शहरं
Join us  
Trending Stories
1
ट्रम्प यांची 'पीस-डील' धोक्यात! इराणच्या कट्टर धोरणामुळे मध्यपूर्वेत पुन्हा युद्धाचे सावट
2
ट्रम्प यांना खूश करण्यासाठी युक्रेनचा नवा डाव; डोनबासचा काही भाग आता होणार 'डोनीलँड'?
3
‘नाव मोठं लक्षण खोटं’... तरीही LSG संघ मालक संजीव गोयंका यांनी थोपटली रिषभ पंतची पाठ (VIDEO)
4
इराणनं अमेरिकेची नाकाबंदी तोडली, नाकाखालून घेऊन गेला ३४ टँकर्स; ९० कोटी डॉलर्सचं तेल 'होर्मुज'बाहेर! असा दिला चकमा
5
कॅप्टन रियान परागची चाल अन् गोलंदाजांची कमाल! RR नं पंतच्या LSG ला घरच्या मैदानात दिला पराभवाचा दणका
6
उकाड्याने हैराण पुण्यात अचानक पावसाचा वर्षाव; स्वारगेट, शास्त्री रोड परिसरात मध्यम सरी
7
LSG vs RR :अवघ्या ११ धावांत पंतसह तिघांच्या पदरी भोपळा! बडोनीनं स्वतःच्या पायावर मारून घेतली कुऱ्हाड
8
खर्गे मोदींना म्हणाले 'दहशतवादी'; निवडणूक आयोगाची मोठी कारवाई, २४ तासांत मागवलं उत्तर
9
एव्हीएशन सेक्टरमध्ये हाहाकार! या विमान कंपनीने अचानक २०,००० विमानफेऱ्या रद्द केल्या; एवढे काय घडले...?
10
Vaibhav Suryavanshi Fastest 500 : छोट्याखानी खेळीत महारेकॉर्ड! वैभव सूर्यवंशीनं रचला इतिहास
11
मालेगाव बॉम्बस्फोट खटल्यात मोठा निकाल; पुराव्याअभावी ४ आरोपींची निर्दोष मुक्तता!
12
LSG vs RR : शमीचा जलवा! यशस्वीपाठोपाठ ध्रुव जुरेल ठरला झिरो! लगेच संजीव गोएंकांनी काढला फोटो
13
प्रियकर मुलीच्या खोलीतून निघाला; चिडलेल्या बापाने पोटच्या १७ वर्षीय मुलीला संपवले
14
इराण-अमेरिका युद्धाचा फटका आता थेट 'फॅमिली प्लॅनिंग'ला! ३० टक्क्यांपर्यंत वाढू शकतात कंडोम्सचे भाव
15
उल्हासनगर महापालिकेत 'डम्पिंग'वरून रणकंदन; भाजप नगरसेवकांचे ठिय्या आंदोलन
16
कल्याणमध्ये ७० हजार रुपयांचा सायबर क्राईम : हेल्पलाईन तक्रार करुन दाद नाही
17
पाकिस्तानमधून इराणमध्ये दहशतवादी घुसले! रास्क सीमेवर मोठी चकमक; १२ दहशतवादी ठार
18
ममता बॅनर्जींचा हस्तक्षेप लोकशाहीसाठी धोकादायक! आयपॅक-ईडी कारवाईवरून सर्वोच्च न्यायालयाचे ताशेरे
19
WhatsApp वापरता? मग 'हे' सेटिंग्ज माहीतच हवेत; ९०% लोक अजूनही वापरतच नाहीत!
20
Top Marathi News LIVE Updates: बुलढाणा: उपसरपंचाच्या कुटुंबावर हल्ला; पत्नीला विष पाजल्याचा आरोप
Daily Top 2Weekly Top 5

चांदोरीकरांना लागले चित्रीकरणाचे वेध

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 12, 2020 02:00 IST

चांदोरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रीकरणास प्राधान्य दिले आहे. तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना नाशिक व गोदाकाठ परिसर चित्रीकरणासाठी खुणावत आहे.

