शहरं
Join us  
Trending Stories
1
"रडण्याची वेळ आली आहे...!" बंगाल निकालापूर्वीच मौलाना जर्जिश अंसारी यांच प्रक्षोभक विधान; योगींना म्हणाले 'शेर'!
2
निकालापूर्वी बंगालमध्ये दहशत पसरवण्याचा प्रयत्न! भाजप नेत्याच्या घरावर गोळीबार, दोघांना अटक
3
GT कडून बॉक्सरच्या लेकाला IPL पदार्पणाची संधी; CSK च्या ताफ्यातून बाकावर बसून ठरलेला IPL चॅम्पियन!
4
'भाजपाचा झेंडा असलेल्या कार ईव्हीएम स्ट्राँग रुमजवळ कशा?', ममता बॅनर्जींच्या मतदारसंघात खळबळ
5
मिसिंग लिंकवर सेल्फी, फोटो काढाल, तर महागात पडेल; सीसीटीव्हीची नजर, MSRDCने दिला इशारा
6
मुंबईकर रहाणे-रघुवंशी जोडीचा हिट शो, रिंकूचा फिनिशिंग टच! SRH ला मात देत KKR ची विजयी हॅटट्रिक
7
अल्पवयीन मुलीवर पित्याकडूनच अत्याचार, मुलगी गर्भवती; वडिलांस अटक
8
लॅपटॉप वापरताना 'ही' एक छोटी चूक ठरू शकते मोठा धोका! आताच सुधारली नाही, तर होईल भारी नुकसान
9
"माझा सत्तेत बसलेल्यांना थेट सवाल आहे, तुमचं...", अमित ठाकरे नसरापूर प्रकरणावरून सरकारवर संतापले
10
लैंगिक शोषण प्रकरण: विनेश फोगाटचा मोठा खुलासा; "मीही त्या ६ पीडित महिला कुस्तीपटूंपैकी एक"
11
एकाच गर्भातून जन्माला आल्या जुळ्या बहिणी, पण वडील मात्र वेगवेगळे! DNA चाचणीतून ४९ वर्षांपूर्वीचं गुपित झालं उघड अन्...
12
Maharashtra Weather: उष्णतेच्या तडाख्यातून दिलासा मिळणार, चार जिल्ह्यांना ऑरेंज अलर्ट! पुढील चार दिवस कसे असेल हवामान?
13
"दादा वाचव, हे मला मारतील!" बहिणीची शेवटची हाक अन् बरेलीत लव्ह मॅरेजचा रक्तरंजित शेवट!
14
IPL 2026: रोहित शर्मा अखेर 'मुंबई इंडियन्स' सोडणार? एका व्हायरल पोस्टमुळे चर्चांना उधाण
15
आंबा पाहताच तोंडाला पाणी सुटतं, पण जरा थांबा; जास्त खाल्ल्याने शरीरात उष्णता वाढते, कारण...
16
इराणचा शांततेचा हात, ट्रम्प यांचा लाथ मारण्याचा इशारा! "चुकीचं वागलात तर याद राखा..."
17
नेपाळमध्ये 'बालेन' स्टाईल दणका! एका क्षणात १५०० सरकारी अधिकाऱ्यांना बसवलं घरी; नव्या सरकारचा मोठा निर्णय
18
मिस्ट्री स्पिनर सुनील नरेनचा ऐतिहासिक पराक्रम! IPL मध्ये २०० विकेट्स घेणारा पहिला परदेशी गोलंदाज
19
IPL मधील पहिला भारतीय शतकवीर! KKR कडून संधी मिळताच पठ्ठ्याची रोहित-विराटच्या एलिट क्लबमध्ये एन्ट्री
20
Sara Tendulkar : "कसं वागावं, कोणते कपडे घालावे?"; सारा तेंडुलकरने केला सचिनच्या 'कडक' शिस्तीबाबत खुलासा
Daily Top 2Weekly Top 5

लग्नाच्या पहिला वाढदिवस वृक्षारोपण करून केला साजरा

By admin | Updated: June 10, 2015 22:21 IST

अपंग तरुणाने दिला पर्यावरण रक्षणाचा संदेश

मालेगाव : वाढदिवस साजरा करण्याच्या ंअनेक प्रथा रूढ असताना, शहरालगतच्या सोयगाव येथील अपंग तरुणाने लग्नाच्या पहिल्या वाढदिवशी वृक्षारोेपण करून आगळेवेगळे उदाहरण सर्वांसमोर ठेवले आहे. शहरालगतच्या सोयगाव येथील पुंडलिकनगरमध्ये राहणाऱ्या संतोष बन्सीलाल पारख या दोन्ही पायाने अपंग असलेल्या तरुणाने आपल्या लग्नाच्या पहिल्या वाढदिवसाच्या दिवशी अनावश्यक खर्चाला फाटा देत वृक्षारोपण करून वाढदिवस साजरा केला. यावेळी त्यांनी तीन रोपं लावली. या तीनही रोपांचे संवर्धन करण्याची जबाबदारीही त्यांनी घेतली आहे. जागतिक तपमान वाढीची झळ सर्वसामान्यांना बसत असून, सर्वत्र झालेल्या बेसुमार वृक्षतोडीचे मोठे गंभीर परिणाम मानवाबरोबरच प्राणिमात्रांना सोसाावे लागत आहे. मालेगाव शहर व परिसरात दरवर्षी तपमानात वाढ होत आहे. त्यातच वृक्षतोडीमुळे पावसाचे प्रमाण कमी होऊन सततच्या दुष्काळाला तोंड देण्याची वेळ आली आहे. यामुळे जनतेत आता याविषयी जागृती करण्याची गरज निर्माण होत आहे. त्यातून पर्यावरण रक्षणासाठी प्रयत्न केले जात आहेत. यात वृक्षारोपण करणाऱ्यांची संख्या लक्षणीय वाढली आहे; मात्र वृक्षारोपणानंतर लावलेल्या रोपांकडे लक्ष दिले जात नसल्याचे अनेकवेळा दिसून येत आहे. परंतु अपंग असताना आपणही समाजाचे देणे लागतो या भावनेतून किराणा व्यावसायिक असलेल्या संतोष यांनी तीन रोपे लावून लग्नाचा पहिला वाढदिवस साजरा केला. या कार्यात पत्नी रिना यांनीही साथ दिल्याने परिसरात चर्चेचा विषय ठरला आहे. यावेळी शैला वाजे, प्रिया वाजे, रिता वेताळ, किरण विभुते, नरेंद्र खैरनार, विश्वनाथ पाटील, हिरालाल वेताळ आदि उपस्थित होते. (प्रतिनिधी)