शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
3
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
4
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
5
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
6
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
7
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
8
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
9
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
10
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
11
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
12
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
13
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
14
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
15
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
16
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
17
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
18
९ महिने तपास रखडवला, मुलीचा सांगाडाच हाती; २८ पोलीस निलंबित
19
अवैध प्रवासी वाहतूक बेतली जिवावर, ११ जणांचा मृत्यू, कल्याण-मुरबाड महामार्गावर नेमका कसा घडला अपघात?
20
मतदारसंघ पुनर्रचना अत्यंत धोकादायक अन् संविधानावर हल्ला, सोनिया गांधींची टीका
Daily Top 2Weekly Top 5

शिवसेनेपुढे आव्हान

By admin | Updated: February 16, 2017 00:11 IST

चुरस : गटात चौरंगी लक्षवेधी लढत; दिग्गज नेत्यांची प्रतिष्ठा पणाला

महेश गुजराथी चांदवडतालुक्यातील वडाळीभोई जिल्हा परिषद गट हा अनुसूचित जाती महिला आरक्षित झाल्याने सर्वच पक्षाच्या उमेदवारांचे तोंडचे पाणी पळाले होते. त्यांनी दुधाची तहान ताकावर भागवत गणात उभे राहावे लागले होते. योगायोगाने वडाळीभोई गण सर्वसाधारण आहे व सभापतिपदाचे आरक्षणही सर्वसाधारण निघाल्याने गटापेक्षा गणात चुरशीचा सामना होत आहे. येथे दिग्गज नेतेही उभे ठाकले आहेत.वडाळीभोई गट तसा परंपरागत शिवसेनेचा बालेकिल्ला आहे. गत दोन निवडणुकीपासून येथे शिवसेनेचे उमेदवार निवडून येतात. यापूर्वी बंडू गांगुर्डे, कारभारी अहेर यांनी गटाचे नेतृत्व केले आहे. यावेळी पहिल्यापासूनच राष्ट्रवादीच्या उमेदवार ज्योती बाळासाहेब धाकराव, भाजपाच्या अर्चना अनिल जाधव, शिवसेनेच्या कविता भाऊसाहेब धाकराव यांच्यासह भारतीय कम्युनिस्ट पक्षाच्या अलका महेंद्र गवारे यांनी गटात तयारी सुरु केली आहे. गटात चौरंगी सामना होईल असे चित्र असले तरी अपक्ष उमेदवार रुपाबाई कैलास केदारे व अनुसयाबाई हिरामण बोढारे यासुद्धा काही कमी नाही असे दिसते. केदारे यांना भाजपाचे तिकीट मिळेल अशी अपेक्षा असल्याने त्यांनी गटात फॉर्म भरला मात्र तिकीट न मिळाल्याने त्यांनी बंडखोरी केली आहे. वडाळीभोई गटात प्रत्येक निवडणुकीत रस्ते, पाणी, शेतीचा पाणीप्रश्न, बंधारे, एस.टी. बस आदि प्रश्न चर्चिले जातात. निवडणुका आल्या की याच प्रश्नांवर बोलले जाते. मात्र प्रश्न काही सुटत नाही अशी परिस्थिती प्रत्येकवेळी होते. यावेळी कॉँग्रेस व राष्ट्रवादी कॉँग्रेस यांची युती झाल्याने येथील चित्र वेगळे दिसू शकते. मात्र भाजपा व शिवसेना यांची युती तुटल्याने येथे तोडा झोडा ही नीती दिसून येईल अशी चर्चा आहे. तरी नोटाबंदी, चेकचे पैसे न मिळणे, शेतमालाचे पडलेले बाजारभाव, शेती समस्या आदि मुद्दे जिल्हा परिषद निवडणुकीत दिसून येतील, असे चित्र आहे.