शहरं
Join us  
Trending Stories
1
ऐतिहासिक क्षण! ३४ वर्षांनी भेटलेल्या इजरायल-लेबनॉनमध्ये १० दिवसांसाठी युद्धबंदी; राष्ट्राध्यक्ष ट्रम्प यांची यशस्वी मध्यस्थी
2
"उडता पंजाब..." सरपंच साब श्रेयससह प्रभसिमरनचा जलवा; मुंबई इंडियन्सला पराभूत करत पंजाब किंग्स अव्वल
3
नाशिक TCS प्रकरण: आरोपीचा काका म्हणतोय, 'पीडित तरुणी आणि आरोपीत प्रेमप्रकरण...'; न्यायालय आवारात गोंधळ
4
रात्रभर तडफडत राहिले; राष्ट्रीय विधि विद्यापीठाच्या दोन विद्यार्थ्यांचा दुर्दैवी अंत
5
"आमचे सैन्य पुन्हा युद्धासाठी सज्ज, डोनाल्ड ट्रम्प यांच्या आदेशाची वाट बघतोय", अमेरिकेच्या संरक्षण मंत्र्यांचे विधान
6
MI vs PBKS : श्रेयस अय्यर झाला सुपरमॅन! Unbelievable Relay Catch सह पांड्याचा खेळ खल्लास (VIDEO)
7
"आज चाणक्य असते तर तेही थक्क झाले असते..."; महिला आरक्षण विधेयकावरून प्रियंका गांधी यांचा थेट निशाणा
8
Quinton de Kock चा मोठा धमाका! चार सामन्यांत बाकावर बसवलं; संधी मिळताच ठोकली कडक सेंच्युरी
9
"संसदेत अनेकदा राहुल गांधींची खिल्ली उडवली जाते, पण...!"; प्रियंका गांधींचा भाजपवर घणाघात
10
MI vs PBKS : पॉवर प्लेमध्ये 'सिंग इज किंग' शो! सूर्यावर ओढावली 'गोल्डन डक'ची नामुष्की
11
खळबळजनक खुलासा! पाकिस्तानने भडकवली नोएडामधील हिंसा; तंत्र बघून सुरक्षा यंत्रणा हादरल्या
12
कोणी विचारेना...! किंमत होती ५.५० लाख, मारुतीवर आठ वर्षांतच कार बंद करण्याची वेळ आली...
13
नेपाळने लादला भारतावर कर! १०० रुपयांहून अधिकच्या खरेदीवर आता द्यावा लागणार 'भंसार' कर; बालेन सरकारचा मोठा निर्णय
14
BJP मंत्र्यांच्या मुलाने पाच जणांना उडवले, उलट त्यांच्यावरच ओरडला- मी सायरन वाजवले, बाजूला का सरकला नाहीत?
15
युट्यूबवर ५ लाख व्ह्यूज आले तर बँक खात्यात किती पैसे जमा होणार? जाणून घ्या कमाईचं नेमकं गणित
16
ममता बॅनर्जींचा मोठा विजय! 'ट्रिब्यूनल'कडून क्लीन चिट मिळालेल्यांना बंगालमध्ये मतदानाचा अधिकार; सुप्रीम कोर्टाचा कलम १४२ अंतर्गत विशेष आदेश
17
कोण आहे Mayank Rawat? मुंबई इडियन्सनं एका षटकात ५ षटकार मारणाऱ्या भिडूला दिली पदार्पणाची संधी
18
भयंकरच घडलं! वाद सोडवायला गेला आणि जीव गेला; मध्यस्थी करणाऱ्याची चाकूने वार करत हत्या
19
हरियाणा काँग्रेसमध्ये मोठा भूकंप! राज्यसभा निवडणुकीत 'क्रॉस वोटिंग' करणाऱ्या ५ आमदारांचे निलंबन; हायकमांडचा कडक इशारा
20
आधी मेलेनिया-ट्रम्प यांचं लग्न जमवलं, आता फिक्स करतोय ट्रम्प यांच्यासोबत नेत्यांच्या मीटिंग; कोण आहे हा व्यक्ती?
Daily Top 2Weekly Top 5

