उभ्या ट्रकवर कार आदळून तिघे ठार

By Admin | Updated: November 15, 2016 01:45 IST2016-11-15T01:48:42+5:302016-11-15T01:45:47+5:30

विल्होळी : मृतांत कल्याण, उल्हासनगरच्या प्रवाशांचा समावेश

A car on the vertical truck killed three people | उभ्या ट्रकवर कार आदळून तिघे ठार

उभ्या ट्रकवर कार आदळून तिघे ठार


बेलगाव कुऱ्हे : मुंबई-नाशिक महामार्गावरील विल्होळी आठवा मैल शिवारातील जीत ढाब्यासमोर रात्री उशिराच्या सुमारास अर्टिका व ट्रकच्या झालेल्या अपघातात कल्याण व उल्हासनगर येथील तीन प्रवासी ठार, तर दोन जण गंभीर जखमी झाले.
मुंबईहून नाशिककडे येणाऱ्या अर्टिकाने (क्र. एमएच ०५ बीसी ४८७३) महामार्गावर उभ्या असलेल्या ट्रकला (क्र. एमएच १८ एम-९७९३) मागून जोरात धडक दिल्याने अर्टिका वाहनातील मुकेश नोटन चौधरी (३४), मानसी चतुर चौधरी (१३), दोघेही राहणार कल्याण व भाऊसाहेब आनंदा गांगुर्डे (४५, रा. उल्हासनगर) हे ठार झाले. जयवंत रामदास पाबळे, अंकित चतुर चौधरी (८), रा. कल्याण व उल्हासनगर हे जखमी झाले.
जखमींना नरेंद्राचार्य महाराज संस्थानच्या रुग्णवाहिकेने जिल्हा रु ग्णालयात दाखल केले. परंतु उपचारादरम्यान तिघांचा मृत्यू झाला. वाडीवऱ्हे पोलीस ठाण्यात अपघाताची नोंद करण्यात आली असून, अधिक तपास पोलीस निरीक्षक संदीप कोळेकर यांच्या मार्गदर्शनाखाली पोलीस उपनिरीक्षक नाईक करीत आहेत. (वार्ताहर)

Web Title: A car on the vertical truck killed three people