शहरं
Join us  
Trending Stories
1
पहिल्या दोन टप्प्यांतील मतदान पाहून नेत्यांचं वाढलं टेन्शन; सभांना होते गर्दी, मात्र मत देताना लोकांचा हात आखडता
2
‘अमित शाह, योगी आदित्यनाथ यांनी कोकणात यायच्या भानगडीत पडू नये, इथे आल्यास…’, भास्कर जाधव यांचा इशारा
3
"ते म्हणतात की, मी अपवित्र आहे, कारण...", कंगनाचा विक्रमादित्य यांच्यावर जोरदार हल्लाबोल
4
सहा देशांमध्ये ९९ हजार टन लाल कांद्याच्या निर्यातीस परवानगी; निर्णय नवा की जुनाच?, याची चर्चा
5
महायुतीची डोकेदुखी वाढली, पाच जागांचा तिढा कायम; आपसांतच रस्सीखेच
6
आजचे राशीभविष्य - २८ एप्रिल २०२४, सार्वजनिक जीवनात मान-प्रतिष्ठा वाढेल
7
आमिरला पहिल्या पत्नीने लगावली होती कानशिलात, नेमकं काय घडलं होतं? अभिनेत्याने केला खुलासा
8
ऐन निवडणुकीत बाजारातील पैसा गायब; अंगडियाचे दर भडकले !
9
ईश्वराप्पा यांच्या बंडाने शिवमोग्गात लढत रंगतदार; पक्षातून सहा वर्षासाठी हकालपट्टी
10
पूनम महाजन यांना डावलून निकमांना संधी; मुंबई उत्तर-मध्य मतदारसंघात चुरस वाढली
11
लढाई हट्टाची आणि अस्तित्वाची, नेत्यांची कसोटी; 'एकास एक' लढतीचे प्रयत्न फसले
12
काँग्रेसची सत्ता आली तर ओबींसीचे आरक्षण धर्माच्या नावावर वाटणार : पंतप्रधान मोदी
13
राज्यात पारा चाळिशी पार; मुंबई ३६, तर ठाणे ४१, उष्माघाताच्या रुग्णांची संख्या १८४ वर
14
या झोपडीत राहतो लोकसभेचा उमेदवार, रावेरमधून लढणार; लोकांनी वर्गणी काढून भरले डिपॉझिट
15
राजस्थान रॉयल्सची प्ले ऑफमधील जागा निश्चित! संजू सॅमसन, ध्रुव जुरेल यांची मॅच विनिंग खेळी 
16
“मोदींनी १० वर्षांत एकही पत्रकार परिषद घेतली नाही, मनमोहन सिंग यांनी १११ घेतल्या”: शरद पवार
17
“पंतप्रधान मोदींना भारतरत्न द्या अन् प्रायश्चित करायला हिमालयात पाठवा”: मार्कंडेय काटजू
18
“देशाचे संविधान, कायदा अन् सुरक्षेलाच प्राधान्य देणार”; उज्ज्वल निकम यांची पहिली प्रतिक्रिया
19
इरफान पठाणने दाखवली MI ची मोठी चूक; हार्दिक पांड्या पराभवाचं भलतंच कारण सांगतोय... 
20
मत द्यायचे असेल तर कोणाला देऊ ? हा प्रश्न, कोणी कुठेही...; महेश मांजरेकरांचे राजकारणावर भाष्य

आदीवासी भागातील महिलांच्या डोक्यावरचे ओझे उतरले ; रोलींग ड्रमचे वाटप

By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: July 06, 2020 2:24 PM

डोक्यावर एकावर एक असे हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या  मेंढपाड्यातील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे खाली उतरले आहे. वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेने येथील महिलांच्या व्यथा समजावून घेत संस्थच्या सभासदांसह एका कंपनीच्या सहकाऱ्यांच्या  मदतीने मेंढपाडा या गावातील आदिवासी महिलांना हाताने ओढण्याचे पाण्याचे रोलिंग ड्रमचे वाटप केले आहे.

ठळक मुद्देआदिवासी महिलांना रोलींग ड्रमचे वाटप डोक्यावरून हंडे उतरविण्याचा प्रयत्न

नाशिक : काही किलोमीटरवरून डोक्यावर एकावर एक असे हंडे घेऊन पाणी भरणाऱ्या  मेंढपाड्यातील आदिवासी महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे खाली उतरले आहे. वनवासी कल्याण आश्रम या सामाजिक संस्थेने येथील महिलांच्या व्यथा समजावून घेत संस्थच्या सभासदांसह एका कंपनीच्या सहकाऱ्यांच्या  मदतीने मेंढपाडा या गावातील आदिवासी महिलांना हाताने ओढण्याचे पाण्याचे रोलिंग ड्रमचे वाटप केले आहे. त्यामुळे महिलांच्या डोक्यावरील हंड्याचे ओझे कमी झाले असून त्यांना रोलींग ड्रम ओढणे तुलनेच कमी कष्टाचे ठरू लागले आहे. मेंढपाडा तसेच परिसरातील भागात महिलांना दुरवरून पाणी आणावे लागते. यासाठी येथील आदिवासी महिला सकाळ, सायंकाळी डोक्यावर एकावर एक असे दोन ते तीन हंडे घेऊन पायपीट करतात. यामुळे त्यांचा  अधिक वेळ पाण्यासाठी जाण्याबरोबरच त्यांच्यामध्ये मानेचे दुखणे वाढले होते. ही परिस्थिती आदिवासींसाठी सामाजिक काम करणाऱ्या  वनवासी कल्याण आश्रमाच्या पदाधिकाऱ्यांनी सातत्याने पाहिली होती. या महिलांचे श्रम कमी करून त्यांचा वेळ वाचवणे व आजारापासून वाचवण्यासाठी त्यांच्या डोक्यावरील हंड्याचा भार कमी व्हावा, या उद्देशाने संस्थेने त्यांना रोलिंग ड्रम देण्याचा उपक्रम हाती घेतला. त्यांना ब्लू क्रॉस लॅबोरेटरीज  कंपनीची साथ मिळाली. या माध्यमातून  येथील महिलांना हे रोलींग ड्रम वाटप करण्यात आले. यावेळी अ‍ॅड .गोरक्ष चौधरी  , धनंजय जामदार, हेमराज राऊत, प्रदिप महाकाळ, भविनाथ पाडवी, मुरलिधर चौधरी, कमलेश वाघमारे, रोहिदास राऊत  व मेंढपाडा या गावातील महिला मंडळ उपस्थित होते.

टॅग्स :Trible Development Schemeआदिवासी विकास योजनाNashikनाशिकWomenमहिलाWaterपाणी