शहरं
Join us  
Trending Stories
1
तब्बल २५ एकरचा कॅम्पस, २८९ कोटी खर्च, मोदींनी केलं होतं उद्घाटन, पण या संस्थेत अवघे १५ विद्यार्थी 
2
"मराठी भाषा बोलता आलीच पाहिजे, मी मुस्लिमांना सांगतो की..."; इम्तियाज जलील यांचे रोखठोक मत
3
‘डिजिटल अरेस्ट’चा धक्कादायक प्रकार उघडकीस; घाटकोपरचे कुटुंब १८ दिवस घराबाहेर पडलेच नाही
4
पाकिस्तानात लष्कर-ए-तोयबाच्या युसूफ आफ्रिदीची हत्या; गेल्या काही महिन्यात ३० हून अधिक जण लक्ष्य
5
Top Marathi News Live: मराठी सक्तीची डेडलाईन एक वर्षाने पुढे ढकलली जावी- संजय निरुपम
6
Rahul Meena : "मी मोठा गुन्हा केलाय, आता मरणार..."; IRS च्या मुलीची हत्या केल्यावर राहुलने कोणाला केला फोन?
7
IPL 2026: 'ग्रीन कॉरिडॉर'मुळे लुंगी एन्गिडी ११ मिनिटांत पोहोचला रुग्णालयात; होतंय कौतुक
8
सोन्या-चांदीच्या दरात घसरण, १,५३,००० रुपयांच्या खाली Gold, खरेदीपूर्वी पाहा तुमच्या शहरातील लेटेस्ट रेट
9
Donald Trump: "मी बलात्कारी नाही...", गोळीबाराच्या घटनेनंतर डोनाल्ड ट्रम्प असं का म्हणाले?
10
Palmistry: तुमच्या मनगटावर किती रेषा आहेत? जाणून घ्या तुमच्या आरोग्याचं आणि श्रीमंतीचं गुपित!
11
US Israel Iran War : पाकिस्तान मध्यस्थीसाठी योग्य देश नाही; इराणच्या खासदाराचे खळबळजनक विधान
12
बापरे! रोबोने नृत्य करणाऱ्या विद्यार्थिनीला मारली मिठी; चीनमधील धक्कादायक प्रकाराने सर्वच अवाक्
13
VIDEO: "मुलांना घेऊन जा..."; बाहेरून वह्या घेतल्या म्हणून मुख्याध्यापिका भडकल्या, गेट लॉस्ट म्हणत पालकांना धमकी
14
Mumbai Accident: मरीन ड्राईव्हवर भीषण अपघात; भरधाव दुचाकीची वृद्धाला धडक, तरुण-तरुणीसह तिघांचा दुर्दैवी मृत्यू
15
पंजाबचे माजी DIG हरचरण सिंग भुल्लर यांच्या ११ ठिकाणांवर ED चा छापा; घरात सापडलेले ७.३६ कोटी
16
धक्कादायक! पाणीपुरी आणि छोले खाल्ल्याने १८ मुलांना फूड पॉयझनिंग, ६ वर्षांच्या मुलाचा मृत्यू
17
US Israel Iran War : इराणचा रशिया दौरा डोनाल्ड ट्रम्प यांच्या जिव्हारी! ७२ तासांचा अल्टिमेटम; इराणच्या तेल पाइपलाईन्स रडारवर
18
इराणी परराष्ट्र मंत्र्यांचा चकवा! आधी ओमानला गेले, मग पाकिस्तानला आले अन् आता रशियाकडे वळले
19
शेअर बाजाराची तेजीसह सुरुवात, सेन्सेक्स ५०० पेक्षा अधिक अंकांनी मजबूत; निफ्टीमध्येही तेजी, 'हे' शेअर्स वधारले
20
हिल्टनमधील ‘मल्टी-लेयर्ड’ कवच भेदले कसे?; हल्लेखोर निघाला उच्चशिक्षित ट्यूटर, जाणून घ्या
Daily Top 2Weekly Top 5

मनपासह सर्व शाळांमध्ये सेंट्रल किचनचे भोजन

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 23, 2019 01:52 IST

शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे पत्र दिल्याने अखेर ठराव फेटाळला गेला आहे. आता येत्या १ आॅक्टोबरपासून शहरातील २७५ शाळांमध्ये सेंट्रल किचनव्दारे भोजन दिले जाणार आहे.

