शहरं
Join us  
Trending Stories
1
इराणची मोठी घोषणा! होर्मुझची सामुद्रधुनी सर्वांसाठी खुली केली, पण...; एवढेच दिवस...
2
भर दुपारी बँक ऑफ महाराष्ट्रवर सशस्त्र दरोडा; २० मिनिटांत ३५ लाख लुटून नेले, मॅनेजरलाही मारहाण
3
"पंतप्रधान आणि मला तर पत्नीच नाही...!" राहुल गांधी संसदेत नेमकं काय बोलले? पिकला एकच हशा
4
ट्रम्पच्या नाकावर टिच्चून...! तीन महिन्यांपासून कच्च्या तेलासाठी हा देश आसुसलेला, रशियाचा टँकर पोहोचला
5
"हे लज्जास्पद कृत्य आहे, कारण हे महिलांच्या नावावर केले जात आहे", राहुल गांधींच्या भाषणातील दहा मुद्दे
6
राहुल गांधींच्या अडचणी वाढणार! दुहेरी नागरिकत्व प्रकरणात उच्च न्यायालयाने दिले एफआयआर दाखल करण्याचे आदेश
7
समुद्रातील थरार! अमेरिकेचा वेढा तोडून पाकिस्तानचे जहाज सुसाट; होर्मुजमध्ये नेमकं काय घडलं?
8
लोकसभेत ३ विधेयक पास करण्यासाठी सरकारकडे पुरेसे संख्याबळ नाही?; जाणून घ्या 'नंबर गेम' 
9
निदा खान टीसीएसमध्ये एचआर नाही, तर या पदावर होती...; वकिलांचा दावा, कुटुंब म्हणतेय ती गर्भवती...
10
Latest Marathi News LIVE Updates: मोठी बातमी: राहुल गांधींवर गुन्हा दाखल करण्याचे आदेश! नागरिकत्व प्रकरणी अडचणी वाढणार
11
सावधान! फोनपासून दूर होताच अस्वस्थ होता? स्क्रीन तुम्हाला वेळेआधीच बनवतेय म्हातारं
12
ट्रम्प यांचे लाडके मुनीर तेहरानमध्ये काय करतायत? अमेरिकेसाठी हेरगिरी की नव्या 'सुप्रीम लीडर'शी भेट? चर्चांना उधाण
13
"हे विधेयक देशाचा राजकीय नकाशा बदलण्यासाठी; एससी, एसटी आणि ओबीसी विरोधी", राहुल गांधींचा सरकारवर आरोप
14
खेळता आलं नाही तर काय झालं? मित्रांच्या आनंदात शोधला स्वतःचा आनंद; काळजाला भिडणारा Video
15
ट्रम्प यांची नजर इराणच्या 'त्या' धोकादायक धुळीवर! काय आहे 'युरेनियम' आणि ते कसं साठवतात?
16
नेपाळमध्ये सर्जिकल स्ट्राइक, ७ माजी PM, १०० मंत्री चौकशीच्या रडारवर; मोठा भ्रष्टाचार उघड!
17
हायव्होल्टेज ड्रामा! बॉयफ्रेंड तरुणीचा मृतदेह दफन करायला पोहोचला अन् तेवढ्यात एन्ट्री झाली पतीची; मग जे घडलं...
18
शेतात घाम गाळतेय 'आशियाई चॅम्पियन'! आठ गोल्ड अन बरेच मेडल..., वडिलांना करतेय मदत...
19
"या मॉड्यूलचे धागेदोरे कुठपर्यंत? तपास करणार"; नाशिकमधील कॉर्पोरेट धर्मांतरण प्रकरणावर फडणवीस स्पष्टच बोलले, दिले मोठे संकेत
20
भन्नाट की विचित्र? आता कारमध्येच मिळणार टॉयलेटची सुविधा! चिनी कंपनी 'Seres' कडून इलेक्ट्रिक कारसाठी खास पेटंट
Daily Top 2Weekly Top 5

नाश्त्याला काजू-बदाम आणि बाटलीबंद पाणी!