रावळगाव गटात इच्छुकांची भाऊगर्दी

By admin | Updated: January 20, 2017 00:17 IST

अस्तित्वाची लढत : रावळगाव गण अनुसूचित जमाती, तर वडेल नागरिकांचा मागास प्रवर्ग

शफीक शेख मालेगावतालुक्यातील रावळगाव जिल्हा परिषद गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी खुला झाल्याने या गटात यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत चुरशीचा सामना होणार आहे. आजी-माजी मंत्र्यांच्या निकटवर्तीयांमध्ये सरळ-सरळ लढत होण्याची चिन्हे दिसत आहेत. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या गटावर वर्चस्व सिद्ध करण्यासाठी सर्वच राजकीय पक्षांना कंबर कसावी लागणार आहे.माजी मंत्री प्रशांत हिरे यांच्या कर्मवीर हिरे सेनेचे या गटावर वर्चस्व होते. जिल्हा परिषद निवडणुकीत रावळगाव गटातून हिरे गटाच्या अलका आखाडे यांनी प्रतिनिधित्व केले आहे. त्यांनी जिल्हा परिषदेत महिला व बालकल्याण सभापतिपदही भूषविले होते. हिरेंच्या सत्तेला सुरुंग लावण्यास शिवसेनेच्या पक्षनेतृत्वाला नंतर यश आले. गेल्या पंधरा वर्षांपासून शिवसेनेने या गटावर निर्विवाद वर्चस्व प्रस्थापित केले आहे. भाजपा, राष्ट्रवादी, काँग्रेस, रिपाइं आदिंच्या पक्षनेतृत्वाला गटातील सत्ता खेचून आणण्याचे आव्हान उभे ठाकले आहे.शिवसेनेचे विद्यमान जिल्हा परिषद सदस्य सुरेश पवार यांनी आपल्या गटात ग्रामविकास राज्यमंत्री दादा भुसे यांच्या मदतीने केलेली विकासकामे ही त्यांची जमेची बाजू आहे. परंतु आपल्या हातातून गेलेला रावळगाव गटाचा गड पुन्हा मिळविण्यासाठी भाजपावासी झालेल्या हिरे गटाला कसरत करावी लागणार आहे. गेल्यावेळी शिवसेनेचे सुरेश पवार यांनी जनराज्यचे समाधान अहिरे आणि राष्ट्रवादी- कॉँग्रेस युतीचे उमेदवार दत्तू वडक्ते यांचा पराभव केला होता. रावळगाव गटाचे जिल्हा परिषदेचे आरक्षण सर्वसाधारण महिलेसाठी आरक्षित झाले आहे.रावळगाव गणातूनच विजयी झालेले शिवसेनेचे पंचायत समिती सदस्य शरद कासार यांना पंचायत समिती उपसभापतिपदाची संधी मिळाली होती. गेल्यावेळी शिवसेनेच्या मानसी धिवरे यांना पंचायत समिती सदस्यपदाची संधी मिळाली होती. वडेल गणातून सेनेच्याच छायाबाई माळी विजयी झाल्या होत्या. त्यांनी जनराज्यच्या अलका आखाडे आणि राष्ट्रवादी कॉँग्रेसच्या शीतल आखाडे यांचा पराभव केला होता. यंदाच्या पंचवार्षिक निवडणुकीत रावळगाव गट सर्वसाधारण प्रवर्गासाठी आरक्षित झाल्यामुळे इच्छुकांची संख्या मोठ्या प्रमाणात आहे. यामुळे पक्षनेतृत्वाचा उमेदवारी बहाल करताना कस लागणार आहे. पक्षाला नाराज व बंडखोरीची लागण होणार नाही याची काळजी घ्यावी लागणार आहे.