{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}नाशिक : भरधाव कारने दिलेल्या धडकेत पादचाऱ्याचा मृत्यू झाल्याची घटना मुंबई-आग्रा महामार्गावरील हॉटेल कशिशसमोर घडली़ याबाबत अधिक माहिती अशी की, चंद्रकांत बाजीराव शिंपी (६०, सिडको) हे शनिवारी रात्री नऊ वाजेच्या सुमारास महामार्ग रस्त्याने पायी जात होते़ त्यावेळी समोरून भरधाव आलेल्या इनोव्हा कारने दिलेल्या धडकेत शिंपी जबर जखमी झाले़ त्यांना उपचारासाठी जिल्हा शासकीय रुग्णालयात दाखल केले असता वैद्यकीय अधिकाऱ्यांनी मयत घोषित केले़ या प्रकरणी अंबड पोलीस ठाण्यात कारचालकावर गुन्हा दाखल करण्यात आला आहे़ (प्रतिनिधी)