शहरं
Join us  
Trending Stories
1
विधान परिषदेच्या ९ जागांसाठी निवडणूक जाहीर; १२ मे रोजी मतदान, महायुती वरचढ ठरणार
2
Latest Marathi News LIVE Updates: लोकसभेत सीमांकन विधेयकावर चर्चा सुरू, उद्या दुपारी ४ वाजता मतदान
3
परतवाडा व्हिडीओकांड ते बंगालमधील फसवणूक! अयान तनवीर आणि आनंदचे अनेक महिलांशी संबंध; धक्कादायक खुलासा
4
हाफिज सईदच्या खास माणसावर बेछुट गोळीबार; लष्करचा संस्थापक अमीर हमजा मृत्यूच्या दारात
5
“भारताच्या अर्ध्या लोकसंख्येत मुस्लिम महिलांचा समावेश होत नाही का?”; अखिलेश यादवांचा सवाल
6
टी लव्हर्ससाठी धोक्याची घंटा! चहा पिण्यापूर्वी की नंतर... कधी पाणी पिणं ठरेल आरोग्यासाठी घातक?
7
जगातील फक्त १६ देशांमध्ये महिला राष्ट्राध्यक्षा; जागतिक राजकारणात किती आहे भागीदारी?
8
PPF मध्ये ₹१२,००० ची बचत तुम्हाला बनवू शकते कोट्यधीश, मिळणार हमखास परतावा; आणखी कोणते आहेत फायदे?
9
चैत्र अमावस्या २०२६: चैत्र अमावास्येला दुपारी १२ नंतर 'या' ७ राशींना सतर्कतेचा इशारा; पण का? वाचा!
10
"मी वैतागलो होतो, म्हणून आईला मारून टाकलं" मुलाचं ऐकून पोलिसांच्या पायाखालची जमीनच सरकली!
11
तुमची एक चूक आणि FASTag होईल ब्लॅकलिस्ट; पटापट करा 'हे' काम; NHAI चे बँकांना महत्त्वाचे निर्देश
12
महागाई ३८ महिन्यांच्या उच्चांकावर! पश्चिम आशियातील युद्धाचा थेट परिणाम भारतीय नागरिकांवर
13
'दबंग मॅम' निदा खान ऑफिसमध्ये सर्वांना बुरखा घालायला शिकवायची; काय होता HR हेडचा प्लॅन?
14
“भारताशी आमचे संबंध ५ हजार वर्ष जुने, युद्धानंतर आणखी मजबूत होणार”; इराणचे नेते थेट बोलले
15
होर्मुझपेक्षाही मोठा जलमार्ग ब्लॉक करण्याच्या तयारीत चीन; सॅटेलाइट इमेजनं खुलासा, तणाव वाढणार
16
Ashok Kharat : 'अंक' गणितच भोंदू अशोक खरातच्या अंगलट; शुभांक ९ मानून मोटारींसाठी निवडायचा क्रमांक
17
"त्यांनी भोंदूबाबाचा सगळा प्रकार संवेदनशीलतेने हाताळला..."; प्राजक्ता माळीने मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचं केलं कौतुक
18
Rasikh Salam Dar: वय लपवलं, BCCI कडून २ वर्षांची बंदी; शिक्षकाचा मुलगा RCB साठी कसा बनला ‘कमबॅक किंग’?
19
इराणमध्ये पहिल्यांदाच महिलेला फाशीची शिक्षा; कोण आहे Bita Hemmati? तिच्यावर नेमका आरोप काय?
20
३ बायका, ५३ बँक खाती, ५ कोटींचा घोटाळा... सरकारी तिजोरीवर डल्ला मारणारा करोडपती शिपाई
Daily Top 2Weekly Top 5

सिडको प्रभागात सेनेची एकहाती सत्ता

By admin | Updated: May 4, 2017 18:08 IST

जुन्या की नवीन चेहऱ्यांना संधी याकडे सर्वांचे लक्ष

सिडको : यंदाच्या मनपा निवडणुकीत भाजपाची लाट असतानाही सिडको प्रभागात सेनेचेच सर्वाधिक नगरसेवक निवडून आल्याने साहजिकच सिडको प्रभाग सभापतिपद हे सेनेलाच मिळणार असल्याचे स्पष्ट दिसत आहे. परंतु सेनेकडून कोणाला संधी मिळणार याबाबत उत्सुकता कायम आहे. सिडको विभागात एकूण सहा प्रभाग असून, यात प्रभाग क्रमांक २४, २५, २७, २८ ,२९ व ३१ आदींचा समावेश आहे. या सहा प्रभागांतील २४ नगरसेवकांमध्ये सेनेचे १४, भाजपा ९ व राष्ट्रवादी कॉँग्रेस एक असे पक्षीय बलाबल आहे. सेनेच्या नगरसेवकांमध्ये सुधाकर बडगुजर, डी. जी. सूर्यवंशी, प्रवीण तिदमे, श्यामकुमार साबळे, दीपक दातीर, चंद्रकांत खाडे, सुदाम डेमसे, कल्पना पांडे, हर्षा बडगुजर, रत्नमाला राणे, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, संगीता जाधव, किरण गामणे आदींचा समावेश आहे, तर भाजपाच्या नगरसेवकांमध्ये मुकेश शहाणे, नीलेश ठाकरे, राकेश दोंदे, भगवान दोंंदे, छाया देवांग, प्रतिभा पवार, कावेरी घुगे, भाग्यश्री ढोमसे, पुष्पा आव्हाड आदींचा तर राष्ट्रवादी कॉँग्रेसचे राजेंद्र महाले असे पक्षीय बलाबल आहे. सिडको प्रभागात सेना (चौदा) पाठोपाठ भाजपा (नऊ) दुसऱ्या क्रमांकाचा पक्ष ठरला आहे. मागील निवडणुकीत सिडको प्रभागात भाजपाचा एकही नगरसेवक नव्हता, परंतु यंदाच्या निवडणुकीत भाजपाने मोठे यश संपादन करत तब्बल नऊ नगरसेवक निवडून आणले आहे. परंतु असे असले तरी सेनेचे नगरसेवक अधिक असल्याने सिडको प्रभागावर सेनेचाच सभापती होणार हे निश्चित मानले जात आहे. स्थायी समितीवर शिवसेनेकडून नगरसेवक डी. जी. सूर्यवंशी व प्रवीण तिदमे यांना संधी देण्यात आली आहे. सुधाकर बडगुजर, कल्पना पांडे, रत्नमाला राणे, हर्षा बडगुजर, कल्पना चुंभळे, सुवर्णा मटाले, हे या आधीही नगरसेवक होते. तर दीपक दातीर, श्यामकुमार साबळे, चंद्रकांत खाडे, किरण गामणे हे नवीन चेहरे महापालिकेत सामील झाले आहे. यामुळे पक्ष कोणाला संधी देणार हे येत्या १९ मे रोजी होणाऱ्या निवडणुकीत स्पष्ट होणार आहे.