By admin | Updated: November 18, 2016 07:37 IST

हा अनुभव पाहता, संस्थाचालकांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, याचेच प्रदर्शन घडले.

नाशिक : स्वागताला फुलांचा पुष्पगुच्छ, पिण्यासाठी बाटलीबंद पाणी, नाश्त्याला काजू, बदाम पाहून आश्चर्यचकित झालेल्या महिलांच्या पथकाला आश्रमशाळांच्या संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी आणखी एक धक्का दिला तो म्हणजे पथकाकडे असलेल्या प्रश्नावलीची नक्कल प्रत दाखवून! कळवण तालुक्यातील आश्रमशाळेत तपासणीसाठी गेलेल्या पथकाला बुधवारी आलेला हा अनुभव पाहता, संस्थाचालकांचे आदिवासी विकास विभागाशी कसे साटेलोटे आहे, याचेच प्रदर्शन घडले. बुलढाणा जिल्ह्यातील खामगाव येथील आदिवासी आश्रमशाळेच्या विद्यार्थिनींवर झालेल्या अत्याचाराच्या घटनेच्या पार्श्वभूमीवर आश्रमशाळांची तपासणी केली जात आहे. त्यासाठी तपास पथके नेमण्यात आली आहेत. हे पथक आले की, आश्रमशाळांमध्ये त्यांच्यासाठी फक्त पायघड्याच घालायच्या बाकी असतात. या आदरातिथ्यामुळे पथकातील काही जणांना मेल्याहून मेल्यासारखे होत आहे... पण ते तरी काय बिचारे, असेच चित्र पांहायला मिळत आहे. नाशिक जिल्ह्यातील शासकीय व खासगी अनुदानित अशा सुमारे १८० आश्रमशाळांच्या तपासणीसाठी ३० पथकांची नेमणूक करण्यात आली आहे. बुधवारपासून त्यांनी तपासणी मोहीम सुरू केली. पथकांनी अचानक आश्रमशाळांना भेटी देऊन तेथील वास्तव जाणून घेत, मुलींशी संवाद साधावा व वस्तुनिष्ठ अहवाल सादर करावा, असे शासनाला अपेक्षित आहे. प्रत्यक्षात मात्र आश्रमशाळा संस्थाचालक व मुख्याध्यापकांनी या तपासणीपूर्वीच तयारी करून ठेवल्याचे अनुभव आता पथकांना येत आहेत. कळवण तालुक्यातील एका आश्रमशाळेवर पथक धडकताच, तेथील मुख्याध्यापक व शिक्षकांनी पुष्पगुच्छ देऊन पथकप्रमुख व सदस्यांचे स्वागत केले. त्यानंतर पिण्यासाठी बिसलरीच्या बाटल्याही आणून ठेवल्या होत्या. आश्रमशाळेतील जेवणाचा दर्जा पथकाने तपासू नये, म्हणून पाच वाजता म्हणजे शाळेच्या वेळेतच विद्यार्थ्यांना जेवण देण्यात आले होते. पथकाने ज्या प्रश्नावलीच्या आधारे आश्रमशाळांची तपासणी व माहिती संकलित करावयाची होती, त्याची नक्कल प्रत आश्रमशाळा व्यवस्थापनाकडे अगोेदरच उपलब्ध असल्याचा अनुभवही पथकाला आला, त्यामुळे त्यांनी प्रश्नावलीनुसार प्रश्न विचारण्यास सुरुवात करताच, त्यांना आगाऊच सर्व प्रश्नांची उत्तरे पाठ केल्यागत पटापट देण्यात आली. एवढेच नव्हे तर पथकासमोर विद्यार्थ्यांनी आश्रमशाळेचे वास्तव मांडू नये म्हणूनही काळजी घेण्यात आली होती, त्यामुळे विद्यार्थी प्रश्नांची उत्तरे पाठ करूनच देत असल्याचे उघड झाले. (प्रतिनिधी)