शहरं
Join us  
Trending Stories
1
"५१ अंशांच्या उन्हातही काही होणार नाही, माझ्या गाडीत AC चालत नाही"; ज्योतिरादित्य शिंदेंनी सांगितला उष्णतेच्या लाटेपासून बचावाचा देशी उपाय!
2
१ मे पासून LPG गॅसचे नियम बदलणार? सिलिंडर हवा असेल तर 'DAC' कोड द्यावा लागणार; पाहा नवे बदल
3
वॉशिंग मशीन लावून झाल्यानंतर ४० मिनिटांनी अंघोळ करायचे लक्षात ठेवा...; नाहीतर ठरू शकते जीवघेणे!
4
कोण आहे Sahil Parakh? दिल्ली कॅपिटल्सनं नाशिकच्या पठ्ठ्याला दिली IPL पदार्पणाची संधी
5
जाणून-बुजून तुमचा स्मार्टफोन स्लो केला जातोय; युरोप मोबाईल कंपन्यांवर भडकला, कंटाळून नवा घ्यावा म्हणून...
6
भारतापाठोपाठ आता 'या' देशालाही रशियन तेलासाठी सूट! ट्रम्प अचानक उदार का झाले?
7
चिखलफेकप्रकरणी नितेश राणे निर्दोष, मात्र शांतता भंग केल्याप्रकरणी दोषी; १ महिना कारावास अन्...
8
राज्यात वीज पुरेशा प्रमाणात उपलब्ध, मात्र व्यवस्थेतील कमतरतेमुळे नागरिकांना मन:स्ताप- चंद्रशेखर बावनकुळे
9
Video - अग्नितांडव! हापूरमध्ये आग; ७० झोपड्यांसह २ कारखाने जळून खाक, कोट्यवधींचं नुकसान
10
स्वादिष्ट! पंजाबची फिरनी ते ओडिशाची खीर; जगातील सर्वोत्कृष्ट पदार्थांमध्ये 'या' ६ भारतीय पदार्थांची बाजी
11
RCB ला मोठा धक्का! DC विरुद्धच्या सामन्यातूनही धडाकेबाज फलंदाज OUT
12
ऑटो कंपन्यांमध्ये खळबळ! २०२८ पासून फक्त इलेक्ट्रीक दुचाकी विकता येणार, दिल्लीत पेट्रोलच्या दुचाकी बॅन होणार
13
सुपर ओव्हरमधील विकेट्स आणि धावा खेळाडूच्या खात्यात का जमा होत नाहीत? जाणून घ्या त्यामागचं कारण
14
Top Marathi News Live: काळजी घ्या, उष्णतेची लाट होरपळून काढणार! IMD चा महाराष्ट्रातील 'या' भागांना सर्तकतेचा इशारा
15
"घराणेशाही वाटेल...", अमोल मिटकरींकडून विधान परिषदेसाठी 'या' नावाची शिफारस; ट्विट करुन केली मागणी
16
"हा सल्ला उद्धव ठाकरेंसाठी आहे का?"; संजय राऊतांच्या निवडणुकीबाबतच्या विधानावर भाजपचा पलटवार
17
पाकिस्तान मध्यस्थ होण्याच्या लायक नाही! इराणने बुरखा फाडला; ट्रम्प म्हणाले, इराणच्या पाईपलाईन्स फुटणार... 
18
Mitali Bag : TMC खासदार मिताली बाग यांच्या कारवर हल्ला; भाजपावर गंभीर आरोप, रडत रडत म्हणाल्या...
19
Mind Soul: थकवा, ताण की राग? तुमच्या प्रत्येक मानसिक समस्येवर आहे आहे एक सोपा उपाय
20
IPL 2026: तर Super Over झालीच नसती..!! पंचाच्या चुकीमुळे LSGवर आली पराभवाची वेळ? काय घडलं
Daily Top 2Weekly Top 5

अवघ्या एका मताने उमेदवार विजयी

By admin | Updated: February 25, 2017 01:05 IST

अवघ्या एका मताने उमेदवार विजयी

सातपूर : महानगरपालिकेच्या निवणुकीत मतमोजणीच्या दिवशी प्रभाग क्र मांक १० मधील एका उमेदवाराची धडधड वाढविणारा निकाल चर्चेचा विषय ठरला आहे. टपाली मते बाजूला ठेवली तर अवघ्या एका मताने भाजपाच्या उमेदवाराचा विजय झाला आहे. या एका मताची काय किंमत असते. ते मतमोजणीनंतरच कळते.  सातपूर प्रभाग क्र मांक १० मधील भाजपाच्या उमेदवार पल्लवी पाटील यांना दुसऱ्या फेरीअखेर तीन हजार १३३ मते मिळालीत, तर प्रतिस्पर्धी मनसेच्या उमेदवार कलावती सांगळे यांना ३४३६ मते मिळालीत. तिसऱ्या फेरीत पाटील यांना ९१७, तर सांगळे यांना ६१३ मते मिळाल्याने पाटील यांनी अवघ्या एका मताची आघाडी घेतली. तोपर्यंत दोन्ही उमेदवार आणि त्यांच्या समर्थकांमध्ये प्रचंड चलबिचल आणि धडधड सुरू झाली होती. त्यानंतर निवडणूक अधिकाऱ्यांनी टपाली मतांची घोषणा केली.  पाटील यांना १५, तर सांगळे यांना ५ टपाली मते मिळालीत. पाटील यांना एकूण ४ हजार ६५ मते, तर सांगळे यांना ४ हजार ५४ मते मिळाली. पल्लवी पाटील यांनी ११ मतांची आघाडी घेतली आणि विजयाचे चित्र स्पष्ट झाले. निकाल घोषित झाल्यानंतरदेखील प्रतिस्पर्धी उमेदवार हरकत घेतात की काय? असा प्रश्न पल्लवी पाटील यांच्या समर्थकांना पडला होता. त्यामुळे विजयी झाल्याचे प्रमाणपत्र घेण्यासाठी बराच उशीर झाला होता. (वार्ताहर)हरकत घेण्याचा प्रयत्नटपाली मते धरून ११ मतांनी पराभूत झालेल्या मनसेच्या उमेदवार कलावती सांगळे यांनी निवडणूक अधिकाऱ्यांकडे धाव घेतली व टपाली मतांवर हरकत घेण्याचा प्रयत्न केला. टपाली मते नेमकी कोणाची आहेत याची माहिती निवडणूक निर्णय अधिकाऱ्यांकडे मागितली. परंतु गोपनीयतेचा भंग होईल म्हणून निवडणूक अधिकाऱ्यांनी माहिती देण्यास स्पष्ट नकार दिला. तरीही हरकत घ्यायची असेल तर तसा अर्ज दाखल करा किंवा न्यायालयात दाद मागू शकतात, असा सल्ला निवडणूक निर्णय अधिकारी भालचंद्र बेहेरे यांनी दिला. परंतु सांगळे हे या सल्ल्याकडे डोळेझाक करीत माघारी फिरले.