कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारे वाहन पकडले

By Admin | Updated: January 14, 2017 00:55 IST2017-01-14T00:55:11+5:302017-01-14T00:55:53+5:30

कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारे वाहन पकडले

A car carrying a bull for the slaughter was captured | कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारे वाहन पकडले

कत्तलीसाठी बैल घेऊन जाणारे वाहन पकडले

 नाशिक : आडगाव परिसरातून जनावरांना कत्तलीसाठी घेऊन जाणारे वाहन पकडण्यात पोलिसांना यश आले आहे. हनुमानगर चौफुली येथे एका बोलेरोत चार बैल कत्तलीसाठी नेण्यात येत असल्याची माहिती मिळताच पोलिसांनी सदर वाहन अडवून सुमारे ४० हजार रुपये किमतीचे बैल व वाहन हस्तगत केले. महाराष्ट्रात गोवंश हत्त्याबंदी असताना आडगाव परिसरातून महिंद्रा कंपनीच्या बोलेरो (एमएच१५ ईजी ९२८७) वाहनातून चार बैलांना कत्तल करण्यासाठी नेण्यात येत होते, परंतु बैलांना घेऊन जाणारे वाहन पोलिसांनी हनुमान चौफुलीत अडवून सुमारे ४० हजार रुपयाचे बैल व १ लाख ६० हजार रुपये किमतीचे बोलेरो वाहन पोलिसांनी हस्तगत केले. याप्रकरणी गुन्हा दाखल केला आहे.

Web Title: A car carrying a bull for the slaughter was captured