शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
'TCS' चा मोठा निर्णय! नाशिक कार्यालय केले बंद; कर्मचाऱ्यांना पुढील आदेशापर्यंत 'वर्क फ्रॉम होम' च्या सूचना
4
ओडिशातून चाललं होतं पाकिस्तानी रॅकेट; ७ आरोपींना ३ वर्षांची कोठडी, 'अशी' व्हायची हेरगिरी
5
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
6
"अखंड भारताची भाषा वापरणारे लोक आज..."; शरद पवार गटाची PM मोदींच्या केंद्र सरकारवर टीका
7
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
8
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
9
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
10
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
11
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
12
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
13
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
14
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
15
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
16
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
17
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
18
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
19
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
20
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
Daily Top 2Weekly Top 5

पोलीस ठाण्यांना लागणारी भ्रष्टाचाराची कीड रोखण्याचे आव्हान

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: December 9, 2019 14:36 IST

पोलीस ठाण्यांमधील अधिका-यांना लागणारी भ्रष्टाचाराची कीड वेळीच संपविण्याचे आव्हान आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांच्या प्रमुखांपुढे उभे राहिले आहे.

ठळक मुद्दे पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? ‘कीड’ संपविण्याचे आव्हानथेट लाचेची मागणी होऊ लागल्याने आश्चर्य

नाशिक : शहर व ग्रामीण पोलीस दलाच्या विविध पोलीस ठाण्यांमध्ये चाललयं तरी काय? असा प्रश्न उपस्थित होत आहे. लागोपाठ दोन वरिष्ठ पोलीस निरीक्षकांसह सहायक उपनिरीक्षक दर्जाच्या अधिकाऱ्यांना लाचेची रक्कम घेताना लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या अधिकाऱ्यांना रंगेहाथ ताब्यात घेतले.पोलीस ठाण्यांचा कारभार सुधारावा यासाठी पोलीस आयुक्त विश्वास नांगरे -पाटील, पोलीस अधीक्षक डॉ. आरती सिंह यांनी सूत्रे स्वीकारताच पोलीस ठाण्यांना भेटी देण्यास सुरुवात केली होती. जेणेकरून पोलीस ठाण्यांमधील अधिकारी-कर्मचा-यांवर वचक निर्माण होईल. आयुक्तालयातील संवेदनशील पोलीस ठाण्यांपैकी पंचवटी पोलीस ठाण्यापासून नांगरे-पाटील यांनी पोलीस ठाण्यांच्या कारभार पाहणीला सुरुवात केली होती. पोलीस ठाण्यांमधील कारभार सुधारावा यासाठी सिंह यांनीही वारंवार वरिष्ठ पोलीस निरीक्षक, पोलीस निरीक्षक, उपनिरीक्षकांच्या बैठका घेतल्या. तालुका पोलीस ठाण्याला वरिष्ठ पोलीस निरीक्षकाची नेमणूक होऊन काही महिनेच होत नाही तोच येथील वरिष्ठ पोलीस निरीक्षक नानासाहेब रामकिशन नागदरे, सहायक उपनिरीक्षक सुभाष हरी देवरे यांना तालुका पोलीस ठाण्यातील कक्षात लाचेची २२ हजारांची रक्कम स्वीकारताना रंगेहाथ लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या पथकाने गुरुवारी (दि.५) ताब्यात घेतले. तसेच शुक्रवारी (दि.६) सातपूर पोलीस ठाण्याचे वरिष्ठ पोलीस निरीक्षक यांनाही ५० हजार रुपयांची लाच घेताना ताब्यात घेतले. जाधव हे तिसºयांदा लाचलुचपत प्रतिबंधक विभागाच्या सापळ्यात अडकले. एकूणच पोलीस ठाणेप्रमुखांकडूनच विविध गुन्ह्यांमध्ये तडजोड करण्यासाठी संशयितांकडून थेट लाचेची मागणी होऊ लागल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. त्यामुळे पोलीस ठाण्यांमध्ये नेमके चालले तरी काय? असा प्रश्न सर्वसामान्य नाशिककरांकडून उपस्थित होऊ लागला आहे.

‘कीड’ संपविण्याचे आव्हानपोलीस ठाण्यांमधील अधिका-यांना लागणारी भ्रष्टाचाराची कीड वेळीच संपविण्याचे आव्हान आयुक्तालय, अधीक्षक कार्यालयांच्या प्रमुखांपुढे उभे राहिले आहे. ग्रामीण पोलीस दलाच्या तालुका पोलीस ठाणे आणि आयुक्तालयातील सातपूर पोलीस ठाण्यांपासून भ्रष्टाचाराची कीड लागण्यास सुरुवात झाली आहे. यामुळे नांगरे-पाटील व सिंह यांना वेळीच प्रतिबंधात्मक उपाययोजना म्हणून ‘फवारणी’ करावी लागणार आहे, हे निश्चित.

टॅग्स :nashik police commissioner officeनाशिक पोलीस आयुक्तालयBribe Caseलाच प्रकरणArrestअटक