शहरं
Join us  
Trending Stories
1
होर्मुजमध्ये इराणचा सापळा! ६ महिने तेलपुरवठा ठप्प होण्याची भीती, जागतिक अर्थव्यवस्थेसमोर मोठे आव्हान
2
'हेल-होल' वादानंतर ट्रम्प यांचं 'हृदयपरिवर्तन'! म्हणाले, "भारत 'महान देश' आणि मोदी..."
3
लग्नाहून परतणाऱ्या वऱ्हाड्यावर काळाचा घाला; व्हॅनला अपघात, पाच जणांचा मृत्यू
4
संजूचं नाबाद शतक! गोलंदाजीत अकिलचा इम्पॅक्टफुल 'चौकार'; MI च्या घरच्या मैदानात CSK चा विक्रमी विजय
5
पश्चिम रेल्वेच्या ट्रेन मॅनेजरला होमगार्ड शिपायाची लाथ; गुन्हा नोंदवण्यास टाळाटाळ केल्याचा आरोप
6
केंद्रीय मंत्री नितीन गडकरी व कुटुंबियांना सोशल मीडियावर आक्षेपार्ह व्हिडिओद्वारे धमकी; नागपुरातील आरोपीविरोधात गुन्हा दाखल
7
लैंगिक शोषणामुळे पत्नी बनली मनोरुग्ण; न्याय मागणाऱ्या पतीवर वेडा होण्याची पाळी
8
MI vs CSK: क्विंटन डी कॉकची विकेट आणि आईच्या आठवणीत भावूक झाला मुकेश चौधरी (VIDEO)
9
Baramati bypoll election: बारामती विधानसभा पोटनिवडणुकीत मतदानाचा टक्का घसरला; सुनेत्रा पवार यांच्या ‘रेकॉर्डब्रेक’ मताधिक्याचा ४ 'मे'ला होणार फैसला
10
Sanju Samson Record: वानखेडेवर संजूची विक्रमी सेंच्युरी! हिटमॅन रोहित शर्माची बरोबरी; कोहली-अभिषेकचा रेकॉर्डही धोक्यात
11
जळगाव महापालिकेत पोलिसांचे तळ, कागदपत्रांची झाडाझडती; ४१ कोटींच्या अपहाराचा आरोप
12
MI vs CSK : मुकेश चौधरीला सलाम! आईच्या निधनानंतर काळजावर दगड ठेवून उतरला मैदानात
13
पुतळ्यासारखे थिजले लेकाचे हात; बापासाठी पदक जिंकले, सुवर्ण सोहळा पाहायला येतानाच वडिलांचा अपघाती मृत्यू
14
पश्चिम बंगालमध्ये पहिल्या टप्प्यात भाजप किती जागा जिंकणार? विक्रमी मतदानानंतर सुवेंदू अधिकारी यांचा धक्कादायक दावा!
15
बंगाल-तमिळनाडूत मतदानाची विक्रमी टक्केवारी; बंपर मतदानाने कोणाचे नशीब उजळणार?
16
मध्य प्रदेशमधील प्रवाशाचे साहित्य हरवले; रेल्वे पोलिसांनी नागपुरात शोधून दिले
17
होर्मुझमध्ये सुरुंग पेरणाऱ्या बोटी दिसताच उडवा! ट्रम्प यांचा आदेश; पुन्हा युद्ध भडकणार?
18
बारामतीमध्ये २०२९ ला पवार विरुद्ध पवार लढाई होणार का? जय पवारांनी स्पष्टच सांगितलं...
19
IPL 2026 : रोहित-धोनीशिवाय MI आणि CSK संघ उतरला मैदानात! IPL मध्ये पहिल्यांदाच असं घडलं
20
Travel : निसर्गाची मुक्त हस्ताने उधळण! भारताच्या 'या' ४ सुंदर ठिकाणांपुढे स्वित्झर्लंडही पडेल फिके
Daily Top 2Weekly Top 5

आठवडाभर बंद : आजपासून सराफ बाजारातील वर्दळ थांबली

By लोकमत न्यूज नेटवर्क | Updated: July 7, 2020 16:41 IST

हा बंद १४ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होतील,

नाशिक : कोरोनाचा वाढता प्रादुर्भाव लक्षात घेता नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने शहरातील सराफ बाजार आठवडाभरसाठी बंद ठेवण्याचा निर्णय घेतला असून, त्याला आजपासून सुरुवात होणार आहे. काही व्यापाऱ्यांनी अगोदरच आपली दुकाने बंद ठेवली आहेत.करोनाचा प्रादुर्भाव वाढत असल्याने जिल्ह्यातील सराफांनी सराफ बाजार बंद ठेवण्याचा निर्णय घेतला आहे. याबाबत नाशिक जिल्हा सराफ असोसिएशनने खबरदारीचा उपाय म्हणून बंदचे प्रयोजन केले असल्याचे पदाधिकाऱ्यांनी सांगितले. शहराच्या गावठाण असलेल्या पंचवटी, मालेगाव, सराफ बाजार, जुने नाशिक परिसरात मोठ्या प्रमाणत गर्दी होते. लॉकडाउन शिथिल झाल्यानंतर गर्दीत मोठ्या प्रमाणात वाढ झाली. त्यामुळे करोनाच्या रुग्णसंख्येतदेखील झपाट्याने वाढ होत आहे. शहरातील असंख्य नागरिक खबरदारी घेत नसल्याने करोनाचा फैलाव वेगाने होत आहे. काही दिवसांपूर्वी सराफ बाजारात काम करणाऱ्या काही कारागिरांनादेखील करोनाची लागण झाली होती. त्यामुळे त्यांच्या संपर्कात असलेल्यांनी खबरदारीचा उपाय म्हणून स्वत:ला क्वारंटाइन करून घेतले होते. सध्या शहरातील करोनाबाधितांचा आकडा पाहिल्यास धडकी भरते. त्यामुळे सराफ व्यावसायिकांनी स्वत:हून हा निर्णय घेतला आहे. सराफ बाजाराव्यतिरिक्त उपनगरांमधील सराफ व्यावसायिकही या बंदमध्ये सामील होणार आहेत. त्यामुळे येत्या काही दिवसांत शहरातील सोने-चांदी खरेदीचे व्यवहार थंडावणार आहेत. हा बंद १४ तारखेपर्यंत सुरू राहणार असून, यादरम्यान करोनाबाधितांचा आकडा कमी झाल्यानंतर व्यवहार पूर्ववत होतील, अशी माहिती सराफ असोसिएशनचे अध्यक्ष चेतन राजापूरकर यांनी दिली.

 

 

टॅग्स :NashikनाशिकCoronavirus in Maharashtraमहाराष्ट्रात कोरोना व्हायरस