मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

By ऑनलाइन लोकमत | Updated: September 23, 2025 18:37 IST2025-09-23T18:19:28+5:302025-09-23T18:37:06+5:30

नाशकात समलिंगी तरुणीचा तरुणासह विवाह लावून दिल्याप्रकरणी आई वडिलांच्या विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

Case filed against parents for arranging daughter second marriage by hiding same sex relationship | मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

मुलीने पुण्यात मैत्रिणीसोबत बांधली लग्नाची गाठ; आई वडिलांनी लपवून दुसऱ्यांदा तरुणासोबत लावलं लग्न

Nashik Crime: नाशकात एका समलैंगिक संबंध असलेल्या तरुणीचे लग्न तरुणासोबत लावून देण्यात आल्याचा प्रकार समोर आला आहे. मुलीचे तिच्या मैत्रिणीसोबत समलिंगी संबंध असून त्या दोघींनी समलिंगी विवाहदेखील केला होता. याची कल्पना असतानाही पालघर जिल्ह्यातील वाडा गावातील आई वडिलांनी नाशिक रोडच्या एका युवकासोबत मुलीचे लग्न लावून दिले. याप्रकरणी युवकाने दिलेल्या फिर्यादीवरून २७ वर्षीय युवतीसह तिच्या आई-वडिलांविरुद्ध फसवणुकीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.

सामनगाव रोड भागातील विवाहित युवकाने नाशिक रोड न्यायालयात अर्ज दाखल केल्यावरून नाशिक रोड पोलिस ठाण्यात न्यायालयाच्या आदेशानुसार गुन्हा दाखल करण्यात आला. पीडित युवकाचा आर्टिलरी सेंटर रोड, मोती मंगल कार्यालयात २ मे २०२४ साली युवतीसोबत विवाह झाला होता. विवाहामध्ये तीन तोळ्यांचे सोन्याचे दागिने, सोळा ग्रॅमचे सोन्याचे गंठण नववधूला सासरच्यांकडून देण्यात आले होते. तसेच थाटामाटात झालेल्या या लग्नावर युवकाच्या आई-वडिलांचा सुमारे सात लाख रुपयांचा खर्च झाला होता. लग्नानंतर दुसऱ्या दिवशी जेजुरी गडावर दर्शनासाठी दोघे गेले. त्यानंतर दोन दिवसांनी नववधू माहेरी गेली. आठवडाभराने पुन्हा नाशिक रोड येथील सामनगावरोडवर सासरी नांदण्यास आली. तेव्हापासून विवाहिता ही तिची मैत्रीण गौरवी हिच्यासोबत सातत्याने मोबाइलद्वारे व सोशल मीडियाच्या माध्यमातून संपर्कात होती.

युवकाने जेव्हा तिचा मोबाइल तपासला तेव्हा पत्नीचे बिंग फुटले. त्यानंतर त्याने हा सगळा प्रकार त्याच्या आई-वडिलांसह मुलीच्या आई-वडिलांच्या लक्षात आणून दिला. यानंतर प्रथम वर्ग न्यायदंडाधिकारी नाशिक रोड यांच्याकडे युवकाने अर्ज दाखल करत घडलेला फसवणुकीचा प्रकार सांगितला. न्यायालयाच्या आदेशानंतर पोलिसांनी पोलिसांनी गुन्हा दाखल केला आहे.

७ फेब्रुवारीला पुण्यात समलिंगी विवाह

यावेळी विवाहितीने सांगितले की, ७ ऑगस्ट २०२३ साली आई-वडिलांनी तगादा लावल्यामुळे मी त्यांचे घर सोडून माझ्या मैत्रिणीच्या घरी राहण्यास निघून गेले होते. ७ फेब्रुवारी २०२४ साली पुण्यात मैत्रिणीसोबत लग्न केले होते, असेही तिने सांगितले. विवाहितेच्या आई-वडिलांना मुलीचा समलिंगी विवाह झालेला आहे, याबाबत कल्पना असतानाही त्यांनी मुलीचा पीडित युवकाशी लग्न लाऊन देत त्याच्या कुटुंबीयांची फसवणूक केली. सोन्याच्या दागिन्यांचा अपहार केल्याचे फिर्यादीत म्हटले आहे.
 

Web Title: Case filed against parents for arranging daughter second marriage by hiding same sex relationship

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.