चांदोरी : मुंबई, पुण्यात कोरोनाचे रुग्ण वाढत असल्याने तेथील मालिका व चित्रपटांचे चित्रीकरण रद्द झाल्याने निर्मात्यांनी सांगली, सातारा परिसरात चित्रीकरणास प्राधान्य दिले आहे. तेथेही अडचणी निर्माण झाल्याने निर्मात्यांना नाशिक व गोदाकाठ परिसर चित्रीकरणासाठी खुणावत आहे.करंजगाव येथे पेशवेकालीन गढी, पुरातन सिद्धेश्वर मंदिर, गोदाघाट, नांदूरमधमेश्वर येथील पक्षी अभयारण्य, धरण, इंग्रजांनी बांधकाम केलेले तसेच अनेक वटवृक्षांच्या सान्निध्यातील विश्रामगृह, चांदोरी येथील गोदावरी नदी व पुरातन मंदिरे, जुनी घरे-वाडे, चांदोरीमधील तीन मजली बुद्धविहार, दारणा सांगवी येथील दारणा-गोदावरीचा संगम, संगमावर असलेले मंदिर तसेच कोठुरे येथे पुरातन बाणेश्वर महादेव मंदिर तसेच रामवमनमार्ग, पेशवेकालीन वाडे आदी चित्रपटांच्या अथवा मालिकांसाठी उपयोगी पडू शकेल, असे सौंदर्य गोदाकाठ भागात आहे. त्यामुळे संपूर्ण गोदाकाठ चित्रीकरणासाठी खुणावत असल्याचे चित्र दिसून येत आहे. नुकतेच इगतपुरी तालुक्यातील वाडीवºहे येथे एका मराठी मालिकेचे चित्रीकरण सुरू झाले असून, आता गोदाकाठीही रोल.. कॅमेरा.. अ‍ॅक्शन...च्या आवाजाची प्रतीक्षा लागली आहे. गोदाकाठ व परिसरात नेहमीच ऊस, द्राक्ष यासह इतरही पिकांचे उत्पादन घेतले जाते. सदैव हिरवाईने बहरलेल्या या भागात अप्रतिम चित्रीकरणाचे सेट उभारता येऊ शकतो, असे ग्रामस्थ व चित्रपटरसिक सांगतात.--------------शंभर वर्षांपूर्वीचा चित्रीकरणाचा इतिहासभारतीय चित्रपटसृष्टीचे जनक दादासाहेब फाळके यांनी कालिया मर्दन हा मूकपट सन १९१९ मध्ये म्हणजेच १०० वर्षांपूर्वी बनवलेला होता. त्याचे चित्रीकरण चांदोरी व सायखेडा आदी गावात झाले होते. तसेच राजदत्त निर्मित वि. दा. सावरकर मालिकेचे चित्रीकरणही चांदोरी गावात झाले. त्यामुळे गोदाकाठ भागाला चित्रीकरणाचा ऐतिहासिक वारसा असल्याचेही ग्रामस्थ सांगतात.--------------------------------------व्यवसायांना चालनाचित्रीकरणासाठी केली जाणारी गोदाकाठची निवड स्थानिक व्यवसायांना चालना देण्यासाठी उपयुक्त ठरणार आहे. राहण्याची व्यवस्था, वाहतूक, जेवण याचबरोबर स्थानिक कलाकारांना यामुळे रोजगार मिळण्यास मदत होईल, असा आशावादही स्थानिक नागरिकांनी व्यक्त केला.-------------सोशल मीडियावर फिरत असलेल्या चांदोरी येथील नदीकाठच्या फोटोमुळे चित्रीकरण करण्याच्या दृष्टीने भेट दिली असता गोदावरीचे वेगळेच रूप पहावयास मिळाले. यापूर्वी नाशिक येथील गोदाघाटावर पीके, बुलेटराजा आदी चित्रपटांचे चित्रीकरण झाले आहे. चांदोरी येथील गोदाघाट सुंदर आणि रमणीय आहे. त्यामुळे तेथेदेखील चित्रीकरणाचा प्रयत्न आहे. -अमित कुलकर्णी, चित्रपट निर्माता

टॅग्स :Nashikनाशिक