ताहर)