शहरं
Join us  
Trending Stories
1
"मला पक्षात पद..."; उद्धवसेनेचे कार्याध्यक्ष होण्याच्या चर्चांवर आदित्य ठाकरेंची सूचक पोस्ट
2
अमेरिकन नौदलाला इराणचा खुलं आव्हान! डोळ्यांदेखत टँकरने ओलांडली 'होर्मुझ'; ट्रम्प यांचे सैन्य पाहतच राहिले
3
याला म्हणतात नशीब! ९ नेते दुसऱ्या पक्षांमधून भाजपात आले; काही मुख्यमंत्री, काही उपमुख्यमंत्री बनले
4
५९१ कोटींचा तोटा; ३१ पैकी ८ विभाग नफ्यात, STचा तोटा कमी करण्यासाठी उपाययोजना करायचे निर्देश
5
कधी राहुल गांधी, कधी खर्गे, आता सिद्धरामय्या! काँग्रेसच्या मुख्यमंत्र्यांच्या कानात काय बोलले मोदी? 'तो' फोटो देशभर व्हायरल!
6
हायप्रेशर स्टील ट्यूब फुटली अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; ७०० डिग्री वाफेने वेढलं अन् १७ जणांचा कोळसा झाला
7
पाकिस्ताननं पाठवले १३००० सैनिक; आता सौदीने दिले ३ अब्ज डॉलर, एका सैनिकाची किंमत किती?
8
Latest Marathi News LIVE Updates: अश्लील व्हिडीओ प्रकरणातील आरोपी अयानला दणका, घरावर बुलडोझर
9
IPL 2026: MS Dhoni च्या चाहत्यांची धाकधूक वाढली... १६ एप्रिलला 'थाला' मोठा निर्णय घेणार!
10
"उबाठा गट ताब्यात घेण्याचे संजय राऊतांचे प्रयत्न, आदित्य ठाकरेंशी 'सामना"; भाजपा नेत्याचा दावा
11
होर्मुझ तणावात पुतिन यांचा मास्टरस्ट्रोक! इराणी युद्धावर चीनमध्ये बनणार 'गेमप्लॅन'; अमेरिकेला शह?
12
२०२६चा पहिला गुरुपुष्यामृत योग कधी? ‘इतके’ तास आहे शुभ मुहूर्त; पाहा, महत्त्व अन् मान्यता
13
खळबळजनक! ओडिशातील सरकारी शाळेत अन्नातून विषबाधा; १०० विद्यार्थी आजारी, एकाचा मृत्यू
14
कानपूर किडनी रॅकेटचा असा झाला पर्दाफाश, गर्लफ्रेंडची एक चूक नडली अन् पकडला गेला गुन्हेगार!
15
Video - इन्स्टा रीलमुळे वाचला जीव; बोट दुर्घटनेवेळी मृत्यूशी झुंज, महिलेने सांगितला थरारक प्रसंग
16
Travel: ओमानमध्ये भारताचे १० हजार रूपये घेऊन जाताय; इतक्या पैशात काय काय खरेदी करू शकाल?
17
युक्रेनच्या रोबो आर्मीने केली कमाल, रशियन सैनिकांना सरेंडर करण्यास भाग पाडून पोस्टवर केला कब्जा
18
अक्षय्य तृतीयेपूर्वी २९३८ रुपयांनी महागलं सोनं, चांदीच्या दरातही १३ हजारांपेक्षा अधिक तेजी; पाहा नवे दर
19
'आप'ने राघव चड्ढांवर केली आणखी एक कारवाई; पंजाब सरकारने Z+' सुरक्षा काढून घेतली
20
“आयुष्यभराची इच्छा पूर्ण झाली”; कर्नाटकातील १४ काँग्रेस आमदार अयोध्येत, घेतले रामदर्शन
Daily Top 2Weekly Top 5

