ओझर : केंद्रीय निवडणूक आयोगाच्या आदेशान्वये विधानसभेच्या मतदानापासून वंचित राहू नये यासाठी शनिवार व रविवार या दोन दिवशी पुनरीक्षण मतदार दुरुस्ती नोंदणीची धडक मोहीम ओझर येथे राबविण्यात येत आहे. यादी भाग क्रमांक ११० ते १४९ भागातील ४० बूथसाठी बीएलओंची नेमणूक केल्याची माहिती तलाठी उल्हासराव देशमुख यांनी दिली. ओझरमधील भागाची तहसीलदार डॉ. संदीप अहेर यांनी पाहणी केली. ही मोहीम यशस्वी करण्यासाठी सर्कल अधिकारी शेख, तलाठी उल्हासराव देशमुख, कर्मचारी सागर कोळपकर, दिलीप ठुबे, ग्रामविकास अधिकारी शरद पाटील हे विशेष परिश्रम घेत आहेत. विशेष संक्षिप्त पूर्ण परीक्षण दुरुस्ती कार्यक्रमाचा कालावधी ९ ते ३० जून १४ ला प्रसिद्ध करण्यात आला आहे.
{{#config.logo.enabled}} {{/config.logo.enabled}}
{{/allowed}}