ठळक मुद्देमहासभेचा ठराव फेटाळला : १ आॅक्टोबरपासून शुभारंभ

नाशिक : शहरातील बचत गटांचा रोजगार असलेले मध्यान्ह भोजनाचे काम आता सेंट्रल किचन अंतर्गत निवडलेल्या ठेकेदारांमार्फतच होणार असल्याचे स्पष्ट झाले आहे. यासंदर्भात महापालिकेच्या जून महिन्यात झालेल्या महासभेत ठराव झाला असला तरी शिक्षण खात्याने उच्च न्यायालयाच्या आदेशाचे पालन करा, असे पत्र दिल्याने अखेर ठराव फेटाळला गेला आहे. आता येत्या १ आॅक्टोबरपासून शहरातील २७५ शाळांमध्ये सेंट्रल किचनव्दारे भोजन दिले जाणार आहे.महापालिका हद्दीतील बहुतांशी शाळांना बचत गटामार्फतच पोषण आहार दिला जातो. परंतु यंदा उच्च न्यायालयाच्या आदेशाचा आधार घेऊन राज्यातील सर्वच प्राथमिक शाळांमध्ये राज्य सरकारच्या वतीने मध्यान्ह भोजन देण्याची योजना आखण्यात आली. विशेष म्हणजे नव्या शैक्षणिक वर्षापासून ती सुरू करता यावी यासाठी राज्य शासनाने लोकसभा निवडणुकीची आदर्श आचारसंहिता सुरू असताना निवडणूक आयोगाची परवानगी घेऊन निविदा मागवण्यात आल्या होत्या. निवडणूक आचारसंहिता संपताच त्यावरून राजकीय पक्षांनी पुढाकार घेत सेंट्रल किचनला काम देण्यास विरोध केला होता. महापौर रंजना भानसी यांनीदेखील सेंट्रल किचनला विरोध दर्शवताना बचत गटांनाच काम देण्यासाठी थेट मुख्यमंत्र्यांकडे जाण्याची तयारी दर्शविली होती. २५ जून रोजी यासंदर्भात महापालिकेच्या महासभेत चर्चा झाल्यानंतर बचत गटांना काम देण्याचा ठराव करण्यात आला होता. यासंदर्भात राज्य शासनाच्या शिक्षण खात्याकडे मनपाचे शिक्षणाधिकारी देवीदास महाजन यांनी सर्व माहिती सादर केली.तथापि, उच्च न्यायालयाच्या आदेशानुसार सेंट्रल किचन राबविण्याचे आदेश देण्यात आल्याने महासभेचा ठराव फेटाळण्यात आल्याचे स्पष्ट झाले आहे.सव्वा लाख मुलांना मिळणार भोजननाशिक महापालिकेच्या ९० शाळांसह एकूण २७५ प्राथमिक अनुदानित शाळा असून, त्यातील १ लाख १८ हजार ७१० मुलांना आता शासनाच्या सेंट्रल किचनच्या माध्यमातून मध्यान्ह भोजन मिळू शकणार आहे. विशेष म्हणजे आदर्श आचारसंहिता सुरू असताना राज्य शासनाने योजना आखली आणि त्याचवेळी निविदा प्रक्रिया सुरू झाली. त्याचवेळी अनेक स्थानिक ठेकेदार आणि बचत गटांनी त्यात सहभाग घेतला आणि सध्या १३ जणांना हे काम देण्यात आले आहे.महिनाभराने अंमलबजावणीराज्य शासनाचा निधी असल्याने महापालिकेच्या स्थायी समितीवर कायदेशीरदृष्ट्या हा प्रस्ताव पाठविला गेला नाही. सध्या बचत गटांनी पोषण आहारासाठी तांदूळ खरेदी करून ठेवला असल्याने मनपा हद्दीत सप्टेंबर महिन्यापर्यंत बचत गटांनाच काम असेल त्यानंतर १ आॅक्टोबरपासून मध्यान्ह भोजन योजना सुरू होईल.

टॅग्स :Nashik municipal corporationनाशिक महानगर पालिकाcommissionerआयुक्त