उमेदवार झाले आकडेमोडीत दंग

By admin | Updated: February 22, 2017 01:09 IST

छातीठोक दावा : कहीं खुशी, कहीं गम

नाशिक : महापालिका निवडणुकीचे मतदान संपुष्टात येताच, उमेदवार व त्यांचे समर्थक मतदानाच्या आकडेमोडीत दंग झाले असून, प्रभागातील कोणत्या मतदान केंद्रावर किती मतदान झाले व त्यातील किती मतदान अनुकूल, प्रतिकूल होते यावरच राजकीय भविष्याची गणिते मांडण्यात आली. मतदानाच्या आकडेवारीमुळे सर्वच प्रभागांत ‘कहीं खुशी, कहीं गम’चे चित्र पहावयास मिळाले.  गेल्या दोन महिन्यांपासून सुरू असलेली महापालिका निवडणुकीची रणधुमाळी मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता संपुष्टात आली. तत्पूर्वी निवडणुकीला सामोरे जाताना सर्वच उमेदवारांनी प्रभागाची रचना, मतदार यादीचा अभ्यास करून त्यादृष्टीने प्रचाराची रूपरेषा व नियोजन ठरविले होते. प्रभागातील कोणत्या भागात व पट्ट्यातून किती मते मिळतील, नातेवाईक, हितचिंतकांची मते किती याचा सारा अभ्यास उमेदवारांनी केला होता. त्या अभ्यासानुसारच मंगळवारी उमेदवारांनी मतदानाच्या दिवशी व्यूहरचना केली होती. मतदारांची ने-आण करण्याबरोबरच, हक्काच्या मतदारांना मतदानाचे प्रोत्साहन देण्याबरोबरच, ज्या ठिकाणी कमी आशा आहे अशा ठिकाणी वेगवेगळ्या माध्यमातून मतदारांना आपलेसे करण्याचा प्रयत्न करण्यात आला.  मतदानाच्या दिवशी सकाळपासून मतदान प्रतिनिधी, बुथ प्रतिनिधींकडून वेळोवेळी मतदानाची माहिती घेत, त्यादृष्टीनेही उमेदवारांनी अखेरच्या क्षणापर्यंत मतदान वाढीसाठी धडपड केली. सायंकाळी साडेपाच वाजता मतदान संपुष्टात आल्यावर पुन्हा प्रभागाची संपूर्ण मतदार यादीचा अभ्यास करून कोणत्या भागातून किती मतदान झाले याची आकडेवारी गोळा करून आपल्या बाजूने किती मतदान अपेक्षित होते व त्यापैकी किती मिळेल याचा ठोकताळा मांडण्यात आला. अर्थात हे करीत असताना प्रमुख प्रतिस्पर्ध्यांच्याही जमा-वजाबाकीचा हिशेब करण्यात आला. (प्रतिनिधी)राजकीय फैसला होणारआकडेवारीतच विजयाचे गणित अवलंबून असल्यामुळे काही उमेदवारांनी मतदान आटोपल्यानंतर थेट विजयाचा दावा करीत, आनंदोत्सव साजरा केला तर काहींना आपले भवितव्य काठावर असल्याची जाणीव झाली. मतदाराच्या मनाचा ठाव अखेरपर्यंत लागत नसला तरी, काही प्रभागांत शेवटच्या दोन तासात मतदान केंद्रांवर झालेल्या गर्दीवरून काहींचा काळजाचा ठोका चुकला. सकाळपासून तुरळक गर्दी असलेल्या मतदान केंद्रांवर दुपारनंतर झालेली गर्दी साहजिकच पैशांच्या वाटपामुळे झाल्याने त्यात कोणी बाजी मारली त्यावर विजयाचा आडाखे बांधण्यात आले. महापालिका निवडणुकीच्या मतमोजणीला चोवीस तास बाकी असून, त्यानंतर उमेदवारांचा राजकीय फैसला होणार आहे. तत्पूर्वी झालेल्या मतदानाच्या आकडेवारीवरून काहींनी बांधलेले ठोकताळे खरे ठरण्याची शक्यता वर्तविली जात आहे. काहींनी त्यादृष्टीने निकालानंतरची तयारीही उमेदवारांनी चालविली आहे.