बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: October 8, 2021 01:35 IST2021-10-08T01:34:15+5:302021-10-08T01:35:00+5:30
आर्टिलरी सेंटर रोड येथील वैष्णवी दर्शन रो-हाऊसमधील दोन बंगल्यांचे कडी कुलूप तोडून पंधरा हजाराचा ऐवज चोरून नेला.

बंगल्याचे कुलूप तोडून घरफोडी
नाशिकरोड : आर्टिलरी सेंटर रोड येथील वैष्णवी दर्शन रो-हाऊसमधील दोन बंगल्यांचे कडी कुलूप तोडून पंधरा हजाराचा ऐवज चोरून नेला. आर्टिलरी सेंटर गेटजवळील पार्वती अपार्टमेंटमध्ये राहणारे वसंत सखाराम दराडे यांनी दिलेल्या फिर्यादीत म्हटले आहे, वैष्णवी रो-हाऊसमधील दराडे व अजितकुमार राणा यांच्या घराचा कडी कोयंडा तोडून १० हजार ३५० रुपयाची रोकड, तीन कलर जुन्या मोटर, ड्रील मशीन, लोखंड कापण्याचे मशीन असा पंधरा हजाराचा ऐवज चोरून नेला. उपनगर पोलीस ठाण्यात घरफोडीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे.