शहरं
Join us  
Trending Stories
1
"रस्ते आणि उड्डाणपूल म्हणजे विकास नाही"; राज ठाकरेंनी करुन दिली बाबासाहेबांच्या समग्र दृष्टीची आठवण
2
एकाच झटक्यात कंपनीनं काढले ३० हजार कर्मचारी, आता त्याचं कंपनीनं नव्या CFO ना दिलं ₹२५० कोटींचं पॅकेज
3
"आमच्या कामात ढवळाढवळ नको"; इराणच्या नाकेबंदीवरून चीनचा अमेरिकेला थेट इशारा, महायुद्ध पेटण्याची भीती
4
मुंबई हादरली..! लाइव्ह म्युझिक कॉन्सर्टमध्ये ड्रग्जच्या ओव्हरडोजने २ विद्यार्थ्यांचा मृत्यू, नेस्कोच्या अधिकाऱ्यांसह ५ अटकेत, १ तरुणी गंभीर
5
पाठीमागून आला अन्...; दिवसाढवळ्या गर्भवती महिलेसोबत घाणेरडं कृत्य, संतापजनक व्हिडीओ समोर!
6
बॉलिंग ॲक्शनवरुन वाद; वडिल अन् बहिणीची साथ! जाणून घ्या 'विदर्भ एक्स्प्रेस' Praful Hinge चा प्रवास
7
अधिवेशन पास घोटाळा; विधानभवनातील तिघे कर्मचारी निलंबित, एक अद्याप पसारच
8
"सध्या माझ्या मनात.."; आजीच्या निधनाने जनाई कोलमडली, सोशल मीडियावर व्यक्त केल्या भावना
9
सूर्याचा उच्च राशीत प्रवेश २०२६: ७ राशींना मेष संक्रांतीने यश-लाभ; १ उपायाने महिनाभर भरभराट!
10
...अन् बाबासाहेब स्वत: समोर येऊन बोलू लागले; चर्चिल-ॲटलींसोबतचा संवाद झाला सजीव
11
Noida Protest: जाळपोळ, तोडफोड आणि दगडफेक; ६० जणांना अटक, नोएडा हिंसाचारात आतापर्यंत काय-काय घडलं?
12
रुपयाच्या नाण्यांतून उभारली श्रद्धेची गाथा; १७ हजार नाण्यांचा संग्रह
13
Akshaya Tritiya 2026: अक्षय्य तृतीयेला सोने परवडत नाहीये? घरी आणा 'या' ६ स्वस्त वस्तू; मिळेल सोनेखरेदीचे अक्षय्य पुण्य!
14
आजचे राशीभविष्य, १४ एप्रिल २०२६: कामात यश मिळेल, घरात सुख-शांती नांदेल, नशिबाची साथ मिळेल.
15
उद्यापासून उष्णतेच्या लाटेचा तडाखा, अकोला @ ४३.८
16
स्मरण दिन २०२६: अवतार सांगता करताना स्वामींनी कोणते वचन दिले?; शेवटचा शब्द आजही पाळतात!
17
स्वामी समर्थ स्मरण दिन २०२६: ‘असे’ करा पूजन, आवर्जून म्हणा स्वामी मंत्र; पाहा, विधी-मान्यता
18
यंदा कसा असेल पाऊस? हवामान खात्याने मान्सूनबाबत दिली चिंता वाढवणारी माहिती
19
बिहारमध्ये नवीन सरकार स्थापनेच्या हालचालींना वेग, उद्या शपथविधी सोहळा होण्याची शक्यता
20
पूर्ववैमनस्यातून पत्नीच्या डोळ्यांसमोर दादरमध्ये तरुणाची निर्घृण हत्या
Daily Top 2Weekly Top 5

सीसीटीव्हीची तोडफोड : महाराष्ट्र बॅँकेची तिजोरी साफ

By admin | Updated: January 10, 2015 23:01 IST

दापूर शाखेतून २६ लाखांची चोरी

नांदुरशिंगोटे : सिन्नर तालुक्यातील दापूर येथील बॅँक आॅफ महाराष्ट्र शाखेतून शुक्रवारी रात्री अज्ञात चोरट्यांनी गॅस कटरच्या साहाय्याने तिजोरी कापून २५ लाख ७८ हजार ७३२ रुपयांची रोकड लंपास केली. चोरट्यांनी बॅँकेतील तीन संगणक व सायरनची मोडतोड करण्यासह सीसीटीव्ही यंत्रणेचीही मोडतोड केली. दापूर गावात मध्यवर्ती ठिकाणी मोठेबाबा मंदिरानजीक ग्रामपंचायत कार्यालयाशेजारी बॅँक महाराष्ट्र बॅँकेची शाखा आहे. अज्ञात चोरट्यांनी रात्री बॅँकेच्या पाठीमागील बाजूची खिडकी तोडून आत प्रवेश केला. गॅस कटरच्या साहाय्याने चोरट्यांनी तिजोरी कापली. त्यातील २५ लाख ७८ हजार ७३२ रुपये घेऊन चोरटे पसार झाले. त्यापूर्वी चोरट्यांनी बॅँकेतील तीन कॉम्प्युटर्सची तोडफोड केली. सीसीटीव्हीची व्ही सॅट यंत्रणा ेचोरट्यांनी तोडून टाकली. तिजोरीला लावलेल्या सायरनच्या वायर्स कापण्यासह त्याची तोडफोड करण्यात आली. चोरट्यांनी गॅस कटर व सिलिंडर तेथेच टाकून पोबारा केला. सकाळी ७ वाजेच्या सुमारास ग्रामस्थांना शाखेची पाठीमागील खिडकी तोडलेली दिसून आली. (पान ७ वर)त्यानंतर सरपंच सोमनाथ आव्हाड यांनी शाखाधिकारी रवींद्र तनपुरे यांना दूरवध्वनीवरून घटनेची माहिती दिली. पोलीस उपअधीक्षक सी.एच. देवराज, वावी पोलीस ठाण्याचे सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील यांच्यासह कर्मचाऱ्यांनी घटनास्थळी धाव घेऊन पंचनामा केला. घटनास्थळी श्वान पथक व ठसेतज्ज्ञांना पाचारण करण्यात आले होते. शाखा व्यवस्थापक रवींद्र सुधाकर तनपुरे यांनी अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीची फिर्याद दिली आहे. वावी पोलीस ठाण्यात अज्ञात चोरट्यांविरोधात चोरीचा गुन्हा दाखल केला आहे. सहाय्यक पोलीस निरीक्षक हेमंत पाटील अधिक तपास करीत आहेत. (वार्ताहर)