संगमेश्वर परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: August 18, 2021 04:19 IST2021-08-18T04:19:31+5:302021-08-18T04:19:31+5:30

या. ना. जाधव विद्यालय मालेगाव : महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी जे. आर. अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. ...

Celebrate Independence Day in Sangameshwar area | संगमेश्वर परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा

संगमेश्वर परिसरात स्वातंत्र्य दिन साजरा

या. ना. जाधव विद्यालय

मालेगाव : महात्मा जोतिबा फुले शिक्षण संस्थेचे सेक्रेटरी जे. आर. अहिरे यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. संस्थेचे अध्यक्ष सुनील वडगे, वसंत पूरकर, राजेंद्र अहिरे, मच्छिंद्र अहिरे, प्राचार्य आर. डी. शेवाळे उपस्थित होते. सूत्रसंचालन संजय अहिरे यांनी केले.

साधना वाचनालय

साधना वाचनालयात अध्यक्ष बाळकृष्ण मिस्तरी यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी कोषाध्यक्ष विलास वडगे, संचालक एम. जी. गिते, किशोर मोरे, बळवंत अहिरे, नंदकिशोर वडगे आदी उपस्थित होते. ग्रंथपाल कल्पना पाटील यांनी प्रास्ताविक केले. योगेश देशावरे यांनी आभार मानले.

मारुती चौक

मारुती चौकात शिवसेनेचे अजय जगताप यांच्या हस्ते ध्वजारोहण झाले. यावेळी जितेंद्र चव्हाण, नंदकिशोर वडगे आदी उपस्थित होते.

जय श्रीराम मंडळ

जय श्रीराम मंडळाच्या वतीने सुभाष चौकात मनपा स्थायी समिती सभापती राजाराम जाधव यांच्या हस्ते ध्वजारोहण करण्यात आले. यावेळी किशोर शेवाळे, राजेंद्र जाधव, राजेंद्र चौधरी उपस्थित होते. राजेंद्र भोसले यांच्या संपर्क कार्यालयातही ध्वजारोहण करण्यात आले. सूत्रसंचालन श्याम शिंपी यांनी केले.

Web Title: Celebrate Independence Day in Sangameshwar area